मन्वादि तिथी
१४ मन्वंतरांपैकी ज्या तिथीला त्या मन्वंतराची सुरुवात झाली त्या तिथीला मन्वादि तिथी म्हणतात. पंचांगात अशा तिथीसमोर 'मन्वादि' असा स्पष्ट उल्लेख असतो.
मन्वंतराचे नाव आणि त्याच्याशी संबधित मन्वादि तिथी
- इंद्रसावर्णि - श्रावण कृष्ण अष्टमी
- औत्तम (उत्तम) - कार्तिक पौर्णिमा
- चाक्षुष - आषाढ पौर्णिमा
- तामस - कार्तिक शुक्ल द्वादशी
- दक्षसावर्णि - आश्विन शुक्ल नवमी
- देवसावर्णि - श्रवण अमावास्या
- धर्मसावर्णि - पौष शुक्ल त्रयोदशी
- ब्रह्मसावर्णि - माघ शुक्ल सप्तमी
- रुद्रसावर्णि - भाद्रपद शुक्ल तृतीया
- रैवत - आषाढ शुक्ल द्वादशी
- वैवस्वत - ज्येष्ठ पौर्णिमा
- सावर्णि - फाल्गुन पौर्णिमा
- स्वायंभुव - चैत्र शुक्ल तृतीया
- स्वारोचिष - चैत्र पौर्णिमा
पहा :- युगादि तिथी