मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था
मराठी भाषा संरक्षण समिती ही मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था या नावाने ऑक्टोबर २००० मध्ये नोंदणीकृत झाली.[१] शांताराम दातार हे ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.[२]
महाराष्ट्रात शासकीय, न्यायालयीन इ. सर्व व्यवहारांत मराठी भाषेचा पूर्णपणे वापर व्हावा, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.[२] ठाणे जिल्हात कल्याण येथे संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय आहे.[१]
- १९९८ च्या अधिसूचनेप्रमाणे तालुका पातळीवरील न्यायालये व जिल्हा पातळीवरील न्यायालये ह्यांमध्ये पूर्णपणे मराठीतून कामकाज व्हावे
- घटनात्मक तरतूदीप्रमाणे मराठी भाषा ही मुंबई उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा व्हावी
- महाविद्यालयीन शिक्षणात मराठी भाषा हे शिक्षणाचे एक माध्यम म्हणून उपलब्ध करून देण्यात यावे
- मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी
ह्या उद्देशाने विविध उपक्रमांद्वारे संस्था कार्य करत असते.[२]
संदर्भ
- ^ a b अधिकृत संकेतस्थळ.
- ^ a b c संस्था परिचय.
संदर्भसूची
- "अधिकृत संकेतस्थळ : मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था". ७ जुलै २०१८ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
- दातार, शांताराम. "... जरी आज ती राजभाषा असे!". २९ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
- "संस्था परिचय : मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेच्या संकेतस्थळावरील". १७ जून २०१८ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.