Jump to content

मराठा साम्राज्याच्या टांकसाळी

शिवराई होन - शिवछत्रपतींनी रायगडावर पाडलेले पहिले नाणे.
शिवराई होन - शिवछत्रपतींनी रायगडावर पाडलेले पहिले नाणे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैदिक राज्याभिषेकाने मराठा साम्राज्याची स्थापना झाली आणि हे साम्राज्य १६७४ - १८१८ पर्यंत अस्तित्वात होते. स्थाप्नेच्याच वेळी महाराजांनी रायगडास टांकसाळ स्थापून तेथून सोन्याचे 'होन' व तांब्याची 'शिवराई' पडून मराठा चलनाची सुरुवात केली.[][]

कालांतराने, जसेजसे साम्राज्य वाढत गेले, तसेतसे नव्या टांकसाळी स्थापल्या गेल्या. तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर यांतील बरीच टांकसाळी स्वतंत्र मराठा संस्थानिकांच्या सत्तेत जाऊन कार्यरत राहिल्या. या कंपनी अथवा ब्रिटिश राज कालीन टांकसाळींचा सदर लेखात उल्लेख केला नाही.

पश्चिम भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी

पश्चिम भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी
टांकसाळ / शहराचे नाव जिल्हा राज्य
अहमदनगर अहमदनगर महाराष्ट्र
अहमदाबाद अहमदाबाद गुजरात
अलिबाग रायगड महाराष्ट्र
अथणी बेळगाव कर्नाटक
बागलकोट बागलकोट कर्नाटक
बंकापुर हावेरी कर्नाटक
बारामती पुणे महाराष्ट्र
बावडा कोल्हापूर महाराष्ट्र
बेलापूर ठाणे महाराष्ट्र
बेळगाव-शाहपूर बेळगाव कर्नाटक
भातोडी अहमदनगर महाराष्ट्र
भोर पुणे महाराष्ट्र
भिवंडी ठाणे महाराष्ट्र
बिजापूर बिजापूर कर्नाटक
बुऱ्हानपूर बुऱ्हानपूर मध्य प्रदेश
चाकण पुणे महाराष्ट्र
चांभारगोंदा (श्रीगोंदा) अहमदनगर महाराष्ट्र
चांदोर (चांदवड) नाशिक महाराष्ट्र
चिकोडी बेळगाव कर्नाटक
चिंचवड पुणे महाराष्ट्र
चोपडा, एरंडोल, आणि पारोळा जळगाव महाराष्ट्र
धारवाड धारवाड कर्नाटक
घोटवडे पुणे महाराष्ट्र
गोकाक बेळगाव कर्नाटक
हुक्केरी बेळगाव कर्नाटक
कागल कोल्हापूर महाराष्ट्र
कापशी कोल्हापूर महाराष्ट्र
खानापूर बेळगाव कर्नाटक
कित्तूर बेळगाव कर्नाटक
कोल्हापूर कोल्हापूर महाराष्ट्र
कमळगड सातारा महाराष्ट्र
लक्ष्मिश्वर गदग कर्नाटक
मैंदर्गी सोलापूर महाराष्ट्र
मलकापूर कोल्हापूर महाराष्ट्र
मनोळी बेळगाव कर्नाटक
मिरज आणि सांगली सांगली महाराष्ट्र
जामखंडी बागलकोट कर्नाटक
मुधोळ बागलकोट कर्नाटक
मुल्हेर नाशिक महाराष्ट्र
मुरगोड बेळगाव कर्नाटक
नागोठणे रायगड महाराष्ट्र
नरगुंड गदग कर्नाटक
नाशिक नाशिक महाराष्ट्र
नवलगुंद धारवाड कर्नाटक
निपाणी बेळगाव कर्नाटक
पन्हाळा कोल्हापूर महाराष्ट्र
पेडगाव अहमदनगर महाराष्ट्र
फलटण सातारा महाराष्ट्र
फुलगाव पुणे महाराष्ट्र
पुणे पुणे महाराष्ट्र
रहिमतपूर सातारा महाराष्ट्र
रायगड रायगड महाराष्ट्र
राजापूर रत्‍नागिरी महाराष्ट्र
रामदुर्ग बेळगाव कर्नाटक
राशीन अहमदनगर महाराष्ट्र
रेवदांडा रायगड महाराष्ट्र
साष्टी बृहन्मुंबई महाराष्ट्र
सातारा सातारा महाराष्ट्र
सोलापूर सोलापूर महाराष्ट्र
तळेगाव दाभाडे पुणे महाराष्ट्र
तळेगाव ढमढेरे पुणे महाराष्ट्र
तळेगाव इंदुरी पुणे महाराष्ट्र
तरळी सातारा महाराष्ट्र
तासगाव सांगली महाराष्ट्र
टेंभुर्णी सोलापूर महाराष्ट्र
तोरगल बेळगाव कर्नाटक
वाफगाव पुणे महाराष्ट्र
विशालगड कोल्हापूर महाराष्ट्र
वाडी सिंधुदुर्ग महाराष्ट्र
वाई सातारा महाराष्ट्र
वाठार सातारा महाराष्ट्र
यादवाड बेळगाव कर्नाटक

मध्य भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी

मध्य भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी
टांकसाळ / शहराचे नाव जिल्हा राज्य
गढा मंडला मंडला मध्य प्रदेश
जालौन, काल्पी, कुनार आणि कोंच जालौन उत्तर प्रदेश
झांसी झांसी उत्तर प्रदेश
महोबा महोबा उत्तर प्रदेश
सागर सागर मध्य प्रदेश
सिरोंज विदिशा मध्य प्रदेश
श्रीनगर महोबा उत्तर प्रदेश
अलीपूर बांदा उत्तर प्रदेश
बांदा बांदा उत्तर प्रदेश
चरखारी महोबा उत्तर प्रदेश
मोंढा फिरोझाबाद उत्तर प्रदेश
राथ हमीरपुर उत्तर प्रदेश
तरवाहा बांदा उत्तर प्रदेश

उत्तर भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी

उत्तर भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी
टांकसाळ / शहराचे नाव जिल्हा राज्य देश
आग्रा आग्रा उत्तर प्रदेश भारत
अजमेर अजमेर राजस्थान भारत
अलिगड अलिगड उत्तर प्रदेश भारत
दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली दिल्ली केंद्राशाशित प्रदेश भारत
इटावा इटावा उत्तर प्रदेश भारत
गोकुळ, मथुरा आणि वृंदावन मथुरा उत्तर प्रदेश भारत
गोकुळगड रेवाडी हरियाना भारत
हरिद्वार हरिद्वार उत्तरखंड भारत
लाहोर लाहोर पंजाब पाकिस्तान
मुलतान मुलतान पंजाब पाकिस्तान
पानिपत पानिपत हरियाना भारत
सहारनपुर सहारनपुर उत्तर प्रदेश भारत

दक्षिण भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी

दक्षिण भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी
टांकसाळ / शहराचे नाव जिल्हा राज्य
बालापूर बंगळूर ग्रामीण जिल्हा कर्नाटक
गंजीकोट / गंडीकोटा कडप्पा आंध्र प्रदेश
जिंजी विलुपुरम तमिळ नाडू
गुत्ती अनंतपुर आंध्र प्रदेश
गुर्रमकोंडा चित्तूर आंध्र प्रदेश
होसकोट बंगळूर ग्रामीण जिल्हा कर्नाटक
कोंडीकोंडा अनंतपुर आंध्र प्रदेश
कोलार कोलार कर्नाटक
नंदीदुर्ग चिकबल्लपूर कर्नाटक
सीरा तुमकूर कर्नाटक
तंजावूर तंजावूर तमिळ नाडू
वेल्लूर वेल्लूर तमिळ नाडू

सारांश

स्वतंत्र भारतातील २९ राज्ये आणि ७ केंद्राशाशित प्रदेशांपैकी मराठ्यांनी १० राज्ये आणि १ केंद्राशाशित प्रदेशात आपली टांकसाळे स्थापित केली. तसेच पाकिस्तानात दोन शहरात, अल्पकाळ का असेना, टाकसाळे चालविली. ही सर्व टांकसाळे एकाच वेळी कार्यरत होती असे नाही. तरी, भारतभर पसरलेल्या या टांकसाळीं मराठ्यांच्या साम्राज्याची ग्वाही देतात. ही राज्ये व त्यांतील ज्ञात टांकसाळी यांचा तक्ता खालीलप्रमाणे.

मराठ्यांच्या ज्ञात टांकसाळींंचा राज्यप्रमाणे तक्ता
राज्य एकूण ज्ञात टांकसाळी
आंध्र प्रदेश
उत्तर प्रदेश १५
उत्तरखंड
कर्नाटक २७
गुजरात
तमिळ नाडू
दिल्ली
पाकिस्तानी पंजाब
मध्य प्रदेश
महाराष्ट्र ४८
राजस्थान
हरियाना

संदर्भ सूची

  1. ^ बलसेकर, दिलीप (2007). मराठेकालीन नाणी (Marathi भाषेत). Anjaneri, Nashik: IIRNS Publications. ISBN 81-86786-27-9.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Maheshwari, Kamlesh Kumar; Wiggins, Kenneth (1989). Maratha Mints and Coinage. Anjaneri, Nashik: IIRNS.