Jump to content

महसुली खर्च

महसूली खर्च तथा रेव्हेन्यू एक्‍सपेंडिचर हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरूपाचे खर्च असतात. पगार, अनुदाने, व्याज हे खर्च या प्रकारात मोडतात.

महसुली खर्च लेखांकीय संकल्पना

वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किवा एक वर्षाच्या आत नफा मिळण्याची शक्यता असते. व्यापाराची भविष्यात लाभ वाढण्याची शक्यता महसुली खर्चाने वाढत नाही पण सध्याच्या व्यापारात फायदा मिळवण्यासाठी महसुली खर्च करणे आवश्यक असते.

उदा. जाहिरातीवरचा खर्च, नोकरांचे पगार, स्टेशनरी तसेच चहापाण्याचा खर्च हे खर्च आवश्यक आहेत. या खर्चामुळे सध्याची विक्री वाढू शकते म्हणून हा महसुली खर्च . एखाद्या उद्योगाने गावातील चौक सुशोभित करण्यासाठी आणि तिथे कायमस्वरूपी जाहिरात करण्यासाठी खर्च केला तर अशी जाहिरात वर्षानुवर्षे तिथे राहू शकते म्हणून याला भांडवली खर्च म्हणत येईल.

अस्थगीत महसुली खर्च ( इंग्लिश : Deferred Revenue Expenditure)

जे खर्च महसुली स्वरूपाचे आहेत पण त्यांचा नफा एक वर्षाच्या आत उपयोगी आणता येत नाही त्यांना अस्थगीत महसुली खर्च असे म्हणतात. असे खर्च काही काळाने अपेल्खीत ( इंग्लिश : Write Off) करता येतात. अपलेखीत न केलेला खर्च ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला दर्शवितात.

उदा. चालू आर्थिक वर्षाचे आठ महिने झाल्यावर जाहिरातीच्या फलकाचे एक वर्षाचे कंत्राट घेतले. कंत्राटाचे सर्व पैसे आधी दिले तर त्या पैकी केवळ चार महिन्याचाच खर्च या वर्षाशी संबंधित आहे आणि बाकीचे आठ महिने पुढील आर्थिक वर्षाशी संबंधित आहेत. हा आठ महिन्याशी संबंधित खर्च, अस्थगीत महसुली खर्च म्हणून लेखांकित केला जाईल. चालू आर्थिक वर्षाचा ताळेबंद बनवताना ही रक्कम संपत्ती म्हणून दर्शवली जाईल आणि पुढील वर्षी तिला महसुली खर्चात वर्ग केले जाऊन अस्थगीत खर्चास अपलेखीत केले जाईल.