महात्मा हंसराज
महात्मा हंसराज (१९ एप्रिल, इ.स. १८६४ - १५ नोव्हेंबर, इ.स. १९३८) हे सोलापूर मधील दयांनद शिक्षण संस्थेचे स्थापक होते.
बालपण आणि शिक्षण
वैदिक धर्माचे पुर्नरूद्धारक आणि आर्यसमाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांचे शिष्य, अनुयायी व ऋर्षी यांच्या प्रती आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे महात्मा हंसराज यांचा जन्म पंजाब राज्यातील होशियापूर जिल्ह्यातील बजवाडा या छोट्या गावामध्ये 19 एप्रिल 1864 मध्ये पिता चुन्नीलाल आणि माता गणेशदेवी याचा पोटी झाला. वडिलांची आर्थिक परिस्थिती अंत्यत गरीब होती. महात्मा हंसराज हे अंत्यत बुद्धीमान होते. ते 12 वर्षीचे असताना त्यांचे वडील सोडूून गेले. त्यामुळे त्यांची जबाबदारी मोठ्या भावावर आली. या कालखंडात त्यांचा परिवार लाहोरला स्थायिक झाला. तेथेच महात्मा हंसराज एका मिशनरी शाळेमध्ये दाखल झाले. या कालखंडामध्ये स्वामी दयानंद सरस्वतीचे विचार आचार, व्याख्याने याचा प्रभाव महात्मा हंसराज यांच्यावर पडला. महर्षि दयानंद सरस्वती यांच्या प्रेरणेने महात्मा हंसराज यांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित करण्याचा निशिचय केला. 1 विद्येचा अभ्यास करून आपल्या मनाचा विकास करणे. 2 जीवनामध्ये उत्तम स्वभाव आणि उत्तम ज्ञान मिळविणे. 3 सतत सत्य बोलण्याचा प्रयत्न करणे. 4 जीवनातील विलासिता नष्ट करून त्यागमय जीवन जगणे.
महात्मा हंसराज यांनी बी.ए. परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले.
समाजसेवेची कारकीर्द
त्यांनी नौकरीचा विचार न करता आपला मित्र आर्य समाजाचे विचारक पंडीत गुरुदत्त विद्यार्थी याच्याबरोबर डी.ए.वी. स्कूलची सुरुवात करण्याचे ठरवले. महात्मा हंसराज यांनी स्वामी दयानंद सरस्वती गेल्यानंतर अनेक वेळा शिक्षण संस्था स्थापन करण्याचा विचार केला. पण पैशाच्या अभावामुळे करता आले नाही. महात्माजींचे मोठे बंधू लाला मुल्खराज हे पण आर्य विचारक होते. त्याने महात्मा हंसराज यांचे पालन-पोषण केले होते. त्याने आपल्या वेतनातील आर्धी हिस्सा समाजसेवेसाठी देण्यास तयार झाले. 1 जून 1886 रोजी लाहोर मध्ये डी.ए.वी. स्कूलची स्थापना केली. पुढे 1889 मध्ये या स्कूलचे काॅलेजमध्ये रूपांतर झाले. पुढे 1896 पर्यंत यामध्ये इंजिनियरिंग काॅलेज चालू झाले. ज्याप्रमाणे उत्तरोत्तर विकास होत गेला त्याप्रमाणे हजारोच्या संख्यने या संस्थेला सदस्य मिळत गेले. आज संपूर्ण भारतात या संस्थेच्या शाळा व महाविद्यालयाची संख्या 915 इतकी आहे. या संस्थेला मिळालेले सदस्य संख्येमध्ये कमी वेतनावर काम करून आपले जीवन समर्पित करण्यास तयार झाले.
एखादी व्यक्ती स्वतः आदर्श व त्यागमय जीवन जगवे तरच इतर लोक प्रभावित होतात आणि त्याप्रमाणे अनुकरण करतात. महात्मा हंसराज यांच्या अंगी साधेपणा, उच्च विचारसरणी होती. ते स्वतः काॅलेजचे प्रिसिपल असून साध्या घरात राहत होते. दुष्काळ, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती प्रंसगी ते स्वतः अनुयायाबरोबर मदत करत असे. डी.ए.वी. आणि आर्य समाज या दोन्ही संस्था वैचारिकदृष्ट्या एकाच पातळीवर कार्यरत असून सध्या दोन्ही संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्रीमानजी पूनम सुरी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे.
महात्मा हंसराज यानी 1922 मध्ये केरळमधील 2500 पेक्षा जास्त लोकांना परत वैदिक धर्मात आणले. तसेच सन 1895 मध्ये बीकानेर मधील भिषण दुष्काळात सतत दोन वर्षे बचाव आणि सहकार्याचे कार्ये केले. अनेकांना धर्म परिवर्तन करण्यापासून रोखण्यात आले. यामध्ये लाला लाजपत राय मुख्य कार्यकर्ते होते. महात्मा हंसराज यांनी लाहोरमध्ये डी.ए.वी. स्कूल, डी.ए.वी. काॅलेज, दयानंद ब्राह्म विद्यालय, आयुवैदिक काॅलेज, महिला महाविद्यालय, औद्योगिक स्कूल, आर्य प्रादेशिक प्रतिनिधी सभा, आणि हरिद्वार मध्ये वैदिक मोहन आश्रम स्थापन केले.
महात्मा हंसराज यानी इंग्रजी शिक्षणाला विरोध केला होता. केवळ श्रीमंत व्यक्तीनां शिक्षण न देता गरीब लोकांना सुद्धा शिक्षण मिळाले पाहिजे आणि ते शिक्षण सरकाराने निःशुल्क दिले पाहिजे असे त्याचे मत होते. महात्मा हंसराज यांनी आपले संपूर्ण जीवन ध्येयनिष्ठ, तपस्या आणि त्यागामध्ये व्यतीत केले. तसेच समाजातील धर्म, देश, जाती यामधील भेद दूर करून आपले संपूर्ण जीवन समाजाच्या उद्धारासाठी, समाजाचे अज्ञान दूर करण्यासाठी घालविले. त्यानी आपल्या जीवनातील 74 वर्षापैकी 58 वर्षे निः स्वार्थपणे समाजाची सेवा केली. देश, धर्म, समाज आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान देणारे महात्मा हंसराज यांचा 15 नोव्होंबर 1938 मध्ये मृत्यु झाला. महात्मा हंसराज यांचे विचार आणि दृष्टीकोन यांचे महत्त्व आज ही तितकेच मोलाचे आहेत.
संदर्भ
१) An article on Mahatma Hansraj in "The Legacy of The Punjab" by R M Chopra, 1997, Punjabee Bradree, Calcutta. २) G. R. Thursby (1975) Hindu-Muslim relations in British India: a study of controversy, conflict, and communal movements in northern India 1923-1928, Published by BRILL, ISBN 90-04-04380-2. ३) Mahatma Hansraj, Maker of the Modern Punjab: Maker of the Modern Punjab, by Sri Ram Sharma. Published by Institute of Public Administration, 1965. डाॅ. बाळकृष्ण हरी माळी इतिहास विभाग दयानंद महाविद्यालय, सोलापूर.