Jump to content

मयुरी वाघ

मयुरी वाघ मराठी मालिका आणि चित्रपटांमधील अभिनेत्री आहे.

कारकीर्द

ती मुंबईजवळील डोंबिवली येथील रहिवासी आहे. तिनेे तिच्या कार्याची सुरुवात सहनर्तक व व नाट्य कलाकार म्हणून केली. "वचन दिले तू मला" या स्टार प्रवाह वरील मालिकेपासून तिने मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने झी मराठी वरील अस्मिता या मालिकेत गुप्तहेर अस्मिताची मुख्य भूमिका साकारली आणि ही भूमिका मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. हाऊसफुल्ल, सुगरण आणि मेजवानी अशा रिॲलिटी शोमध्ये तिने काम केले आहे.

वैयक्तिक आयुष्य

मयुरी वाघ हिने तिचे शिक्षण मुलुंड येथील केळकर संस्थेचे वि.ग. वझे महाविद्यालय येथे पूर्ण केले. तसेच मानव संसाधनाचे पदव्युत्तर शिक्षण वेलिंगकर महाविद्यालयातून केले आहे. तिचा विवाह अभिनेता पियूष रानडे ह्याच्याशी झाला आहे.

नाटक

  • सोहळा गोष्ट प्रेमाची
  • मांगल्याचं लेणं

दूरचित्रवाणी मालिका

  • लव्ह लग्न लोचा
  • अस्मिता
  • कॉमेडी एक्सप्रेस
  • वचन दिले तू मला
  • ही वाट दूर जाते
  • या वळणावर
  • मेजवानी परिपूर्ण कीचन
  • सुगरण
  • हाऊसफुल्ल

चित्रपट

  • मन्या: द वंडर बॉय