Jump to content

मल्लिका साराभाई

मल्लिका साराभाई या प्रख्यात नर्तकी मृणालिनी साराभाई व अणुशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या कन्या होत. मृणालिनींनी स्थापन केलेल्या दर्पण अकादमीच्या त्या संचालक आहेत.

Mallika Sarabhai in play AKABR directed by Arvind Gaur

राजकारण

मल्लिका साराभाई यांनी सामाजिक कार्य केले आहे तसेच यांनी अनेकदा नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सद्भावना मिशनच्या दरम्यान मल्लिका साराभाई यांनी त्यांना विरोध दर्शवला होता. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलींच्या मुद्यावरून मल्लिका साराभाई यांनी मोदींवर टीका केली होती. या प्रकरणी मल्लिका यांनी सुप्रीम कोर्टात केसही दाखल केली होती. नरेंद्र मोदींचे नेतृत्वातील गुजरातमधील सरकार हे केवळ श्रीमंतांचे सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली होती. समाजातील मध्यमवर्ग आणि गरीबांसाठी या सरकारने काहीही केले नसल्याचे साराभाई म्हणाल्या होत्या.

निवडणुकीत सहभाग

मल्लिका साराभाई या १९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसपक्षातर्फे निवडणुकीत उभ्या राहून विजयी झाल्या होत्या.

२००९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मल्लिका साराभाई या त्यावेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अर्ज सादर केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी साराभाई या काँग्रेसच्या उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण तरीही त्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस हायकमांडने गुजरात काँग्रेसला मल्लिका साराभाई यांची मदत करण्याचे आदेश दिले होते, अशी चर्चा होती.[ संदर्भ हवा ]

द्वेषाच्या राजकारणाविरोधात सत्याग्रही असल्याचे सांगत मल्लिका यांनी अडवाणींच्या विरोधातील उमेदवारीबद्दल मत मांडले होते. मात्र अडवाणींच्या विरोधात त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.

आम आदमी पक्षात दाखल

इ.स. २०१४मध्ये मल्लिका साराभाई यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. आपण पक्षासाठी सैनिकाचे काम करणार असल्याचे सांगत त्या आपमध्ये सहभागी झाल्या होत्या. आम आदमी पार्टी आणि आपली मूल्ये सारखी असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.