Jump to content

मराठीचा वर्णक्रम

मराठीचा वर्णक्रम म्हणजे मराठी भाषेतील उच्चारित सुट्या ध्वनींचा किंवा मराठी भाषेच्या लेखनासाठी वापरण्यात येणाऱ्या देवनागरी लिपीतील अक्षरांचा क्रम. वर्णांचा क्रम हा विविध निकषांनुसार लावता येतो. बहुतांश वेळा लिपीचे स्वरूप आणि लेखनव्यवहाराची परंपरा हे घटक वर्णक्रम निश्चित करत असतात. देवनागरी लिपी ही मराठीव्यतिरिक्त संस्कृत, हिंदी, कोंकणी इ. भाषांचे लेखन करण्यासाठीही वापरण्यात येते. मात्र त्या त्या भाषांत काही अक्षरे वेगळी असल्याने आणि परंपरेने क्रम लावण्याचे संकेत वेगळे असल्याने ह्या भाषांची लिपी समान असली तरी त्यांतील वर्णक्रम हे काही अंशी परस्परांहून वेगवेगळे आहेत.

महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला व वर्णक्रम

महाराष्ट्र शासनाने दि. ०६ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसृत केलेल्या शासननिर्णयानुसार[] मराठीची वर्णमाला आणि वर्णक्रम ह्यांची निश्चिती करण्यात आलेली आहे. ही वर्णमाला व वर्णक्रम पुढीलप्रमाणे आहे.[]

स्वर

अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ॲ ऐ ओ ऑ औ

स्वरादी

ं (अनुस्वार), ः (विसर्ग)

व्यंजने

क् ख् ग् घ् ङ्

च् छ् ज् झ् ञ्

ट् ठ् ड् ढ् ण्

त् थ् द् ध् न्

प् फ् ब् भ् म्

य् र् ल् व्

श् ष् स्

ह् ळ्

विशेष संयुक्त व्यंजने

क्ष् ज्ञ्

अंक

० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९

संदर्भ

  1. ^ a b महाराष्ट्र-शासनाचा वर्णमाला व वर्णक्रमाविषयीचा शासननिर्णय

मराठी व्याकरण