Jump to content

मरिया ऑरोरा कूतो

मरिया ऑरोरा कूतो या भारतीय लेखिका, इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्या मूळच्या गोव्यातील आल्दोना गावाच्या असून त्यांनी नवी दिल्लीच्या महाविद्यालयांतून इंग्लिश साहित्य शिकविले आहे. त्यांनी लिहिलेली गोवा: अ डॉटर्स स्टोरी या कादंबरीस विशेष प्रसिद्धी मिळाली. २०१०मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.