मराठा सुतार
मराठा सुतार, कवड्या सुतार, कातफोडया तथा वाढई (शास्त्रीय नाव:पिकॉइेस मऱ्हाटेन्सिस) हा एक छोटा पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये यलोफ्रंटेड पाइड किंवा मऱ्हाटा वूडपेकर असे नाव आहे.
आकार
१८ सेमि
माहिती
साधारण १८ सेमी आकाराचा हा पक्षी आपल्या चोची ने खोडाच्या सालीमध्ये दडलेले कीटक किंवा बुंधा पोखरून त्यातील अळ्या खातो. हे पक्षी सहसा बाभळीचे रान, आमराई, पानझडी जंगले आणि बागा अशा ठिकाणी दिसतात. यांच्या डोक्यावर लाल कलगी असते. आपल्या शेपटीच्या कडक पिसांच उपयोग हे तिसऱ्या पायासारखा करतात.
ऐककटे किंवा जोडीन राहणारे पक्षी 'चिक्!' किवा 'क्लिक!' असा तीव्र (उंच पट्टीतला, पांढऱ्या छातीच्या खंड्यासमान) आवाज काढतात. यांच्या विणीचा हंगाम मार्च ते ऑगस्टच्या दरम्यान असतो. सुतार वठलेल्या फांदीला पाडलेल्या भोकात राहतात. नराच्या तुऱ्यातली शेंदरी पिसं मादीमध्ये नसतात.
संदर्भ
- दोस्ती करू या पक्ष्यांशी - किरण पुरंदरे