Jump to content

मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य

मयुरेश्वर अभयारण्य
मयुरेश्वर अभयारण्याच्या वनविभाग कार्यालयाचे प्रवेशद्वार.
मयुरेश्वर अभयारण्याच्या वनविभाग कार्यालयाचे प्रवेशद्वार.
मयुरेश्वर अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
मयुरेश्वर अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य
ठिकाणबारामती, पुणे, महाराष्ट्र, भारत
जवळचे शहरबारामती
गुणक18°20′6″N 74°22′15″E / 18.33500°N 74.37083°E / 18.33500; 74.37083
क्षेत्रफळ ५.१४ चौ. किमी (१.९८ चौ. मैल)
स्थापना १९९७


मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अभयारण्य आहे. ते पुण्यापासून ७२ किमी आणि दौंडपासून ३५ किमी अंतरावर आहे.

पाखुर्डी
चिंकारा
भारतीय लांडगा
आखुड बोटांचा सर्पगरुड
धाविक

इतिहास

हा भाग भारतीय वन्यजीव संस्थेने १९ ऑगस्ट १९९७ मध्ये अभयारण्य घोषित केला.

वनस्पती आणि वन्यजीव

मयुरेश्वर अभयारण्यामध्ये बहुतांश बाभूळ, खैर, हिवर, सिसू, बोर, करवंद यांसारख्या शुष्क पानझडी वनस्पती आणि गवताळ प्रदेश आढळतो.

इथे अनेक प्रकारचे पक्षीही आढळतात, जसे, धाविक, भारतीय नीलपंख, घार, भारतीय राखी धनेश, कंठवाला होला, पांढऱ्या छातीचा धीवर, चिमण चंडोल, खाटीक, छोटा तपकिरी होला, निळ्या गालाचा राघू, पांढऱ्या कंठाची मनोली, सातभाई, गरुड, इ.

प्राण्यांमध्ये चिंकारा, तरस, भारतीय लांडगा, भारतीय कोल्हा, खोकड, भारतीय ससा हे प्राणी इथे आढळतात.

इतर माहिती

मयुरेश्वर अभयारण्य त्यामध्ये आढळणारे वन्यजीव आणि पक्षी याबरोबरच तिथल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. चिंकारा पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. पर्यटक स्वतःच्या गाडीतून किंवा पायी चालत प्राणी पाहू शकतात.

मे २०१६ मध्ये इथले शुल्क पुढीलप्रमाणे होते:

  • प्रवेश शुल्कः ₹३० प्रत्येकी
  • चार चाकी गाडीचे शुल्कः ₹१००
  • दुचाकीचे शुल्कः ₹२५
  • कॅमेरा: ₹५०

अभयारण्यामध्ये वनविभागाचे दोन तंबू आहेत. राहण्याची सर्वात जवळची व्यवस्था सुपे गावामध्ये आहे.

अभयारण्याला भेट देण्यचा सर्वोत्तम काळ ऑगस्ट अखेर ते फेब्रुवारी आहे. उन्हाळ्यामध्ये इथे खूप गरमी आणि दमट हवमान असते.

अंतर

  • पुणे – ७४ किमी
  • बारामती – ४१ किमी
  • मुंबई – २२० किमी
  • सातारा – ८८ किमी
  • अहमदनगर – १११ किमी
  • बीड – १९८ किमी
  • सोलापूर – २११ किमी
  • नाशिक – २६५ किमी
  • कोल्हापूर – २०५ किमी

संदर्भ

  • "मयुरेश्वर अभयारण्य" (इंग्रजी भाषेत).