महात्मा फुले कृषी विद्यापीठ म्हणजेच राहुरीचे कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील शेतकीचे विद्यापीठ आहे. कृृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी राज्यात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले राहुरीचे हे एक कृषी विद्यापीठ. वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत १९ मार्च १९६८ रोजी स्थापन झालेले हे विद्यापीठ महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातराहुरी या गावी आहे. स्थापना १९६८ साली झाली तरी ते १९६९ सालच्या ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित झाले. विद्यापीठाच्या परिसरापासून दक्षिणेस तीन कि.मी. अंतरावर अहमदनगर शहर, आणि उत्तरेस पन्नास किलोमीटरवर शिर्डी आहे. संत ज्ञानेश्वरांनी नेवासाच्या ज्या दगडाच्या शिलेवर बसून ज्ञानेश्वरी लिहिण्यास सुरुवात केली ती शिला असलेले नेवासा गाव हे राहुरीपासून ३३ कि.मी. अंतरावर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत कृषी संबंधित वेगवेगळे संशोधन केले जातात शेती व आधुनिक शेतीला उपयुक्त संशोधन सातत्याने या विद्यापीठामार्फत केले जाते, शेतीशी संबंधित अग्रगण्य असे हे विद्यापीठ आहे.