मराठी एकीकरण समिती
मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य (Marathi Ekikaran Samiti - Maharashtra Rajya) हे एक महाराष्ट्र राज्यातील बिगराजकीय संघटन आहे. ही लोकचळवळ मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषा, मराठी माध्यमातील शिक्षण, स्थानिक मराठी माणसांचा रोजगार यासाठी ६ जून २०१५ पासून महाराष्ट्रात कार्यरत आहे.[१] या समितीचे ब्रीद वाक्य - 'एकच ध्येय, एकच ध्यास, मराठी भाषा, मराठी शाळा, राज्य संस्कृतीचे संवर्धन व विकास' असे आहे.
स्थापना | ६ जून २०१५ |
---|---|
मुख्यालय | बी -१५, सेक्टर ७, शांती नगर, मीरा रोड पूर्व, मीरा भाईंदर, महाराष्ट्र – ४०११०७ |
सेवाकृत क्षेत्र | महाराष्ट्र |
सदस्यत्व | २२,०००+(२०२४) |
अधिकृत भाषा | मराठी |
संकेतस्थळ | marathiekikaransamiti |
ध्येय आणि धोरण
संघटनेचे मूळ ध्येय मराठी माणसांना एकत्र आणून उद्योग क्षेत्रात मराठी माणसाची मोठी फळी उभारावी हे आहे. राज्यात होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपी विरोधात आवाज उचलण्यासाठी कायदेशीर लढा देणे, आंदोलने करणे, मराठी हा विषय राजकारणापुरता नसून राजकारणाचा वापर मराठी संवर्धनसाठी केला पाहिजे हे संघटनेचे धोरण आहे.[२] ही संघटना सर्व राजकीय पक्षांना, राज्यातील जनतेला मराठी भाषेविषयी, मराठी शाळांविषयी जागरूक करण्याचे काम करत आहे.[३] या महाराष्ट्रात धर्म, जात, राजकीय पक्ष बाजूला ठेवून मराठीसाठी कार्य करणारी ही बिगराजकीय संघटना आहे.
पदाधिकारी
गोवर्धन सखाराम देशमुख हे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष असून प्रदीप जयराम सामंत हे संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत.[४] संघटनेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र आहे.
कार्य आणि आंदोलने
महाराष्ट्रात मराठी भाषा भवन व्हावे ही मराठी एकीकरण समितीची आधीपासूनची मागणी असून यासाठी संघटनेने वेळोवेळी मागण्या तसेच आंदोलने केली आहेत.[५] मराठी माणसाला मुंबई आणि उपनगरांत घर नाकारल्याच्या मुद्द्यावर संघटनेने कायम आवाज उठवला आहे.[६][७] सक्तवसुली संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणेच्या दक्षिण मुंबईतील बेलार्ड ईस्टेट कार्यालयाच्या दर्शनी भागातील फलकावर कार्यालयाचे नाव केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहीलेले होते. मराठी एकीकरण समितीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून हा फलक मराठीत करून घेतला.[८][९]
मीरा भाईंदरमध्ये होणाऱ्या हिंदी भाषा भवनाला समितीने प्रखर विरोध केला आहे.[२][१०] मराठीत वाहन क्रमांक असणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात याबाबत समितीने अनेक वेळा पाठपुरावा केला आहे.[११][१२] मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण असल्याने शिक्षक भरतीमधून काढलेल्या २५० शिक्षकांना मराठी एकीकरण समितीने मिळवून दिला आहे. यासाठी समितीने तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांच्याशी पाठपुरावा करून सर्व शिक्षकांना त्यांच्या हककाची नोकरी मिळवून दिली.[१३]
अधिकृत संकेतस्थळ
https://www.marathiekikaransamiti.org Archived 2018-11-01 at the Wayback Machine.
संदर्भ
- ^ "मराठी एकीकरण समिति (महाराष्ट्र राज्य) – Marathi Ekikaran Samiti (Maharashtra Rajya) – मराठी भाषा, अस्मिता, संस्कृति, रोजगार, शाळा, शिक्षण यांच्यासाठी लढणारी एकमेव बिगर राजकीय लोकचळवळ" (इंग्रजी भाषेत). 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ a b "मीरा भाईंदरमध्ये हिंदी भाषिक भवन उभारण्यास मराठी एकीकरण समितीचा विरोध". www.lokmat.com. 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ Bharat, E. T. V. (2021-02-21). "जागतिक मातृभाषा दिन : मातृभाषेचे संवर्धन आता मराठी भाषिकांच्या हाती". ETV Bharat News. 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ CD (2024-08-05). "मराठी एकीकरण समितीचा स्नेहमेळावा". Marathi News Esakal. 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ मुंबई, वैदेही काणेकर, साम टीव्ही (2021-10-13). "महाराष्ट्रात मराठी भाषा भवन ६० वर्षे होऊ शकले नाही हे दुर्दैव - गोवर्धन देशमुख". Marathi News Saam TV. 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ "मराठी माणसाला घर नाकारण्याचा अधिकार सोसायटीला आहे का?".
- ^ PTI (2021-10-11). "Refused a home sale deal for being 'Marathi-speaking', Thane man files police complaint". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2023-06-15). "ईडी सर्वांना नोटीस देते, परंतू ईडीलाच या संस्थेने नोटीस दिली आणि ई़डी कार्यालयावर मराठी झळकली". TV9 Marathi. 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2023-01-07). "ईडीला मराठी भाषेत फलक लिहिण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश". TV9 Marathi. 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat (2022-11-26). "हिंदी भाषा भवन विरोधात मराठी एकीकरण समितीचे आंदोलन". Lokmat. 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ Bharat, E. T. V. (2019-09-15). "मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश नाहीत; माहिती अधिकारात उघड". ETV Bharat News. 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ वृत्तसेवा, सकाळ (2019-09-13). "मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई का..." Marathi News Esakal. 2024-09-01 रोजी पाहिले.
- ^ माझा, निलेश बुधावले, एबीपी (2021-02-22). "मुंबई महापालिकेने नोकरी नाकारलेल्या शिक्षकांच्या समर्थनात मराठी एकीकरण समिती रस्त्यावर; आंदोलनाचा इशारा". marathi.abplive.com. 2024-09-02 रोजी पाहिले.