मराठी बौद्ध साहित्य
बौद्ध साहित्य म्हणजे बौद्ध धर्मासंबंधी साहित्य. बुद्धधर्मीयांनी लिहिलेले साहित्य नव्हे. लेखात अशा कुठल्याच साहित्याचा नामनिर्देश नाही.
बौद्ध साहित्य प्रसार संस्था या संस्थेची स्थापना केवळ बौद्ध म्हणुन बौद्धांच्या अस्मिता जागृत करण्याच्या दृष्टिने करण्यात आली.आजपर्यंत दलित म्हणुन अनेक साहित्य संमेलने झाली परंतु ती केवळ मोजक्याच प्रतिक्रिया देऊन गेली.अन बौद्धांच्या अस्मितेशी आजमितीस असणारा प्रश्न आहे तो पुन्हा जसाचा तसाच उपेक्षीत राहत गेला. दलित,दलित म्हणुन दलित विभागला गेला त्यामुळे दलित म्हणुन कोणीही अत्याचार करावेत अन् दलितांनी रस्त्यावर उतरावे येथपर्यंतच आपली मजल राहिली परंतु प्रतिबंधात्मक उपायोजनाना साहित्यातुन आली ना,राज्यकर्त्यांतून आली.ख-या अर्थाने या 85 टक्के दलितांच्या मतावर सरकार स्थापले जाते अन् त्यातुन दलित हा वंचितच हेतुपुरस्पर राखण्यात प्रस्थापीतांनी यश मिळविले हे सोडवण्यासाठी अजुनही आपले डोळे उघडतच नाहीत हिच मोठी शोकांतीका या संस्थेच्या स्थापने पर्यंत चालुच होती.बौद्ध साहित्य म्हणजे नेमके काय हे दलित साहित्याहुन वेगळे आहे का ? असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा काय मांडणी करावी हा विचार येऊन न्याय,स्वातंत्र्य,मैत्रबंधुभाव जसेच्या तसे ठेवुन समता टिकवावी का ? स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे असेही प्रश्न पुन्हा उभे राहिल्याने.आजचा हा जातीपातीत विभागलेला समाज तथागतांच्या काळात सागरासारखा एकसंघ होता.तसेच तथागतांच्या काळात पाली हीच बोली भाषा होती.पाली भाषा ही सम्राट अशोक यांच्या कालखंडापर्यंत होती. सम्राट अशोकाचे साम्राज्य भारतात खूप दूरवर होते. सम्राट अशोकाच्या नंतर काळाच्या ओघात अन् कलपरिवर्तनात पालीभाषा लुप्त झाली अन् आज जी बोली भाषा बोलली जाते ती मराठी तेव्हा मराठी या भाषेतून बौद्ध साहित्य असावे या उद्देशाने प्रेरित होऊन बौद्ध साहित्य निर्मितीस चालना मिळाली.तसेच दलित न म्हणता बौद्ध म्हणुन,बहुजन समाजमनाचा आरसा म्हणुन प्रतिबिंबीत होणारे मराठी भाषेत बौद्ध साहित्य असावे याच उद्देशाने संपूर्ण भारतातुन पहिलीच एक बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे रजिस्ट्रेशन करण्यात आले.बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे रजिस्ट्रेशन क्रमांक महा./1510/18/ठाणे व ट्रस्टचा रजि.क्रमांक एफ – 39323 असा असून नीती आयोगाकडील युनिक आयडी क्रमांक MH/2018/0214195 असा आहे यातच आपल्या सर्व भारतीय बौद्ध बांधवांची बौद्ध म्हणुन अस्मिता आहे.
1] मराठी बौद्ध साहित्य निर्मितीचीची कारण मीमांसा
बौद्ध साहित्याकडे डोकावले असता काळाच्या ओघात अन् पृथ्वीच्या पोटात जे काही उत्खनानाने मिळते ते सर्वकाही बौद्ध संस्कृतीचेच पुरावे सापडत असल्याने बौद्ध संस्कृती अन् साहित्य या विषयी जिज्ञासा जागृत होते. या विषयीची माहिती ही बौद्धग्रंथ त्रिपीटकात असल्याने बौद्ध साहित्याचा खजिना हा त्रिपीटक असल्याचे निष्पन्न होते.तसेच युद्ध नको बुद्ध हवा असल्याने सर्व जगाचे शांतीदुत तथागत भगवान गौतम बुद्ध असल्याने या शांतीदुताचा वैभवशाली भारत अन् बौद्ध साहित्य कसे असेल याची उत्सुकता संपूर्ण विष्वाला आहे.तेव्हा बुद्धभुमी म्हणुन या भारतात डोकावले असता बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया ही भुमीच बौद्धांच्या ताब्यात नाही येथील बौद्धांच्या पवित्र स्थानाला विहार म्हणतात ते महाबोधी विहार असुनही त्याला महाबोधी टेम्पल असे संबोधले जाते,शिवाय हे महाबोधी टेम्पल भारत स्वतंत्र होवुन 72 वर्शे झाले परंतु अदयाप महाबोधी टेम्पल अॅक्ट 1945 नुसार अजुनही ते स्वतंत्रपणे बौद्धांच्या ताब्यात नाही.अजुनही टेम्पल अॅक्ट 1945 रद्य व्हावा असे येथल्या राज्यकर्त्यांना वाटत नाही.या महाबोधी विहारातच बॉम्ब स्फोट घडवले जातात तसेच 20 व्या शतकातही भारतात कोठेना कोठे दर पाच मिनिटाला बौद्धांवर अन्याय अत्याचार होतात.असे या भारतभुमीचे खरे वास्तव स्वरूप आहे.तर भारतीय साहित्यक्षेत्रात साहित्यिक म्हणुन डोकावले असता संपूर्ण भारतात बौद्धसंस्कृती नुसार आणि बदलत्या काळात मराठी भाषेतून पाली भाषेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपलीही एक दर्जेदार साहित्य संस्था असावी आणि दलित म्हणुन उपेक्षीत न राहता आपल्या स्वतःच्या हाताच्या ओंजळीने पाणी पिता यावे तसेच आपलीही प्रगती व्हावी या उद्येशाने या संस्थेची स्थापना करण्याचे ज्येष्ठ साहित्यिक,कवी, लेखक,समिक्षक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी ठरविले.त्यावेळी असलेल्या दलित साहित्यातीलच आपली मातब्बर साहित्यिक मंडळींजवळ हा विषय त्यांनी बोलुन दाखविताच त्यांनाही आवडला.सुरुवातील आम्ही कविसंमेलने घेत राहिलो आणि त्यातुनच भारतीय बौद्ध साहित्य परिषद संस्था उभी राहिली याचे सारे श्रेय प्रा.शुक्राचार्य गायकवाड सरांना जाते.या बौद्ध साहित्य परीषद,बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे दिनांक 22/10/2017 रोजी डोंबिवली येथील सर्व्हेश हॉल मध्ये दै.वृत्तरत्न सम्राटचे संपादक आदरणीय बबनराव कांबळे साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले त्याप्रसंगी साहित्यिकांना उद्देशुन बोलताना आदरणीय कांबळे साहेब म्हणाले स्वाभिमान जागवा,नवीन पिढी तुमची वाट पाहत आहे तेव्हा साहित्यिकांनी वाघासारखे,सम्राटासारखे रहा.सम्राटच्या सम्राटने स्वाभिमान जागवल्याने भारतीय बौद्ध साहित्य परिषदेचा कळवा येथील बौद्ध विकास मंडळाचे नालंदा बुद्ध विहार ते सणसवाडी पुणे येथील बुद्धीस्ट मुव्हमेंट ट्रस्टचे नालंदा बुद्ध विहार असा साहित्यमयी प्रवास होवुन पहिले एक राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन पुणे येथे सणसवाडीला यशस्वीपणे पार पडले. रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली पहिलीच ही बौद्ध साहित्य प्रसार संस्था असल्याचा सार्थ अभिमान आपल्या सर्व बौद्ध साहित्यिक बांधवांना आहे यातच तो मला लाभलेला आहे.या संस्थेच्या ध्येय धोरणांची प्रभाविपणे अंमलबजावणी करून साहित्यक्षेत्रातील बौद्ध साहित्य आणि तथागतांचा धम्म जगाच्या पाठीवर सर्वत्र पोहोचवुन त्याचा प्रचार अन् प्रसार करण्याचे काम आपल्या सर्व साहित्य बांधवांवर येऊन ठेपले आहे. तेव्हा सर्व बौद्ध साहित्यिक बांधवांनी आपल्या मुळअंगी असलेल्या शुद्ध स्वरूपातल्या साहित्यिक सुप्तगुणांना उजाळा देऊन,विधायक कामे करून,आपलीही शुद्धबौद्ध साहित्यकृती या संस्थेच्या माध्यमातुन सर्वांना मिळावी त्याचा सर्वत्र जगभर प्रचार अन् प्रसार व्हावा त्याचबरोबर तुमचाही संस्थेबरोबरच नावलौकिक व्हावा याच शुद्ध हेतुने बौद्ध साहित्य प्रसार संस्था हिची स्थापना करण्यात आली असुन हा एक आपल्याला मिळालेला प्लॅटफॉर्म आहे याचे आपण सोने करून !!! अत्त दिप भव !!! प्रमाणे स्वतः उजाळुन दुस-यांसही उजाळुन काढाल हिच अपेक्षा व्यक्त करतो.
1-1] मराठी बौद्ध साहित्य निर्मितीचे ध्येय,धोरण,उद्देश
1) संस्थेचे नांवः-बौद्ध साहित्य प्रसार संस्था 2) संस्थेच्या कार्यालयाचा पत्ताः-302 गजबंधन, पाथर्ली रोड,गोग्रास वाडी,श्री मंगल कार्यालया समोर,डोंबिवली (पुर्व) डोंबिवली - 421201 3 -अ) संस्थेचे उद्देश:- 1) मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला सुसंस्कृत वळण लावणे 2) साहित्यातुन समाजाच्या अंर्तमनाचा कायापालट करणे 3) मानवी सांस्कृतीमुल्यांचा साहित्यातुन अविश्कार करणे 4) भारतीय बौद्ध संस्कृतीचा व परंपरेचे साहित्याच्या माध्यमातुन जतन व संवर्धन करणे 5) पाली भाषेबरोबरच मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे 6) बौद्ध साहित्याचे प्रचार व प्रकारा करीता साहित्य सभांमध्ये कवी संमेलन आयोजीत करणे
1-1-अ) उद्देष आणि ध्येय धोरणे:- साहित्यिक,सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक
1) वैज्ञानिक आणि निसर्ग नियमांला अनुसरून नैतिक व्यवस्था राखुन,अनुमानात्मक अंधकाराच्या,अज्ञानातुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे मानवाला मानवांच्यासाठी सदाचाराच्या मार्गाने मानवाची दसदिशांतील सर्वक्षेत्रांत प्रगती करून,मानवाच्या राहणीमानाचा दर्जा वाढवुन मानवांच्या प्रगती बरोबरच अषा सर्व क्षेत्रांचे संवर्धन व जतन करून प्रचार अन् प्रसार करणे. 2)लोकांच्या ज्ञानात वृत्तीत अन् कृतीत बदल घडवुन स्वःकल्याण व परकल्याण करणेकामी साहित्याच्या माध्यमातुन संविधान साक्षर भारत अभियान राबविणे. 3) तथागत गौतम बुद्धांच्या वैश्विक मुल्यांना आधार मानुन साहित्य निर्मिती करणे. 4)मानवता’ केंद्रबिंदु ठेवुन साहित्य लेखनास चालना देणे. 5)नवोदीत साहित्यिकांना प्रोत्साहीत करून कल्याणकारी व्यवस्था निर्मितीसाठी लेखनास प्रेरीत करणे. 6) सांविधानिक मुल्यांचे संरक्षण करणे. 7) डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीसूर्य जोतिबा फुले,स्वामी पेरीयार व अन्य बहुजन महापुरुषांचे साहित्य पुर्नप्रकाशीत करून / समिक्षात्मक लेखन करून प्रचार व प्रसार करणे. 8) बौद्ध संस्कृतीचे अवशेष साहित्याच्या माध्यमातुन संशोधनाच्या माध्यमातुन प्रकाशीत करणे. 9)परिवर्तनवादी बौद्ध साहित्य संम्मेलने भरविणे. 10) बहुजन समाजात सम्यक वाचन संस्कृती विकसीत करून धम्म विचारांचा प्रचार अन् प्रसार करणे. 11)साहित्याच्या माध्यमातुन बहुजन समाजात शैक्षणिक,वैचारिक,सामाजिक,सांस्कृतिक, व साहित्य क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवुन आणणे. 12)परिवर्तनवादी व धम्म विचारांचा प्रचार व प्रसार करणे. 13)साहित्यिकांना प्रोत्साहीत करण्यासाठी दर्जेदार साहित्य मोफत प्रकाशीत करणे. 14) कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी षासनाच्या विविध योजनांद्वारे त्या योजनांची माहिती देणे. 15) बौद्ध संस्कृतीच्या उदात्त मुल्यांचा प्रचार व प्रसार करणा-या दर्जेदार जागतिक साहित्याचे विविध भाषांमध्ये भाषांतर करणे. 16) पाली भाषेचे व पाली भाषेतील साहित्याचे संशोंधन करणे. 17) संकेतस्थळांद्वारे परिवर्तनवादी साहित्यिकांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविणे. 18) बौद्ध साहित्य परिषदेच्या माध्यमातुन शिबीर,विविध स्पर्धा,व्याख्यानमाला,साहित्य संम्मेलने,विविध साहित्य तसेच सामाजिक पुरस्कार सोहळे आयोजीत करणे. 19) बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदिक्षेसमयी दिलेल्या 22 प्रतिज्ञांच्या अनुषंगाने विस्तृत लेखनास प्रेरीत करणे. 20) बहुजनवादी साहित्य प्रवाहांना बौद्ध साहित्य प्रसार संस्थेत सामील करून एकत्रितपणे बहुजनवादी साहित्याची निर्मिती करणे. 21) वाचनालय चालविणे,व्यक्तीमत्व व विकास वाढविणेसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे. 22) धार्मिक व आध्यात्मिक कार्यासाठी विपष्यना,श्रामणेर तसेच बालसंस्कार शिबीरांचे व धार्मिक,आध्यात्मिक प्रवचनांचे आयोजन करणे. 23) बौद्ध संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे कामी प्रचार व प्रसार करणे.
2] अभिजात मराठी बौद्धसाहित्य
2.1] कविता
नव्हती कोणाचीच हिम्मत
नव्हती कोणाचीच हिम्मत तुमच्यापुढे उभे राहण्याची
आज रांग लागली तुमच्या समवेत बसणा-यांची
जाण नाही ठेवली तुमच्या त्या त्यागाची
खातो तो घास,घेतो तो श्वास अन् नेसतो त्या वस्त्राची
नव्हती कोणाचीच हिम्मत तुमच्यापुढे उभे राहण्याची !! 1 !!
आहे का तयारी कणकण शरिराचा झिजविण्याची
तोड नाही इतिहासात निःस्वार्थ अन् प्रामाणिकपणाची
सुसंस्कृत व्हावा समाज म्हणुन कदर नाही केली मंत्रीपदाची
या भुतलावरती सर नाही तुमच्या त्या खंबीरनेतृत्वाची
नव्हती कोणाचीच हिम्मत तुमच्या पुढे उभे राहण्याची !! 2 !!
कणकण ज्ञानाचा वेचुनी करील का बरोबरी कोणी प्रज्ञासूर्याची
त्याही काळात होळी केली मनुस्मृतीची
आज भाशा आहे सत्तेसाठी राजकारणातल्या युतीची
आहे का चिड तुम्हाला तुमच्या अस्मितेची
नव्हती कोणाचीच हिम्मत तुमच्यापुढे उभे राहण्याची !! 3 !!
ग्रंथ हाची गुरू जाणुनी,ग्रंथप्रेमी म्हणुनी ग्रंथासाठी राजगृह बांधण्याची
भिमगर्जना ती स्वाभिमानाची ज्योत पेटवण्याची
धम्मदिक्षेची चेतलेली ज्योत कोटी-कोटी कुळे उद्धाराची
करीतो स्तुती केवळ आम्ही बोधिसत्वाची
नव्हती कोणाचीच हिम्मत तुमच्या पुढे उभे राहण्याची !! 4 !!
इतिहास बदलण्याची ताकद फक्त युगप्रवर्तकाची
चढाओढ चाले आत्ता,आयत्या पिठावर रेघोटया ओढण्याची
भिमक्रांती झाली माणसाला माणुसपण देण्याची
चिड येते ती शाहु,फुले आंबेडकर म्हणुन राजकारण करणा-यांची
नव्हती कोणाचीच हिम्मत तुमच्यापुढे उभे राहण्याची !! 5 !!
संविधानाची कलमे न्याय,स्वातंत्र्य,समता,मैत्रीबंधुभावाची
ताकद संविधाची खंडप्राय देशाला एकसंघ बांधण्याची
देशभक्तीने मी प्रथम भारतीय अन् अंतिमतःही भारतीय म्हणण्याची
कार्य अन् विचाराने आहे का पात्रता यांची तुमच्या समवेत बसण्याची
नव्हती कोणाचीच हिम्मत तुमच्या पुढे उभे राहण्याची
आज रांग लागली तुमच्या समवेत बसणा-यांची
- कवि डॉ. सुरेन्द्र राजाराम शिंदे
3] मराठी बौद्ध साहित्य विषयक नियतकालिके / वृत्तपत्र
3.1 अ]'दैनिक वृत्तरत्न सम्राट'
लोकांच्या ज्ञानात वृतीत अन् कृतीत अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे काम दैनिक वृत्तरत्न सम्राटने चोखपणे बजावलेले आहे. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या चळवळीचे वृत्तपत्र नाही त्या चळवळीची अवस्था पंख छाटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. बौद्धांच्या तसेच बहुजनांच्या चळवळीचे एकमेव वृत्तपत्र.बौद्ध म्हणून अस्मिता जागृत करण्याचे काम या दैनिक वृत्तरत्न सम्राटने विश्वासार्ह पार पाडलेले आहे. निव्वळ बौद्धांचेच हे वृत्तपत्र नाही तर भारतातील तमाम बहुजनांचे हे मुखत्यारपत्र आहे.
4] मराठी बौद्ध सहित्य संमेलन
4.1] महामानवांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेने बौद्ध साहित्यातुन सद्वर्तनाने परिवर्तनाची ज्योत चेतवा !!!
बौद्ध म्हणुन बौद्धांची अस्मीता जागृत करण्याची मोठी जबाबदारी साहित्यिकांवर आहे.भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या असीम त्यागाने आपणाला बौद्ध धम्माचा लाभ झाला.परंतु बौद्ध धम्माचा प्रचार अन् प्रसार करण्यासाठी भगवान गौतम बुद्ध अन् डॉ..बाबासाहेब आंबेडकर या महामानवांस तळागाळातील बहुजनांपर्यंत पोहोचविण्यास ख-या अर्थाने आपण अपयशी ठरलो.तेव्हा साहित्यातुन बौद्ध धम्माचा प्रचार प्रसारासाठी प्रबोधनाची आवश्यकता असल्यानेच नालंदा बुद्ध विहार सणसवाडी पुणे येथे दिनांक 31/12/2017 ते 01/01/2018 रोजी बौद्ध साहित्य प्रसार संस्था व बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटर यांच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्रतिथयश साहित्यिक/ कवी/समिक्षक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी पुढे अधिक माहिती देताना सांगीतले की, नालंदा बुद्ध विहार कळवा येथुन भारतीय बौद्ध साहित्य प्रसार संस्थेची सुरुवात होवुन भिमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभास 200 वर्षे पूर्ण होत असल्याने या ऐतेहासीक पार्श्वभुमीवर नालंदा बुद्ध विहार सणसवाडी पुणे येथे पहिले राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन भरविण्यात आले असुन हे भारतीय बौद्ध साहित्यातील मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला.त्यांच्या या सार्थ विश्वासातुन महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी सणसवाडी पुणे येथे आपली उपस्थिती लावली आणि हे पहिले राज्यव्यापी अखील भारतीय बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी केले. हे पहिले राज्यव्यापी अखील भारतीय बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा खरा बहुमान ‘तुझ्या पावलांचे ठसे पाहिले मी,दिशा मज कळाली,तसा चाललो मी, तसा चाललो मी’असे आपल्या कवीतेतुन गाणारे,म्हणणारे अन् चालणारे सुप्रसिद्ध साहित्यिक,समिक्षक,कवी प्रा.शुक्राचार्य गायकवाड अन् त्यांच्या सर्व साहित्यिक मंडळींना,प्रेमींना जाते. ‘‘साहित्य म्हणजे समाज मनाचा आरसा अन् त्यातुन पडणारा कवडसा म्हणजे समाजाचे यथार्थ दर्शन’’ या पहिल्या बौद्ध साहित्य संमेलनातुन नेमके काय घडले,महाराष्ट्रातुन आलेल्या अनेक साहित्यिकांच्या साहित्यातुन काय कवडसा पडला याची प्रचिती उपरोक्त वाक्यानुसार दिनांक 1 जानेवारी रोजी संपूर्ण भारत देशातील लोकांनीच नव्हे तर जगातील सर्वच लोकांनी घेतली.तेव्हा साहित्य संमेलन कसे पार पडले यासाठी हा प्रपंच मांडत आहे.तत्पुर्वी दिनांक 22 ऑक्टोंबर 2017 रोजी दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक बबनराव कांबळे साहेबांनी या बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे उद्घाटन केले.उद्घाटन प्रसंगी त्यांनी स्वाभिमान जागवा,नवीन पिढी तुमची वाट पाहत आहे तेव्हा साहित्यिकांनी वाघासारखे,सम्राटासारखे रहा. या आषयानुरूप भाषणातुन माझ्या 20 भाषणांच्या बरोबर शाहिराचे एक गाणे असल्याचे डॉ..बाबासाहेब आंबेडकर म्हणत तेव्हा साहित्यिक या नात्याने ही धुरा,जबाबदारी साहित्यिकांवर असल्याचे प्रतिपादन दै.वृत्तरत्न सम्राटचे संपादक बबनराव कांबळे यांनी केले.डोंबिवली येथील सर्व्हेश हॉल मधिल स.न.वि.वि.सभागृहामध्ये बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे उद्घाटन बबनराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय समन्वयक भारतीय संविधान राष्ट्रीय विकास अभियानचे डॉ.प्रशांत पगारे,सुप्रसिद्ध साहित्यिका उर्मिला पवार व प्रमुख वक्ते म्हणुन अशोक नागरी सहकारी संस्थेचे अशोक शिलवंत,साहित्यिक व पालिभाषा अभ्यासक एस.बी.शेलार,साहित्यिक अभ्यासक आर.डी.सांगळे कार्यक्रमाचे व भारतीय बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्रा.शुक्राचार्य गायकवाड,सचिव प्रभाकर गवाणकर,कार्याध्यक्ष भरत शिरसाठ,धम्मकिरण चन्ने, ना.पा.जाधव, एम.एम.घाडगे, रविकिरण म्हस्के आदी मान्यवरांसह संपूर्ण सभागृह साहित्यिकांनी व साहित्यप्रेमींनी खच्चुन भरला होता. तत्पुर्वी नृत्यातुन बौद्ध साहित्याचे निर्माते तथागतांस वंदन करण्यात आले.तदनंतर सर्वांनी पंचशिल ग्रहण केले.दै.वृत्तरत्न सम्राटचे संपादक बबनराव कांबळे यांनी मेणबत्ती प्रज्वलीत करून आपल्या साहित्याद्वारे उपेक्षीतांचे जीवन उज्वल करा या आषयाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यिकांना असलेला आदेष वाचुन बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे उद्घाटन केले.प्रभाकर गवाणकर यांनी आंबेडकरी चळवळीतले प्रामुख्याने दलित अस्पृष्य नसुन बौद्ध म्हणुन या बौद्ध साहित्य प्रसार संस्थेतुन वाटचाल करावी असे आपल्या प्रास्तविकेतुन मांडले.सुत्रसंचलन आनंद जाधव यांनी केले. उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना बबनराव कांबळे यांनी आपणाला इतरांसारखे गप्प बसता येणार नाही.जागृतीचा विस्तव विझु देऊ नका.आपण का गप्प आहोत,आपणाला का निराशा आली या प्रष्नांची उत्तरे आपल्याला मिळवायची आहेत.आपल्यात जी ताकद आहे ती,भारतात दुस-या कोणाकडे नाही.आपणात बाबासाहेबांचा जो आदर्श आहे तो जगात कोणाकडे नाही.साहित्यिकांची लेखणी प्रभााशाली असली पाहिजे.साहित्यिक नितीमान असले पाहिजेत.मी माझी नितिमत्ता विकणार नाही असा ताठ बाणा असला पाहिजे.गुणवान होता येते परंतु नितीमान होता येत नाही.जगातले सर्व धर्म देवांवर आधारलेले आहेत केवळ तुमचा अन् माझा धम्म हा नितीमत्तेवर आधारलेला आहे.जो आपल्या कुटुंबाशी,समाजाशी,देशाशी प्रामाणिक आहे त्याचा पराभव होत नाही.वज्जी या देशा प्रमाणे जो समाज एकत्रित येतो,एकत्रित येऊन विचार करतो,एकत्रित चिवारांती निर्णय घेतो.अन त्या निर्णयाची अंमलबजावणी करतो तो समाज विजयी होतो आणि जो समाज विजयी होतो तो समाज क्रांती करतो.तेव्हा आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन केले पाहिजे.साहित्यिकांची लेखणी दाबण्याचा प्रयत्न होईल,तुमचे शस्त्र गहाण ठेवण्याचा प्रयत्न होईल तेव्हा साहित्यिकांनी निर्भयपणे, प्रामाणिकपणाने,लेखणीतुन चोख काम करा.सम्राटासारखे रहा.तुमची पुस्तके अशी गाजली पाहिजेत की,त्याला पारितोषिके मिळाली पाहिजेत,त्यासाठी वाचन, चिंतन,मनन झाले पाहिजे.ती पुस्तके वाचताना धरणीकंप झाला पाहिजे.22 प्रतिज्ञा ही माझी आयडेंटी आहे.मुलांना बुद्ध अन् त्यांचा धम्म हे पुस्तक वाचावयास दया.शुभ्रधवल वस्त्रातुन बुद्ध विहाराकडे जाणारी बुद्ध संस्कृती ही आपली संस्कृती झाली पाहिजे.बैल गाभण कसा याचे उत्तर साहित्यिकांनी दयायचे आहे.आम्ही केवळ तथागत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शरण आहोत दुसरे कोणालाही नसल्याचे बबनराव कांबळे प्रतिपादले.मान्यवरांचे बौद्ध साहित्य संस्थेच्या वतीने यथोचीत स्वागत करून सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार, अशोक नागरी सहकारी संस्थेचे अशोक शिलवंत, राष्ट्रीय समन्वयक भारतीय संविधान राष्ट्रीय विकास अभियानचे डॉ.प्रषांत पगारे, साहित्यिक व पालिभाषा अभ्यासक एस.बी.शेलार, साहित्यिक अभ्यासक आर.डी.सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बौद्ध साहित्यिकांना या संस्थेच्या माध्यमातुन एक हक्काचे विचारमंच मिळाले असल्याने आपले बौद्ध साहित्य हे केवळ भारतातच मर्यादित न राहता सम्राट अशोकाने बौद्ध धम्म ज्याप्रमाणे सातासमुद्रापाड नेला त्या प्रमाणे हे बौद्ध साहित्य जावे.तसेच उपस्थितांचे गायकवाड यांनी आभार मानले.सरणत्तय होवुन कार्यक्रमाची सांगता झाली.
4.2.1] सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.आनंद देवडेकर पहिले राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाध्यक्ष
दिनांक 31/12/2017 रोजी सकाळी 11-00 वा.पुणे येथील सणसवाडीतील सुदामराव पवारसाहेब सभागृहाचे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विकास मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रससंगी बोलताना सामाजिक न्याय विकास राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी अजुनही आम्हाला सर्वांना दुरचा पल्ला गाठावयाचा असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे न्यावेत असे आषयानुरूप वक्तव्य करताना समता मुलक,न्यायावर आणि बंधुत्वावर आधारीत हा देश निर्मित झाला पाहिजे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विकास मंत्री राजकुमार बडोले यांनी पुणे येथील सणसवाडी येथे काढले.भिमा कोरेगाव येथील विजय स्तभांस 200 वर्षे पूर्ण होत असल्याने या ऐतेहासिक पार्श्वभुमीवर सणसवाडी,पुणे येथे बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटर व बौद्ध साहित्य प्रसार संस्थेच्या वतीने पहिले राज्य स्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन केले असता सुदामराव पवार सभागृहाचे,सुमिरा स्पोर्टस अकादमीचे आणि भव्यदिव्य अश्या रांगोळीचे सामाजिक न्याय विकास राज्यमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.पुढे बोलताना सामाजिक न्याय विकास राज्यमंत्री बडोले यांनी 14 ऑक्टोंबर 1956च्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रोपटयाला पालवी फुटायला लागली असुन त्याचे आता वृक्षात रूपांतर होत आहे.ज्यांचे विचार घेऊन आम्ही मोठे झालो अश्या विचारांचे लोक बसलेले आहेत. डॉ.बाबासाहेबांचे विचार परत आत्ता फुलायला लागल्याने मनातली भिती नाहीशी होते.आत्ता आपण सर्वजण सूर्यफुल झालो पाहिजे.समता व जातीविरहित समाजाची अपेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली.या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनास व बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटरला सामाजिक न्याय विकास राज्यमंत्री बडोले यांनी शुभेच्छा देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची उर्जा आजच्या तरुणांनी घेतली पाहिजे असल्याचे आवाहन केले.सुनिरा स्पोर्टस अकादमीचे उद्घाटन करताना बडोले यांनी क्रिकेट खेळुन केली.तर भव्यदिव्य अश्या रांगोळीने मंत्रीमहोदयांसह सर्वजण भारावुन गेले.या प्रसंगी बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्रा. शुक्राचार्य गायकवाड,साहित्य संमेलनाचे उद्घाटक प्रा.दामोदर मोरे,कार्याध्यक्ष भरत शिरसाट,माजी आमदार जयदेव गायकवाड,सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बौद्ध साहित्य संस्थेच्या कार्यकारणीसह राज्याच्या कानाकोकोपऱ्याातुन आलेले असंख्य साहित्यिक व बुद्धिस्ट मुव्हमेंट सेटरचे मान्यवर पदाधिकारी तसेच सणसवाडीचे मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्तविकेतुन बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटरचे सुनिल पवार यांनी या सेंटरच्या कार्याचा आढावा घेऊन साहित्य संमेलन भरविण्या बाबतची माहिती विषद केली.सुत्रसंचलन विशाल खरात व प्रशांत वाघमारे यांनी केले.मान्यवरांचा या प्रसंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला तर, उपस्थितांचे आभार मानण्यात आले पहिल्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक दामोदर मोरे यांनी बंधनमुक्त हृदयातुन जन्माला येणारी करुणा म्हणजेच बौद्धसौंदर्य असल्याचे विषद करताना निळया पताकांमधुन आपणास आपले मुल्य कळणार असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक दामोदर मोरे यांनी भिमा कोरेगाव येथील विजय स्तभांस 200 वर्षे पूर्ण होत असल्याने या ऐतेहासिक पार्श्वभुमीवर सणसवाडी,पुणे येथे बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटर व बौद्ध साहित्य परसार संस्थेच्या वतीने पहिले राज्य स्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले पुढे बोलताना त्यांनी आपण नागवंशीय आहोत.पुढे नागचे नाक झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य जोतीबा फुले यांनी इतिहासाच्या उत्खननाचे काम केले.भिमा कोरेगाव येथील युद्ध हे इंग्रजांना विजय मिळवुन देण्यासाठी नव्हे तर, हे युद्ध समतेसाठी होते.आधुनिक भारताचे षिल्पकार हे महार आहेत.विजयस्तंभ हे आमचे उर्जाकेंद्र असुन बौद्धसाहित्य हे आमच्या नैतिक मुल्यांचा खजीना आहे.‘‘जिसका मन सुंदर उसकी सोच सुंदर,और जिसकी सोच सुंदर उसका साहित्य सुंदर’’ वरच्या आळीचे साहित्य म्हणजे स्वजातीय हिताय स्वजातीय सुखाय असल्याने आम्ही ते नाकारतो.त्यांच्या दृष्टीने जात हे मुल्य आहे माणुस हे मुल्य नसल्याने आमचा त्यास नकार आहे.जिथ पर्यंत महार आहेत तिथपर्यंत महाराष्ट्र तर इरावती कर्वे यांच्या मते जिथे महार नाहित तो महाराष्ट्र नाही.वर्णव्यवस्थेवरून आमची नावे ठेवली असल्याने आमची प्रतिष्ठा हिरावुन घेतली असल्याने आम्ही तुमची संकल्पना नाकारतो.आपण सर्व साहित्य पुस्तके,ग्रंथ जर वाचले तर, आपल्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतील. दोन साहित्यातील फरक स्पष्ट करताना वरच्या आळीतील साहित्य हे संवेदनाहिन, मानवताहिन तर बौद्ध साहित्यात बुद्धांची करुणा ही सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगीतले.विव्दान म्हणजे दिवा तर प्रज्ञा म्हणजे सूर्य होय. मंत्र हे मंत्रयुगाकडे तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्हाला तेजोयुगाकडे घेवुन जातात.आपणाला नवा इतिहास घडवायचा आहे असे आवाहन केले.
तत्पुर्वी बौद्ध साहित्य प्रसार संस्थेच्या वतीने सणसवाडी ते भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभा पर्यंत क्रांतीज्योत रॅली काढण्यात आली.तदनंतर सणसवाडी चौक ते बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटर येथील सुदामराव सभागृह पर्यंत गौरव ग्रंथ रॅली काढण्यात आली.या प्रसंगी शौर्य गाथा बौद्ध साहित्य स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थित करण्यात आले.स्वागताध्यक्ष सुनिल पवार यांनी विचारमंचावर उपस्थितांचे स्वागत करून दै.वृत्तरत्न सम्राटच्या सहकार्याने अन् आद.बबनराव कांबळे यांच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगुन दै.सम्राटचे संपादक बबनराव कांबळे यांचे आभार मानले.कार्याध्यक्ष प्रा.भरत शिरसाट यांनी प्रास्तविकेतुन बुद्धांनी दिलेला विचार सणसवाडी पर्यंत येऊन पोहोचला आहे.बुद्ध सांगण्याची आवश्यकता साहित्यिकांवर आहे.1961 साली आप्पासाहेब रणपिसे, भाऊसाहेब अडसुळ व विजय सोनवणे या त्रयस्थांनी बौद्ध साहित्याची सुरुवात केली. बौद्ध अस्मितेची पताका घेवुन आम्हाला विश्व पादाक्रांत करावयाचे आहे मानवतावादी साहित्य हेच बौद्ध साहित्य आहे.बौद्धत्व हिच आमची अस्मिता आहे. प्रा.रतन सोनग्रा यांनी आपली यात्रा बहिष्कृत भारत ते प्रबुद्ध भारताकडे जात आहे.लोकांना ज्ञान देण्याचे काम साहित्यिकांनी करावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जगाने स्विकारले आहे. बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी आपले विचार मांडताना साहित्य परिषदेतुन न बोलणारे बोलु लागले,लिहु लागलेआता ही बौद्ध साहित्य संमेलने संपूर्ण भारतातुन भरविण्यात येणार आहे.आपण सगळे साहित्यिकांच्या नावाने एकत्र येऊ या अन् डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व जगामध्ये पोहोचवु असे उपस्थित साहित्यिकांना आवाहन केले.या वेळी ना.पा.जाधव,प्रा.दि.वा.बागुल,सविता भोसले,प्रमोद जाधव,अॅड.रंजना भोसले,दिपश्री माने बलखंडे,अशोक गायकवाड आदी मान्यवरांसह बौद्ध साहित्य प्रसार संस्थेच्या कार्यकारणीसह राज्याच्या कानाकोप-यातुन आलेले असंख्य साहित्यिक व बुद्धिस्ट मुव्हमेंट सेटरचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.सुत्रसंचलन बी.आर.पंचांगे यांनी केले.
पहिल्या अखील भारतीय राज्यव्यापी बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून अध्यक्षीय भाषण करताना सोडलेल्या धर्माला शिव्या घालण्यापेक्षा स्विकारलेल्या धम्माच्या ओव्या गा ! या उक्तीनुसार आचरण करताना सृष्टीतील सर्वांविषयी करुणा उत्पन्न करणारे साहित्य म्हणजे बौद्ध साहित्य असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.आनंद देवडेकर यांनी भारतीय बौद्ध साहित्य परिशदेने भरविलेल्या राज्य स्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पुणे येथील सणसवाडी येथे केले.या प्रसंगी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाचे मान्यवर साहित्यिकांसहित उपस्थितांसह प्रकाशन करण्यात आले.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातुन पुढे बोलताना प्रा.देवडेकरांनी वर्ण,वर्ग,भेदा विरूद्धच्या या बौद्ध साहित्याकडे आपण व्यापक दृश्टीकोनातुन पाहिले पाहिजे बौद्ध साहित्याला मराठी ही एवढीच मर्यादा नसुन ते अमर्याद असा कॅनव्हास लाभलेले जगातील विविध भाषेतआहे.तथाकथीत प्रस्थापितांपेक्षा आपले हे जागतिक साहित्य आहे.बहिणाई अन् बहिणाबाई यांच्यात 700 वर्शांचे अंतर आहे.वज्रसुची ग्रंथाचे भाषांतर बहिणाई यांनी केले आहे.गृहत्याग केलेले सिद्धार्थ गौतम स्वतःच्या मनात निर्माण झालेल्या प्रष्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रथमभृगु ऋषीच्या आश्रमात जातात तिथे समाधान होत नाही म्हणुन आलारकालामच्या आश्रमात जातात तिथेही समाधान होत नाही म्हणुन उद्धक रामपुत्ताच्या आश्रमात जातात आणि अंतिमतःस्वतःच सम्यक सम्यक सम्बुद्ध होतात.त्याच प्रमाणे डॉ.बाबासाहेबही कबीर,फुले हे टप्पे पार करून बुद्धत्वालाच गवसणी घालतात बुद्धाला आणि त्यांच्या धम्माला अनुसरतात.तथागतांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा धम्मप्रवास बौद्ध धम्मीय व साहित्यिकांनी समजुनच घेतला नाही ते फुले अन् कबीर या टप्प्यांवरच रेंगाळत राहिले.ज्या सहित्याचे उर्जास्तोस्त्र बुद्ध अन् प्रेरणास्तोस्त्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत ते साहित्य म्हणजे बौद्ध साहित्य होय. हिनयान, महायान, वज्रयान, मंत्रयान,सहजयान यात लुप्त झालेला बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध अॅन्ड हिज धम्म’च्या माध्यमातुन मुळस्वरूपातुन आपल्या पर्यंत आणुन ठेवला आहे.साहित्य हा समाजाचा आरसा असतो समाजाचं वास्तविक प्रतिबिंब त्यात दिसायला हवे.याच प्रमाणे पुस्तकाचा नुसता संच केल्याने तो साहित्यिक होत नसतो.धर्मांध शक्तीचा वाढता दहशतवाद रोखण्यासाठी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकिय संगठन गठीत करायला हवे.भिमा कोरेगावच्या अभिमानास्पद लढयाची व्दिषताब्दी साजरी करताना फुकटच्या उन्मादी उत्साहाच प्रदर्शन करण्यापेक्षा संख्योने कमी असुनही अत्याचारी व्यवस्थेला भिडणा-या अन् गाडणा-या त्या महापराक्रमी महारयोद्धांपासुन आपण प्रेरणा घ्यायला हवी असल्याचे आवाहन करून अध्यक्षपदी निवड करून माझा जो सन्मान केला त्या बद्दल मी आपला अत्यंत आभारी असल्याचे प्रा.देवडेकरांनी म्हणले .सुत्रसंचलन बी.आर.पंचांगे यांनी केले तर,आभार कवि कांतीलाल भडांगे यांनी केले रात्रों.भव्य कवी संमेलनाचे आयोजण करण्यात आले अध्यक्षस्थान कवी अशोक दवणे यांनी भुषविले तर सुत्रसंचलन कविता मोरवणकर यांनी केले.या भव्य कवी संमेलनात कवी विलास बसवंत,रविकिरण म्हस्के,शारदा नवले,राजेश गायकवाड,जगदेव भटु,कांतीलाल भडांगे,उषा अंभोरे,हेमलता भालेराव,जोंधळे बाळासाहेब,बी.आर.पंचांगे,दिपक साळवे,अस्मिता मेश्राम,निलम पाटील,संजय डोंगरे, जगतपुरीया,साजन शिंदे ,वसंत हिरे,जयवंत सोनवणे, शिवा इंगोले,बबन सरोदे,मुक्तानंद जगताप,ख.रे.माळवे, धम्मकिरण चन्ने,विकास भंडारे,संदेष गायकवाड,शाम भालेराव,अनिल भालेराव, डॉ.सुरेंद्र शिंदे, अनिलकुमार मोरे,बी.जे.कांबळे,संतोश खरात,प्रा.ढावारे,वर्शा भिसे,विलास कांबळे,सुनिल सोनवणे,नारायण सोनकांबळे, रमेश भवार,श्रीकृश्ण टोंबरे,भीमराव शिरसाठ,दिलिप घोडेस्वार,निंबाजी केदार,भागवत बनसोडे,ए.आर.खिल्लारे,प्रा.उत्तम भगत,सुनिल ओव्हाळ आदी 70 कवींनी सहभाग घेउन आपल्या कविता सादर केल्या.त्या सर्वांना प्रशस्ती प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देण्यात आले.रविवार दिनांक 01/01/2018 रोजी सकाळी 09ःते 10ः00 पर्यंत ‘कवी जेव्हा गाऊ लागतो’ या कवी संमेलन दोन मध्ये कवि विकास भंडारे प्रमोदकुमार भोरजारे,नरेश जाधव,वर्षा गायकवाड, श्रीकृश्ण टोंबरे आदिंनी आपल्या सुरेल आवाजातील कविता सादर केल्या. ‘बौद्ध साहित्यात सामाजिक संस्थांच्या जबाबदा-या’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले याचे अध्यक्षस्थान कडोम.पा.परिवर्तन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी भुषवीले तर, सुत्रसंचलन समाधान मोरे यांनी केले.या चर्चासत्रात वक्ते म्हणुन त्रिरत्न महासंघाचे धम्मचारी अनोमदस्सी,शहिद भागवत जाधव प्रतिश्ठाण मुंबईचे सुमेध जाधव,रिझर्व्ह बँकेचे असिस्टंट मॅनेजर श्रीकृश्ण टोबरे,व प्राचार्य सुधाकर खैरे यांनी या चर्चासत्रातुन आपले विचार व्यक्त केले. मी रमाई बोलते या एकपात्री नाटकाचा प्रयोग कवयत्री उषा अंभोरे यांनी आपल्या शैलीत सुंदररीत्या सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली सत्कार समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा दुपारी 12ः00 ते 1ः00 वा. करण्यात आला.या सोहळयाचे सुत्रसंचलन जयवंत सोनवणे यांनी केले तर,आभार प्रदर्शन रविंद्र अहिरे यांनी केले.या पुरस्कार सोहळयातुन स्मृतीशेष शामुताई भोईर,दामोदर आंबो जाधव,गोविंद तुकाराम गायकवाड,भाऊसाहेब अडसूळ यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. तसेच सुदाम पवार,मोहन गायकवाड,अभिमन्यु भालेराव,प्रिया खरे,अर्जुन गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.त्याच बरोबर बौद्ध साहित्यिक भाऊसाहेब अडसूळ हा पुरस्कार बौद्ध साहित्यिक अभ्यासक दिलिप घोडेस्वार (भुसावळ),विजय सोनवणे पुरस्कार बौद्ध साहित्यिक अभ्यासक राजु सांगळे (पुणे) व आप्पासाहेब रणपिसे पुरस्कार बौद्ध साहित्यिक अभ्यासक रमेश शिंदे यांना देण्यात आला. दुपारी 3ः00 ते 4ः30 वाजे पर्यंत बौद्ध धम्म प्रचार,प्रसारासाठी साहित्यातुन प्रबोधनाची आवश्यकता या विषयावर परिसंवाद -2चे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष भरत शिरसाठ यांनी भुषवीले.तर या परिसंवादाचे सुत्रसंचलन बौद्ध विकास मंडळ नालंदा बुद्ध विहार कळवा याचे अध्यक्ष कवी बी.जे.कांबळे यांनी केले.तर पुरोगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भिमराव शिरसाठ यांनी आभार प्रदर्शंन केले.यामध्ये कवी नारायण जाधव,कवयत्री विदया भोरजारे,ठाणे जिल्हा परिशदेचे डॉ.अशोक बहिरव,शिक्षण विस्तार अधिकारी संजय थोरात,पत्रकार बी.डी.गायकवाड,प्राचार्य जीभाऊ बच्छाव,कवी डी.बी.जगतपुरीया यांनी सहभाग घेतला. सायंकाळी 4ः30 ते 6ः30 वा.पर्यंत साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम करण्यात आला.असे विविध उपक्रमाद्वारे भरविण्यात आलेल्या या पहिल्या राज्यव्यापी बौद्धसाहित्य संमेलनावर प्रतिक्रिया देण्यासाठी काळाची पावले ज्या ऐतेहासिक घटनेची वाट पाहत होती त्याच घटनेची पुनरावृत्ती करण्याची प्रतिक्षा पाहत होती की काय,असे न राहवुनही वाटते ज्यामुळे 1 जानेवारी 2017 रोजी भिमा कोरेगाव हे नाव जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा आले आणि 21 व्या शतकात विज्ञानयुगात भारतीय बौद्ध समाजाची भारतात काय अवस्था आहे याचे यथार्थ दर्शंन जगाला घडले.एकंदरीत या घटनेने हे पहिले राज्यव्यापी अखील भारतीय बौद्ध साहित्य संमेलन बौद्ध साहित्यिकांच्या स्मृतीत कायमचेच राहिल
4.3.1]प्रा.शुक्राचार्य गायकवाड,व्दितीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाध्यक्ष
डाॅ.बाबासाहेबआंबेडकरांनी दिलेल्या सद्धम्माचा आपल्या साहित्यातुन प्रचार अन् प्रसार करणे हे आपल्या प्रत्येक बौद्ध साहित्यिकाचे काम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समिक्षक, कवी, लेखक आणि या व्दितीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी केले.बौद्ध साहित्य प्रसार संस्था आणि क्रांतीसूर्य सामाजिक संस्था यांच्या विदयमानाने वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या औचीत्यावर विटावा येथे आयोजण्यात आलेले व्दितीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन मोठया उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक प्रदिप आगलावे, स्वागताध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत सोनवणे, सचिव प्रा.भरत शिरसाठ, ठाणे जिल्हा कार्यकारणीचे अध्यक्ष विकास भंडारे, कार्याध्यक्ष बी.जे.कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ साहित्यिका इंदिरा आठवले, ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मोरे सर, राष्ट्रीय प्रवचनकार प्रा.दि.वा.बागुल, दैनिक नवनगरचे संपादक दिपक सोनवणे, जे.जी.यादव, प्रा.श्रीरंग कुडुक, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड आदी मान्यवरांसह महाराष्ट्रातून आलेले सर्व साहित्यिक, बौद्ध साहित्य प्रसार संस्थेची केंद्रिय कार्यकारणी तसेच जिल्हावार कार्यकारणी, सदस्य, क्रांतीसूर्य सामाजिक संस्थेचे मान्यवर पदाधिकारी व उपस्थित साहित्यरसीक ठाणे जिल्हयातील विटावा येथील (प-याचेमैदान) भदंत आनंद कौसल्यायन साहित्यनगरीत उपस्थित होते. बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे सहसचिव डाॅ.सुरेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविकातुन ‘‘महामानवांच्या प्रेरणेने सद्वर्तनाने बौद्ध साहित्यातुन परिवर्तनाची ज्योत चेतवा !’’ असा संदेष दिला.सुत्रसंचलन बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे सचिव प्रा.भरत शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शनातून बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विकास भंडारे यांनी मान्यवरांसहित उपस्थितांचे आभार मानले.
पुढे बोलताना प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांनी आत्तापर्यंत झालेल्या सर्व साहित्यसंमेलनाचा उहापोह करून बौद्ध साहित्य प्रसार संस्था आपण का स्थापन केली हे विषद केले.बुद्धांचे संपूर्ण तत्त्वज्ञान हे कम्मविपाक व प्रतित्यसमुत्पाद सिद्धांतावर केंद्रित असुन मध्यममार्ग हा या धम्माचा मुळ पाया आहे. या ठिकाणी उपस्थित असेलेले कवी,साहित्यिकांनी तथागतांच्या, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधनाने बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे सभासद होवुन संपूर्ण भारत देशातील तळागाळापर्यंत बौद्ध धम्माचा प्रचार अन् प्रसार करतील अशी अपेक्षा व्यक्त करून आपले लक्ष आकुंचीत व मर्यादीत न ठेवता उदात्त जीवनमुल्ये व सांस्कृतिकमुल्ये अविष्कृत करा असे उपस्थित सहित्यिकांना प्रा.शुक्राचार्य गायकवाड सरांनी आवाहन केले. आपल्या उदघाटनीय भाषणातुन ज्येष्ठ साहित्यिक प्रदिप आगलावे यांनी बुद्ध धम्म प्रसारात ठाणे शहराचे योगदान असल्याचे सांगुन पाली भाषेतील साहित्य हे विश्वाच्या मानवीकरणाचे साहित्य असल्याचे म्हणले. जगातील पहिले साहित्य हे त्रिपिटक होय. माणुस जन्माने नव्हे तर त्याच्या कुशल कम्माने श्रेष्ठ ठरतो. संत साहित्यावर बुद्धधम्माचा प्रभाव आहे.1956च्या धम्मक्रातीनंतर बौद्ध साहित्य चळवळीवर उहापोह करून बौद्ध साहित्यिकाची जबाबदारी ही इतर साहित्यिकांपेक्षा वेगळी आहे.बौद्ध साहित्यिकांना माणुसकीचे साहित्य निर्माण करावयाचे असल्याने त्यांनी सखोल अभ्यास व चिंतन करून बुद्धधम्म आपल्या आचरणात आणल्यास साहित्यिक हे लोकांचे दिपस्तंभ झाल्यास बौद्ध साहित्य संमेलनाची ती फलश्रुती ठरेल असे आगलावेसरांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका इंदिरा आठवले व स्वागताध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले.
तत्पुर्वी ठाणे स्टेशनवरील विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणादायी पुतळयास ज्येष्ठ साहित्यिक प्रदिप आगलावे, प्रा.शुक्राचार्य गायकवाड, पंढरीनाथ गायकवाड यांनी पुष्पमाला अर्पण करून ठाणे ते विटावा सजविलेल्या लायटिंगच्या रथातुन महामानवांची तसेच ‘संविधान व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’या ग्रंथाची भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली यामध्ये डाॅ.अवनखेडकरसहित सर्वमहिला, सर्व साहित्यिक आणि क्रांतीसूर्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.सकाळी 30 भिक्खुगणांचे विटावा येथील भदंत आनंद कौसल्यायन नगरीत आगमन होवुन धम्मध्वजारोहण होवुन मेणबत्तीचे प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित भिक्खुगणांकडुन पंचशीलग्रहण करून सामुदायिक बुद्धवंदना झाली.बौद्धाचार्य व्हि.जी.सकपाळ यांनी पाली भाषेतुन भिमस्तुती सादर केली .तदनंतर संमेलनाचे उद्घाटन झाले.सदर प्रसंगी लेखक व सामाजिक कार्यकर्ते आत्माराम शिरसाट यांच्या स्मृत्यर्थ बौद्ध साहित्य प्रसार संस्थेच्या वतीने साहित्य,समाज व धम्मकार्यासाठी प्रा.ज्योती पंडीत धुतमल परभणी,धनराज मोतीराम,जळगाव,सुरेश भालेराव देहुरोड, पुणे यांना त्रिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रकाशन सोहळया अंतर्गत स्मरणिकेचे प्रकाषन करण्यात येवुन प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांचे ‘आंबेडकरी सम्यक समिक्षा भाग 3’, ‘संगीतरत्न पंडीत डी. टी. अडसुळ या पुस्तकाचे तर, प्रा. भरत शिरसाट यांचे ‘खैरलांजी, भिमा कोरेगावावरील हल्ला आणि इतर कविता हा काव्यसंग्रह आणि श्याम भालेराव यांचे ‘या झोपडीत माझ्या या काव्यसंग्रहाचे प्रकाषन करण्यात आले. दोन भव्यकवी (कवी जेव्हा गाऊ लागतो) संमेलनाचे अध्यक्ष कवयित्री शारदा नवले व भागवत बनसोडे होते.याचे सुत्रसंचलन प्रा.उत्तम भगत व बी.जे.कांबळे यांनी केले.यामध्ये प्रतिथयश लाभलेले 60 कवींनी सहभाग घेतला, बौद्ध धम्माची उन्नती व अवनिती आणि डाॅ.बाबासाहेबांची धम्मक्रांती, या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा.दि.वा.बागुल होते त्यांनी आपल्या शैलीत सिद्धार्थ व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अस्वस्थ असल्याचे म्हणले. यामध्ये पत्रकार किरण सोनवणे, ज्ञानसत्त्व जी.टी.शिंदे हे सहभागी वक्ते होते. याचे सुत्रसंचलन कांतीलाल भडांगे तर आभार प्रदर्शन बी.आर. पंचांगे यांनी केले .तथागतांचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन, या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा.दामोदर मोरे यांनी भुषविले. यामध्ये डाॅ.सरोज डांगे, डी.एल.कांबळे हे सहभागी वक्ते होते. याचे सुत्रसंचलन डाॅ. सुरेंद्र शिंदे तर आभार प्रदर्शन वसंत हिरे यांनी केले. आंबेडकरी नायीकांची साहित्य, प्रबोधने आणि आचरणातुन धम्माविष्कार, या परिसंवादाच्या अध्यक्षा प्रा. ज्योती पंडीत धुतमल यांनी भुषविले यामध्ये डाॅ.मीना गायकवाड यांनी सहभाग नोंदविला याचे सुत्रसंचलन दिपश्री मानेबलखंडे तर आभार शारदा नवले यांनी केला. विश्वभुषण डाॅ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्धधम्म या परिसंवादाचे अध्यक्ष आंबेडकरवादी साहित्य समिक्षक मोहन वाघमारे यांनी भुषविले यामध्ये प्रा.भरत शिरसाठ, हे सहभागी वक्ते होते याचे सुत्रसंचलन विकास भंडारे तर आभार प्रदर्शन भट्टु जगदेव यांनी केले. साहित्य क्षेत्राला विचार करावयाला लावणारी एक खुल्ली परंतु गट चर्चा आयोजण्यात आली.1) केंद्र शासन स्तरावरील बौद्धांच्या आरक्षणाचा प्रष्न 2) बौद्धपर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रयत्नांची दिशा 3) ‘मी भारत बौद्धमय करीन’या प्रतिज्ञेमागील बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका 4) दलित मानसिकता एक षडयंत्र 5) आंबेडकरी चळवळ आणि विविध स्तर एकत्रीकरण 6)धम्मसंस्कारासाठी बालसंस्कार व श्रामणेर संस्काराची आवष्यकता, यामध्ये विचारवंत, साहित्यिक, अभ्यासक सहभागी होते तर याचे सुत्रसंचलन प्रा.भरत शिरसाठ व डाॅ.सुरेंद्र शिंदे यांनी केले. सुनिता साळुंखे यांनी ‘‘मी सावित्री बोलत आहे !’’ आणि ज्येष्ठ कवयित्री उषा अंभोरे यांनी ‘‘मी रमाई बोलत आहे !’’ असे दोन एकपात्री प्रयोग पारंपारिक वेशभुषेतुन उत्तमरित्या सादर करून त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. बौद्ध धम्म प्रचारासाठी बौद्ध साहित्यिकांच्या जबाबदा-या या चर्चासत्राचे अध्यक्ष शिवा इंगोले यांनी भुषविले. यामध्ये कवयित्री विदया भोरजारे, कवी अनिलकुमार मोरे, मोहन वाघमारे, चंद्रकांत पोळ यांनी सहभाग घेतला. याचे सुत्रसंचलन कवी विलास बसवंत तर आभार प्रदर्शन कवी वसंतहिरे यांनी केले. पालि साहित्यातील थेरी गाथा या चर्चासत्राचे अध्यक्ष डाॅ. उज्वला भालेराव यांनी भूषविले यामध्ये संघमीत्रा जाधव, सुनिता साळुंखे, प्रांजली काळभेंडे यांनी सहभाग घेतला. सुत्रसंचलन गजानन गावंड तर आभार प्रदर्शन टि.वाय.साबळे यांनी केले. बौद्धांचे प्रश्न आणि साहित्यिकांची भूमिका या चर्चासत्राचे अध्यक्ष प्रा.भरतशिरसाठ यांनी भुषविले तर, जयवंत सोनवणे यांनी सहभाग घेतला याचे सुत्रसंचलन बौद्धाचार्य व्हि.जी.सकपाळ तर आभार प्रदर्शन नवनाथ रणखांबे यांनी केले. त्याच बरोबर कडुबा बनसोडे बुलढाणा यांचे कथाकथन होवुन समारोपातून जयवंत सोनवणे ,पंढरीनाथ गायकवाड, सुनील भालेराव आणि प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांचे समारोपीय अध्यक्षीय भाषण झाले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविकिरण मस्के यांनी केले तर आभार धनराज गायकवाड यांनी मानले.या साहित्य संमेलनातुन एकूण सहा ठराव संमत करण्यात आले.तदनंतर मनिषा कांबळे यांचे ‘महामानवांची गाथा’हा सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. साहित्य संमेलनातुन सहभागी झालेल्या सर्वांना स्मृतीचिन्हे व स्मरणिका देऊन गौरविण्यात आले. साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी जगदेवभट्टु, नवनाथ रणखांबे ,भिमराव शिरसाट, बाळासाहेब जोंधळे तसेच बौद्ध साहित्य प्रसार संस्थेच्या सर्व सदस्यांसहित क्रांतीसुर्य सामाजिक संस्थेचे रमेश भांगे,अनिल जगदाळे,संदिप सरदार,पांडुरंग गव्हाणे,दिनकरवाघ, गणेश गायकवाड आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
== 5] मराठी बौद्ध साहित्यात साहित्यिकांचे योगदान- प्रा. भरत आत्माराम शिरसाठ (एरंडोल जि.जळगाव) लेखक, कवी, समिक्षक
सचिव- बौद्ध साहित्य प्रसार संस्था स्वागताध्यक्ष, तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन, जळगाव अध्यक्ष- समतावादी साहित्य शिक्षक मंडळ प्रकाशीत पुस्तके व साहित्यिक वाटचाल- 1.खैरलांजी आणि भीमा कोरेगाच्या जखमा 2.सत्यशोधक आणि इतर कथा 3.शिक्षक कसा असावा? 4.बकध्यान (काव्यसंग्रह) 5.दुसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन, कळवा- स्मरणिका संपादन 6.तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन, जळगाव- स्मरणिका संपादन 7. अनेक पुस्तकांवर समिक्षा लेखन 8. वर्तमान पत्रांमधून धम्मविषयक लेखन 9. पाळधी येथे विशाल धम्म परिषदेचे 2005साली यशस्वी आयोजन 10. जळगाव येथील तिसऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन
5.1] डॉ.सुरेंद्र राजाराम शिंदे,सुप्रसिद्ध लेखक,कवी,स्तंभलेखक,पत्रकार,प्रवचनकार,सामाजिक कार्यकर्ता
डॉ.सुरेंद्र राजाराम शिंदे सुप्रसिद् लेखक,कवि,स्तंभलेखक,पत्रकार,प्रवचनकार,सामाजिक कार्यकर्ता म्हणुन परिचित नुकताच पुरोगामी पत्रकार संघाने महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन भूषविले. बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचा सहसचिव,सम्यक बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष तर,महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये सहभागी. पुणे येथील पुण्यनगरीतील तथागतांच्या विचाराने प्रेरित झालेल्या जगतगुरू संत तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या देहू येथील चिंचोली गावात 3 ऑक्टोंबर 1969 साली जन्म झाला. शालेय शिक्षण कळवा ठाणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. विष्वकर्मानगर,न्युबेलापुर रोडसमोर शांतिदुतबुद्ध विहाराजवळ,कळवा ठाणे.- 400605 येथे प्रदीर्घ रहिवास. शालेय शिक्षणा नंतर पुणे येथे वैदयकिय शिक्षणपूर्ण झाल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल पुणे येथे वैदयकिय अधिकारी तसेच कुष्ठरोगाविषयी स्पेशल कोर्स उत्तीर्ण होवुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेडीकल ट्रस्ट व अशोक कलानिकेतन पुणे येथे कुष्ठरोगाविषयी वैदयकिय अधिकारी,सेवाधाम ट्रस्ट पुणे येथे राजगुरुनगर,खेड,आंबेगाव,जुन्नरमावळतालुक्यातील खेडेगावात वैदयकिय अधिकारीम्हणुनवैदयकिय सेवा पुरवुन राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमात वैदयकिय अधिकारी म्हणुन उत्स्फुर्तसहभाग व कुष्ठरोगाविषयी सेवा दिल्याने या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचा सन्मानित वैदयकिय अधिकारी म्हणुन गौरव,कुष्ठरोगनिर्मुलन कार्यक्रमात जागतिक आरोग्य संघटनेबरोबर काम करण्याची संधी प्राप्त, कळवा,ठाणे येथे भगत नर्सिंग होमचा निवासी वैदयकिय अधिकारी तदनंतर महाराश्ट्र शासनाच्या आरोग्य विभागा अंतर्गत जव्हार येथील तळवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैदयकिय अधिकारी म्हणुन आदीवासी भागात आरोग्यसेवा दिली. उपरोक्त आरोग्यविषयक बाबीत सामाजिक भान ठेवुन समाजोपयोगी आरोग्यसेवा दिल्यानंतर लेखनात अभीरूची निर्माण झाल्याने व सामाजिक कार्यात रस असल्याने तसेच या भुमीवर निसर्गाने जी निवड केली त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वैदयकिय अधिकारी या पदाचा त्याग करून आरोग्य चिकित्सा सोडुन सामाजिक चिकित्सेसाठी हाती लेखणी घेतली.या लेखणीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र आपल्यालेखणीच्यासाहयानेस्तंभलेखनाने ढवळुन काढला तर आपला स्तंभलेखक, पत्रकार म्हणुन आंबेडकरी समाजात वेगळाच ठसा निर्माण केला. स्तंभलेखक म्हणुन काम करीत असताना परखडपणे आपली जनप्रबोधनात्मक भूमिका मांडताना कोणाच्या धमकीला कधिच भिक घातली नाही किंवा त्यांच्या धमकीमुळे आपले लेखण बदलले नाही. आजपर्यंतदै. वृत्तरत्नसम्राट, दै.लोकनायक, दै.महानायक,दै.विष्वपथ,दै.कोकणसकाळ दै.नवनगर आदी दैनिकातुन तर संपूर्ण भारतात जाणारी आशरा मुक्तांगण या हिंदी साप्ताहिकातुन उप संपादक म्हणून लेखन केले तसेच अनेक साप्ताहिकांतुन लिहिलेले लेख पाहता सर्वात प्रथम मातारमाई,क्रांतिज्योती सावित्रीमाईफुले, माता यशोधरा,शिका,चेतवा,संघटीतव्हा, महापुरुषांच्या कार्य अन् विचारांनुसार सद्वर्तनातुन परिवर्तनाची ज्योत चेतवा, आजचे राजकारण अन् बदलती समीकरणे, कम्मसिद्धांत, तथागतांनी सांगीतलेली पाचविष ,प्रबुद्ध हो मानवा, महापुरूषांचे कार्य अन् विचार म्हणजेच स्फुर्तीचा जिवंतझरा, बौद्ध धम्मातील पौर्णीमांचे महत्त्व, स्मृतीच्या पटलावर, जगाला आज शुद्ध बुद्ध धम्म मार्गाची आवश्यकता आहे. स्फुर्तीचा जिवंत झरा, भिमा तुझ्या जन्मामुळे त्यागमुर्ती माता रमाई, हिरकणी, महामानवांच्या कार्य अन् विचारांच्या प्रेरणेने बौद्ध साहित्यातुन परिवर्तनाची ज्योत चेतवा,बौद्ध बांधवांच्या ज्ञानात,वृत्तीत अन् कृतीत अमुलाग्र बदल घडवुन आणणे गरजेचे आहे.किरण एक आशेचा, आंबेडकरी अनुयांनी करावी संकल्पपुर्ती युगप्रवर्तकाच्या सम्यक संकल्पाची, युगप्रवर्तकाची सम्यकसंकल्पना,विष्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अन् विचार म्हणजेच स्फुर्तीचा जिवंत झरा, भिमरत्न, जागृतीचा विस्तव कधिही विझु देऊ नका, नानासाहेब इंदिसे, चौकस मतदार कसा असावा,सामाजिक क्रांतीच्या अग्रदुत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, एसआरए अंतर्गत पुनर्वसन कोणाचे बिल्डरचे की,झोपडपट्टीवासीयांचे?,कुहाडीचा दांडा गोतास काळ, जीवन जगण्याच्या कलेतुन अस्मियतेचे दर्शन, प्रकटले स्मिता मनातले कोरे पान तुझ्या स्मृतीतुन, प्रज्ञासूर्याचा उपेक्षीत सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर, पुर्वाश्रमातील महार वतन जमीनींवर कुळाची,कब्जेदाराची नोंद होत नाही,भिमक्रांतीच्या मशाली तुम्ही आजपेटवारे!,भारतीय घटनेचे शिल्पकार, ज्ञानपिपासु डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महामानव, शिक्षणतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर, व्यर्थना हो हे बलीदान, तथागत बुद्धांचा मानवता संदेष, युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला राजकिय पक्ष, कुशल संघटन कौशल्यगुणी, लोकचक्र से धम्मचक्र प्रवर्तन, फुले आंबेडकरी विचारांचा ज्वालामुखी, हे बहुजनांनो, आम्हाला प्रेरणा देणारे आमचे गुरू, जगात गाजावाजा भिमराव एकच राजा,न्यायी अन् सज्जन महापुरुषांची लक्षणे, युतीचे राजकारण, संविधान हिच विहारात जाण्याची प्रेरणा, सिद्धार्थाने गृहत्याग का केला,महापुरूषांना आपल्या पुरते मर्यादीत न ठेवता विष्वमयी करा! बुद्धधम्मातील प्रतित्य समुत्पाद सिद्धांत,सृष्टीचा कारभार आदी लेख लिहुन वृत्तपत्रातुन प्रकाशीत होवुन सामाजिक प्रबोधन या लेखांद्वारे करण्यात यश संपादन. वास्तववादी साहित्यिक,कवि,लेखक,पत्रकार म्हणुन कार्यरत आत्तापर्यंत 50च्या वर वास्तववादी कवीता करून अनेक कविसंमेलनात कवीता सादर करून काही कवीता वृत्तपत्रातुनही प्रकाशीत झालेल्या आहेत. धम्म सारथी या संकेतस्थळ वरून वे ऑफ लाइफ या अंतर्गत संपूर्ण जगातील 125 ददेशात उपरोक्त असे 52 ते 60 लेख प्रकाशीत व प्रसारीत झालेले आहेत.आंबेडकरी कवींचा आंबेडकरी अविष्कार म्हणुन सम्मासम्बुद्ध साहित्य विचार मंचाने स्मिता पब्लिकेशनद्वारे ‘नव्हती कोणाची हिम्मत’ ही कवीता प्रसीद्ध होवुन वर्ल्ड बुक ऑफ गीनीज मध्ये या कवीतेची नोंद झाली. सम्यक बहुउद्येशिय सामाजिक विकाससंस्था या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष म्हणुन कार्यरत बौद्ध विकास मंडळाचा व नालंदा बुद्ध विहाराचा क्रियाशील सभासद, सिद्धार्थ पंचशील विकास मंडळ व षांतीदुत बुद्ध विहाराचा माजी अध्यक्ष, बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचा सहसचिव, पुरोगामी पत्रकार संघाचा सचिव, तरपुरोगामी बहुउद्येशीय सामाजिक संस्थेचा सचिव,मैत्रेय वैदयकिय सेवाभावी संस्थेचा सचिव,टेक्नोबाईट एज्युकेषन सोसायटीचा खजिनदार, महाराश्ट्रातील अनेक संस्थेवर सल्लागार म्हणुन कार्यरत असुनदै.वृत्तरत्नसम्राट,दै.विष्वपथ,दै.नवनगर,दै.कोकणसकाळ,दै.पुढारी तसेच प्रबुद्ध भारत या संपूर्ण महाराश्ट्रात जाणा-या व नावाजलेल्या वृत्तपत्रात अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार व स्तंभलेखनाद्वारे करून आशरामुक्तांगण या हिंदी साप्ताहिकाचा उपसंपादक,तसेच अनेक साप्ताहिकांमध्ये पत्रकारीता/स्तंभलेखक म्हणुन कार्यरत.
-5.2] प्रा. भरत आत्माराम शिरसाठ (एरंडोल जि.जळगाव) लेखक, कवी, समिक्षक
- सचिव- बौद्ध साहित्य प्रसार संस्था
- स्वागताध्यक्ष, तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन, जळगाव
- अध्यक्ष- समतावादी साहित्य शिक्षक मंडळ
- प्रकाशीत पुस्तके व साहित्यिक वाटचाल-
1.खैरलांजी आणि भीमा कोरेगाच्या जखमा 2.सत्यशोधक आणि इतर कथा 3.शिक्षक कसा असावा? 4.बकध्यान (काव्यसंग्रह) 5.दुसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन, कळवा- स्मरणिका संपादन 6.तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन, जळगाव- स्मरणिका संपादन 7. अनेक पुस्तकांवर समिक्षा लेखन 8. वर्तमान पत्रांमधून धम्मविषयक लेखन 9. पाळधी येथे विशाल धम्म परिषदेचे 2005साली यशस्वी आयोजन 10. जळगाव येथील तिसऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन
6] पुरस्कार
6.1]पहिल्या अखील भारतीय राज्यव्यापी बौद्ध साहित्य संमेलनातुन वितरित करण्यात आलेले पुरस्कार
रविवार दिनांक 01/01/2018 रोजी सनसवाडी पुणे येथे पहिल्या अखील भारतीय राज्यव्यापी बौद्ध साहित्य संमेलनातुन वितरित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळयातुन स्मृतीशेष शामुताई भोईर,दामोदर आंबो जाधव,गोविंद तुकाराम गायकवाड,भाऊसाहेब अडसूळ यांना मरणोत्तरपुरस्कार देण्यात आला. तसेच सुदाम पवार,मोहन गायकवाड,अभिमन्यु भालेराव,प्रिया खरे,अर्जुन गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.त्याच बरोबर बौद्ध साहित्यिक भाऊसाहेब अडसूळ हा पुरस्कार बौद्ध साहित्यिक अभ्यासक दिलिप घोडेस्वार (भुसावळ),विजय सोनवणे पुरस्कार बौद्ध साहित्यिक अभ्यासक राजु सांगळे (पुणे) व आप्पासाहेब रणपिसे पुरस्कार बौद्ध साहित्यिक अभ्यासक रमेश शिंदे यांना देण्यात आला.
6.2] द्वितीय अखील भारतीय राज्यव्यापी बौद्ध साहित्य संमेलनातुन वितरित करण्यात आलेले पुरस्कार
प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी कल्याण ( रजि.) डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव- पहिले बौद्ध साहित्य संमेलन दि.११.डिसेंबर २०१६ , बुद्धभूमी फाऊंडेशन, कल्याण येथे संपन्न झाले-अध्यक्ष: बौद्ध साहित्यिक सुनिल सोनवणे,उल्हासनगर.
लेखक व सामाजिक कार्यकर्ते आत्माराम शिरसाट यांच्या स्मृत्यर्थ बौद्ध साहित्य प्रसार संस्थेच्या वतीने साहित्य,समाज व धम्मकार्यासाठी प्रा.ज्योती पंडीत धुतमल परभणी,धनराज मोतीराम,जळगाव,सुरेश भालेराव देहुरोड, पुणे यांना त्रिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.