महाराष्ट्र कॉलेज
पूना नेटिव इन्स्टिट्यूशनने (आत्ताची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी) महाराष्ट्र कॉलेजची स्थापना इ.स.१८९६ साली केली होती परंतु ब्रिटीशांच्या रोषामुळे हे कॉलेज इ.स.१८९९ मध्ये बंद करावे लागले.
सन १८९६ च्या जानेवारीत कॉलेजचा पहिला वर्ग कसबा पेठेत नाना हौदाजवळ असलेल्या देशमुख यांच्या वाड्यांत सुरू झाला. त्यावेळी कॉलेजचा स्टाफ खालीलप्रमाणे होता.
प्राचार्य विष्णू बळवंत गोखले - गणित व संस्कृतचे प्रोफेसर
रा.शिवराम महादेव परांजपे - संस्कृतचे प्रोफेसर
रा.विनायक रामचंद्र जालनापुरकर - गणिताचे प्रोफेसर
रा.नटेश आप्पाजी द्रविड - इंग्रजी व इतिहासाचे प्रोफेसर
रा.कृष्णाजी हरि केळकर - इंग्रजी व इतिहासाचे प्रोफेसर
रा.इंद्रस्वरूप मुनशी - पर्शियनचे प्रोफेसर
रा.वामन प्रभाकर भावे - लॅटिन व इतिहासाचे प्रोफेसर
हे महाविद्यालय स्थापन झाले त्यावेळी पुण्यात डेक्कन कॉलेज व फर्गुसन कॉलेज ही दोन कॉलेजेस होती.
संदर्भ - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी - हीरक महोत्सव स्मारक इतिहास ग्रंथ - १९३५