मर्सेडीझ हेरेरा
मर्सेडीझ हेरेरा मॉन्डेगो हे अलेक्झांडर ड्युमाच्या द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (फ्रेंच: ल कोम्टे दि मॉन्टे-क्रिस्टो) या महाकादंबरीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे.
मर्सेडीझ कादंबरीचा नायक एडमंड डान्टेसची प्रेयसी असते व डान्टेस तुरुंगात गेल्यानंतर काही काळाने ती डान्टेसचा मित्र व स्वतःचा आतेभाऊ फर्नांड मॉन्डेगो याच्याशी लग्न करते. फर्नांडपासून तिला आल्बेर नावाचा मुलगा होतो.
कादंबरीमध्ये हिच्या लग्नाआधीच्या आडनावाचा उल्लेख फक्त एकदा ९१व्या प्रकरणात येतो, जेव्हा ती आपल्या वडीलांचे आडनाव हेरेरा असल्याचे सांगते.