मराठी भाषेची उत्पत्ती
- आणि
मराठी भाषेची उत्पत्ती
मराठी भाषा कधी जन्मास आली असावी असा प्रश्न उपस्थित करत मराठी भाषेच्या उत्पत्तीच्या दिशेने शोध घ्यावा लागतो. मराठीचा उगम शोधता येणे शक्य आहे का ? भाषा ही नदीसारखी प्रवाही असते, तसेच ती सतत मंद गतीने बदलत असते असे काही तात्त्विक सिद्धांत मांडल्यानंतर मराठी भाषा ही कोणत्या तरी या स्टेशन पासून सुरू झालेली आहे असे म्हणता येईल का? भाषेचा जन्म काल शोधणे शक्य नसते कारण भाषा सतत बदलत असल्यामुळे तिच्या रूपात सतत बदल होत असतो. नदी जशी वळसे घेत जाते तशी भाषा देखील अनेक कारणांनी बदलत असते.
तरीही माणसाला माणूस कधी जन्माला आला याची जशी जिज्ञासा असते, तशीच जिज्ञासा . आपली भाषा कधी जन्मास आली असावी अशी जिज्ञासा आहे. भाषेचा अभ्यास मागे जाऊन करावा लागतो. म्हणजेच भाषा भूतकाळात कसकशी वाहत आली? कशी बदलत आली? कोणत्या प्रकारे बदलत आली? याचा शोध घ्यावा लागतो.
भाषा विज्ञान पद्धती
इतिहासात जाऊन भाषेचा अभ्यास करणारी जि भाषा अभ्यास पद्धती आहे तिला ऐतिहासिक भाषा विज्ञान पद्धती असे म्हणतात .इतिहासात जाऊन तेथून भाषेचे कालखंड स्थापित करून प्रत्येक कालखंडात भाषेचे रूप कसे होते हे आपल्याला पाहता येते. सर विल्यम जोन्स या संस्कृत भाषेच्या अभ्यासकाने इतिहासात जाऊन ग्रीक लटीन व संस्कृत भाषेत असलेल्या साम्य दर्शक शब्दांच्या आधारे या तिन्ही भाषा एकाच भाषेतून जन्माला आल्या असाव्यात असं निष्कर्ष काढला. या त्याच्या अभ्यासात त्याला तीन भाषेची तुलना करावी लागली. त्यामुळे त्याच्या कामामुळे ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती व तौलनिक भाषाविज्ञान पद्धती आपल्याला मिळाल्या. मराठी भाषेचा विकास कसा झाला हे पाहण्यासाठी आपणालाही या पद्धती वापरून शोध घेता येईल
साधारणतः मराठीत उपलब्ध असलेल्या प्राचीन ग्रंथांच्या आधारे मराठी कोणत्या काळात होती हे आपल्याला सांगता येते .मराठीत शके १११० मध्ये विवेकसिंधु हा ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला असे आपण म्हण्तो.म्हणजे १२ व्या शतकात मराठी भाषा बोलली तर जात होतीच पं तिच्यातून ग्रंथ लिहिल्याचे पुरावे आपल्याला मिळतात .लीळाचरित्र इ.स् १२८३ मध्ये व ज्ञानेश्वरी इ.स्. १२८८मध्ये लिहिली आहे .१३ वे शतक मराठीत बरेच ग्रंथ लेखन झाल्याचे आपणास सांगते .यादव काळात मराठी भाषेला चांगली सुख समृद्धी मिळाल्याचे दिसते ,यादव काळाच्या मागेजाऊन मराठी भाषा कधी अस्तित्वात होती हे पहावयाचे असेल तर आपल्याला शिलालेख व ताम्रपट या ऐतिहासिक साधनाच्या आधारे मराठीचा शोध घ्यावा लागतो