Jump to content

मराठी विश्वकोश



मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासन तयार करवून घेत असलेला आणि मुळात पुस्तकरूपात असलेला मराठी ज्ञानकोश आहे. तो आता डिजिटल झाला आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर ऑनलाइन व मोफत वाचता येतो.[]

मराठी विश्वकोशाच्या विसाव्या खंडाचा पूर्वार्ध जानेवारी २०१५मध्ये आणि उत्तरार्ध जून २००१५मध्ये प्रकाशित करण्यात आला.[] मूळ २० छापील खंडांचे डिजिटायझेशन करून ते क्रमाक्रमाने आंतरजालावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम २५ ऑक्टोबर २०११ पासून सुरू झाला. प्रकाशित झालेले २० खंड आंतरजालावर सीडॅकच्या सहकार्याने आले आहेत. मानव्य विद्या विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयाचे ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो .

पुरस्कार

  • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने पुण्यातील ‘सी-डॅक जिस्ट’च्या सहकार्याने निर्माण केलेल्या ‘मराठी विश्वकोश डॉट इन’ या संकेतस्थळला ई-गव्हर्नन्सचा ‘प्लॅटिनम ॲवॉर्ड’ मिळालेला आहे.[]

मराठी विश्वकोशाची विषयव्याप्ती

मराठी विश्वकोशात सुमारे शंभर विषयांवरील विविध नोंदींचा समावेश आहे.

मानव्यविद्या

पहा मुख्य लेख : मानव्यविद्या

विज्ञान व तंत्रविद्या

  • अभियांत्रिकी
    • अणुक्रेंदीय
    • नाविक
    • यांत्रिक
    • रासायनिक
    • विद्युत्
    • वैमानिकी
    • संदेशवहन
    • स्थापत्य
    • स्वयंचल
  • अवकाशविज्ञान
  • उद्योगव्यापार
  • कीटकविज्ञान
  • कृषिविज्ञान
  • गणितशास्त्र
  • जीवरसायनशास्त्र
  • ज्योतिषशास्त्र
  • धातुविज्ञान
  • पशुविकारविज्ञान
  • प्राणिविज्ञान
  • भूविज्ञान
  • भौतिकी
  • मत्स्योद्योग
  • रसायनशास्त्र
  • वनस्पतिरोगविज्ञान
  • वनस्पतिविज्ञान
  • वातावरणविज्ञान
  • वैद्यक : (१) मानवी, (२) पशू
    • (अ) औषधविज्ञान,
    • (आ) चिकित्सा,
    • (इ) रोगविज्ञान.
  • वैज्ञानिक संस्था
  • शारीरक्रियाविज्ञान
  • शारीर
  • संग्रहालये
  • सांख्यिकी
  • सूक्ष्मजीवविज्ञान

घटक खंडांचे विवरण

मराठी विश्वकोश खंडपरिचय
खंड क्र.पहिली नोंदअखेरची नोंदपृष्ठे†प्रकाशन
०१अंकआतुर चिकित्सा९४४१९७६
०२आतुर निदानएप्स्टाइन, जेकब१०४२१९७६
०३एबिंगहाऊस, हेरमानकिसांगानी९६५१९७६
०४कीकटगाल्फिमिया ग्लॉका९९७१९७६
०५गाल्वा, एव्हारीस्तचेदि१०२२१९७६
०६चेन, सर एर्न्स्ट बोरिसडोळा१०८३१९७७
०७ड्यूइसबुर्कधरणगाव१०७८१९७७
०८धरणे व बंधारेन्वाकशॉट११११-
०९पउमचरिउपेहलवी साहित्य११४३-
१०पैकाराबंदरे१२५३-
११बंदाब्वेनस एअरीझ१११२-
१२भंगुरतारामहाराष्ट्र राज्य१५८६-
१३महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ (मेल्ट्रॉन)म्हैसूर संस्थान१३२८-
१४यंग, एडवर्डरेयून्यों बेट१३०७-
१५रेल्वेवाद्य व वाद्यवर्गीकरण१३९६-
१६वाद्यवृंदविज्ञानशिक्षण९९९-
१७विज्ञानाचे तत्त्वज्ञानशेक्सपिअर, विल्यम८९३फेब्रुवारी २००७
१८शेख अमरसह्याद्रि८७७ऑगस्ट २००९
१९सॅंगर, फ्रेडरिकसृष्टि व मानव-संकेतस्थळावर उपलब्ध
२० पूर्वार्धसेई शोनागुनहर्षचरित७५४जानेवारी २०१५
२० उत्तरार्धहर्षवर्धन समाटझेयवाद७५५-१३३६जून २०१५
२१परिभाषा-संग्रह--आगामी
२२मानचित्रसंग्रह--आगामी
२३सूची--आगामी

† केवळ नोंदींच्या मजकुराच्या पृष्ठांचाच समावेश. आरंभीच्या पृष्ठांचा आणि प्रत्येक खंडाच्या अखेरीस असलेल्या चित्रपत्रांचा समावेश नाही.

हे सुद्धा पहा

संदर्भ व नोंदी

  1. ^ https://vishwakosh.marathi.gov.in/
  2. ^ "मराठी विश्वकोश इतिहास". मराठी विश्वकोश. 2019-11-06 रोजी पाहिले.
  3. ^ म.टा. प्रतिनिधी (७ सप्टेंबर २०१३). "विश्वकोशाच्या वेबसाइटला 'प्लॅटिनम ॲवॉर्ड'". महाराष्ट्र टाईम्स. मुंबई. ११ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे