Jump to content

मनोहर माळगांवकर

मनोहर दत्तात्रेय माळगांवकर
जन्म नाव मनोहर माळगांवकर
जन्म १२ जुलै १९१३जगलपेट
मृत्यू १४ जून २०१०
जगलपेट
भाषा इंग्लिश

मनोहर दत्तात्रेय माळगांवकर ( १२ जुलै १९१३; - उत्तर कन्नड जिल्ह्यातील जगलपेट, १४ जून २०१०) हे इंग्लिश भाषेमधील मराठी लेखक आहेत.

माळगांवकरांचा जन्म एका राजघराण्यात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. ते हिंदुस्तानी सैन्याच्या मराठा लाइट इन्फंट्रीमधील अधिकारी, तसेच शिकारी, मुलकी अधिकारी, खाणमालक आणि शेतकरी होते. ते भारतीय संसदेसाठी उमेदवार म्हणूनही उभे राहिले होते.

मनोहर माळगावकरांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके

  • ए बेंड इन् द गँजेस (१९६४) - ही कादंबरी भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवरची. सूड आणि क्रौर्य ह्यांचे रोमांचकारी दर्शन घडवते.
  • काँबॅट ऑफ शॅडोज (१९६२) - कादंबरी : चहामळ्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या कादंबरीत हेन्री विंटन ह्या स्वार्थी, आत्मकेंद्रित वृत्तीच्या व्यवस्थापकाची कहाणी सांगितली आहे. मराठी अनुवाद - अधांतरी (भा.द. खेर)
  • कान्होजी आंग्रे, मराठी ॲडरिमल (१९५९) - इतिहासग्रंथ
  • छत्रपतीज ओफ कोल्हापूर (१९७१) - इतिहासग्रंथ
  • ए टोस्ट इन वॉर्म वाइन (१९७४) - कथासंग्रह.
  • डिस्टंट ड्रम (१९६१) - भारतीय सेनाविश्वाचे प्रत्ययकारी दर्शन घडविणारी माळगावकरांची पहिली कादंबरी.* द डेव्हिल्स विंड (१९७२) - कादंबरी. १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा 'द डेव्हिल्स विंड'चा विषय आहे.
  • पोवार्स ओफ देवास-सीनिअर (१९६३) - इतिहासग्रंथ
  • द प्रिन्सेस (१९६३) - कादंबरी : द प्रिन्सेस ही माळगावकरांची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत सापडलेल्या बेगवाड नावाच्या संस्थानाची कहाणी सांगणाऱ्या ह्या कांदबरीस मोठे यश लाभले. संस्थानिकांबद्दल एक प्रकारची ओढ बाळगूनही सरंजामशाही व लोकशाही ह्यांच्यातील द्वंद्व त्यांनी समतोलपणे रंगविले आहे. मराठी अनुवाद - द प्रिन्सेस आणि पिसाटवारे (भा.द. खेर)
  • द मेन हू किल्ड गांधी (इतिहास, १९७८)