महंत अवैद्यनाथ
महंत अवैद्यनाथ | |
लोकसभा सदस्य गोरखपूर साठी | |
पुढील | योगी आदित्यनाथ |
---|---|
जन्म | २८ मे १९२१ कांडी, पौडी गढवाल, उत्तराखंड |
मृत्यू | १२ सप्टेंबर, २०१४ (वय ९३) गोरखपूर, उत्तर प्रदेश |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
धर्म | हिंदू |
महंत अवैद्यनाथ (जन्मनाम कृपाल सिंह बिष्ट" २८ मे १९२१, मृत्यु: १२ नोव्हेंबर २०१४) हे एक भारतीय राजकारणी व महंत होते. भारतीय जनता पक्षाचे सदस्य राहिलेले अवैद्यनाथ ४ वेळा गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. ते हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष तसेच गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत होते. ते विद्यमान महंत व खासदार योगी आदित्यनाथ ह्यांचे गुरू मानले जात. त्यांनी राम जन्मभूमी चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती.