Jump to content

मलिक अंबर

मलिक अंबर
१६२० में मुगल दरबारी कलाकार द्वारा मलिक अंबर का चित्र[][]
जन्मनाव वाको[]
चापू []
जन्म १५४८[]
हरार[]
मृत्यू ११ मे 1626 (aged 77–78)
खुलदाबाद, अहमदनगर सलतनत
(सध्याचे खुलताबाद, औरंगाबादजिल्हा, महाराष्ट्र, भारत)
समाधीखुलदाबाद, औरंगाबादजिल्हा, महाराष्ट्र, भारत
Allegiance अहमदनगरचे निजाम शहा
नातेवाईक मुले - १ फतेह खान
२ चंगीस खान
मलिक अंबरची खुलताबाद जि. औरंगाबाद येथे असलेली कबर (इ.स. १८६० चे छायाचित्र)

मलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हे मूर्तझा निजामशहा दुसरा ह्यांच्या अहमदनगर निजामांशाही मध्ये प्रधान होते.(वजीर ए आजम)मलिक अंबर यांचा जन्म अंदाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामध्ये झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र (गनीमी कावा चे जनक)आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्नेंने आणि स्वामीनिष्ठ प्रधान होते. त्यांनी मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. खडकी / औरंगाबाद ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.

प्रारंभिक जीवन

मलिक अंबरला चेंगिज खान याने विकत घेतले, जो एक माजी हबशी गुलाम होता जो अहमदनगर सलतनत पेशवा किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत होता.[]


सुरुवातीचा काळ

मलिक अंबर हा जन्माने इथियोपिया येथील होता.[] त्याच्या आई-वडिलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो दख्खन प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.

महसूल व्यवस्था

दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली.[] इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरूपात न गोळा करता पैशाच्या रूपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठरावीक रकमेवर निश्चीत न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली. त्यामूळे कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.

कार्य

निजाम शाहांचे चित्र
मलिक अंबर आणि मुर्तझा निजाम शाह दुसरा
मालिक अंबर पेंटिंग क. 1610-20

एकदा त्यांचे मालक मरण पावले, मलिक अंबरला त्याच्या मालकाच्या पत्नीने मुक्त केले. स्वतंत्र झाल्या नंतर त्यांनी लग्न केले, आणि काही काळ विजापूरच्या सुलतानाची सेवा केली आणि या काळात त्याला "मलिक" ही पदवी मिळाली. परंतु अंबरने निजामशाही सैन्यात सेवेत प्रवेश करण्यापूर्वी अपुऱ्या पाठिंब्याचे कारण देऊन ही सेवा सोडली.[] मलिक अंबर हे अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचे 1600 ते 1626 या कालावधीत राजा होते. या काळात त्यांनी मुर्तझा निजाम शाह II चे सामर्थ्य आणि सामर्थ्य वाढवले आणि मोठे सैन्य उभे केले. त्यांनी एक घोडदळ उभारला जो अल्पावधीत 150 ते 7000 पर्यंत वाढला आणि उत्तरेकडून मुघलांचे हल्ले परतवून लावण्यासाठी कठपुतळी सुलतानांची नियुक्ती करून अहमदनगर सल्तनतीचे पुनरुज्जीवन केले.[] 1610 पर्यंत, त्यांच्या सैन्यात 10,000 हबशी आणि 40,000 दखणी यांचा समावेश झाला.[] पुढच्या दशकात, मलिक अंबर मुघल सम्राट जहांगीरच्या राज्याचा ताबा घेण्याच्या प्रयत्नांशी लढून पराभूत करण्यात यशस्वी झाला.

मृत्यू

८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबर यांचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबरच्या मृत्यू नंतर त्यांच्या कबरी बद्दल अनेक वाद आहेत एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर एक कबर घाटी दवाखान्यात आहे असा उल्लेख मिळतो

संदर्भ

  1. ^ शेख चांद, मलिक अंबर,"एहदे आफरीन; हैदराबाद; 1929
  2. ^ Times of India, Plus Supplement, July 1999,
  3. ^ a b Kenneth X. Robbins; John McLeod (2006). African Elites in India. Mapin. p. 50. ISBN 81-88204-73-0. OCLC 701823920.
  4. ^ a b "Malik Ambar: The Ethiopian slave who became a kingmaker in India".
  5. ^ a b c Chinmay Tumbe, India Moving: A History of Migration (2019), p.29
  6. ^ [बॉंबे प्रेसिडेंसी गॅझेटीयर]
  7. ^ सुनीत पोतनीस. जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन. लोकसत्ता . 12-03-2018 रोजी पाहिले. या पद्धतीमुळे महसूल वाढून राजकोषावरचा पडणारा ताण कमी झाला. वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ Slavery & South Asian history. Chatterjee, Indrani., Eaton, Richard Maxwell. Bloomington: Indiana University Press. 2006. ISBN 978-0-253-11671-0. OCLC 191950586.CS1 maint: others (link)