महार
महार |
---|
एक महार महिला |
एकूण लोकसंख्या |
१ ते १.२० कोटी |
लोकसंख्येचे प्रदेश |
प्रमुख महाराष्ट्र इतर लक्षणीय लोकसंख्या |
भाषा |
मुख्यः- मराठी व वऱ्हाडी |
धर्म |
बौद्ध धर्म |
संबंधित वांशिक लोकसमूह |
मराठी लोक मराठी बौद्ध |
महार हा एक भारतीय जातसमूह असून तो प्रामुख्याने महाराष्ट्रात तसेच लगतच्या राज्यांमध्ये राहतो. हा अनुसूचित जातीचा समाज आहे. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ९ ते १०% महार आहेत.[२] महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, ओरिसा, तेलंगणा तामिळनाडू या राज्यांत महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण सुमारे ३० राज्यांत हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यांत महार समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे.[३][४] भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातही महार हे कमी संख्येने आहेत.[५][६] आज ८०% महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे तर २०% महार हे हिंदू धर्म मानतो.[ संदर्भ हवा ]
मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य मातृभाषा मराठी आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्रा व देशाबाहेर गेले आहेत. मराठा-कुणबी (सुमारे ३०%) समाजानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या महार समाजाची आहे.[ संदर्भ हवा ]
इतिहास
महार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही.
जागल्या म्हणजे पहारेकरी (वॉचमन )हा बहुधा महार जातीचा असे. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहीत म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराकडे वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे हे काम असे.
महार या जातीचे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.
महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा, म्हसोबा, खंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होते. वऱ्हाडप्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच होते. ग्रामपंचायतीत बारा बलुतेदारांपैकी महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवचं वॉचमन बनून कामे करणे व जासुसी इत्यादी कामे असत.[७]
उपजाती
महार जातीत १२ उपजाती होत्या. महारांच्या सोमवंशी , लाडवन, बावणे व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब अशा पोटजातीही आहेत. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये हिंदू धर्म त्यागून हा सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणुकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत आणि उपजातींचा हा भेद समाप्त झाला आहे.
धर्म
२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रीय महार हे ५६.२% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि ०.१% शीख होते.[८]
१९५१ मध्ये म्हणजेच डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% होते. धर्मांतरांनंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे ९८% महार हे बौद्ध धर्मीय आहेत. मात्र काही महार हे 'महार' ही 'हिंदू ओळख' नाकारत बौद्ध झाले तर काही महार लोक जातीने 'महार' व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले. २०११ मध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमधील महारांचे प्रमाण ६०% होते, व महारांपैकी ६२% महारांनी आपला धर्म बौद्ध नोंदविला होता.
सुरुवातीला हिंदू धर्मातील अस्पृश्य वर्गात गणला जाणारा हा समाज १४ ऑक्टोबर १९५६ नंतर बौद्ध धर्मीय झाला. त्यानंतर ह्या समाजातील बहुतेक लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आले तर अनेकांनी अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारला.
लोकसंख्या
२०१७ पर्यंत, महार समुदायाला १६ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते : आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, मिझोरम, राजस्थान, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल.
राज्यानुसार भारतातील महार लोकसंख्या, २००१[९] | |||
---|---|---|---|
राज्य | लोकसंख्या | टीप | |
आंध्र प्रदेश[a] | २८,३१७ | ||
अरुणाचल प्रदेश | ६४ | ||
आसाम | १,७२५ | ||
छत्तीसगढ | २,१२,०९९ | ८.७७% राज्यातील अनु. जातीची लोकसंख्या | |
दादरा आणि नगर हवेली | २७१ | ६.६०% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या | |
दमण आणि दीव | ५ | ||
गोवा | १३,५७० | ५७% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या | |
गुजरात | २६,६४३ | ||
कर्नाटक | ६४,५७८ | ||
मध्य प्रदेश | ६,७३,६५६ | ||
महाराष्ट्र | ५६,७८,९१२ | ५७.५% राज्यातील अनुसूचित जातीपैकी लोकसंख्या | |
मेघालय | ५३ | ||
मिझोरम | ९ | ||
राजस्थान | ७,२४१ | ||
पश्चिम बंगाल | २८,४१९ |
याशिवाय इतर राज्यातील महारांची लोकसंख्या (२०११): (तेलंगाणा वगळता इतर राज्यात महरांचा समावेश अनु. जातीत केलेला नाही.)
- ओडिसा - ३२,०००
- तेलंगणा - ३२,०००
- त्रिपुरा - ३,७००
- तमिळनाडू - ३,१००
- दिल्ली - २,९००
- उत्तर प्रदेश - १,५००
- केरळ - १,१००
हे सुद्धा पहा
- मराठी बौद्ध
- महार रेजिमेंट
- दलित बौद्ध चळवळ
- महाराष्ट्रामधील बौद्ध धर्म
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी
महार या विषयावरील पुस्तके
- खानदेशातील महार संस्कृती (रा.शे. साळुंके)
- भारतीय जातिसंस्थेत मातंगाचे स्थान आणि महार-मांग संबंध (प्रा. बी.सी. सोमवंशी)
- महार कोण होते? उद्गम : संक्रमण : झेप (संजय सोनवणी)
संदर्भ आणि नोंदी
- ^ https://joshuaproject.net/maps/india/17405
- ^ Fred Clothey (2007). Religion in India: A Historical Introduction. Psychology Press. p. 213. ISBN 978-0-415-94023-8.
- ^ "List of Scheduled Castes : Ministry of Social Justice and Empowerment - Government of India". socialjustice.nic.in (इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". 2013-02-07. रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-02-07. 2018-03-19 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Mahar - Dictionary definition of Mahar | Encyclopedia.com: FREE online dictionary". www.encyclopedia.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ Project, Joshua. "Mahar (Hindu traditions) in India" (इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ memberj. "महार". ketkardnyankosh.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ "Wayback Machine" (PDF). 2012-11-14. रोजी मूळ पानापासून संग्रहित2012-11-14. 2018-03-19 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". archive.org. Officer of the Registrar General. 7 March 2007. रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-02-07. 2018-01-26 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
बाह्य दुवे
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.