Jump to content

मनोहर जाधव

मनोहwर जाधव (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी कवी, समीक्षक, प्राध्यापक व भाषांतरकार आहेत.

अध्यापन कारकीर्द

जाधन फैजपूर येथे अध्यापन करून इ.स. १९९५ साली पुण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदी त्यांनी काम केले. त्यांच्या पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखपदाच्या कारकिर्दीत चार नवे अभ्यासक्रम चालू करण्यात आले[ संदर्भ हवा ]. यात मराठी भाषेच्या अमराठी अभ्यासकांसाठी लक्षून बनवलेल्या सहा महिन्यांच्या मराठीचा पदविका अभ्यासक्रमाचा समावेश होता.एम.ए.एम.फिल.पीएच.डी

  • सहाय्यक प्राध्यापकः

मराठी विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ(1998 ते 2003)

  • सहयोगी प्राध्यापक (2003 ते 2008)
  • प्राध्यापक व विभाग प्रमुख:

13 सप्टेंबर 2008 ते 13 सप्टेंबर 2011

  • 2011 पासून प्राध्यापक...तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता

साहित्यिक कारकीर्द

त्यांनी दलित साहित्य व प्रामुख्याने दलित काव्याचे समीक्षण केले आहे. दलित स्त्रियांची आत्मकथने, प्रत्ययपर्व, साहित्यः शोध आणि बोध हे त्यांचे प्रमुख समीक्षाग्रंथ होत. हिंदी भाषेतील सहा समकालीन कवींच्या कवितांच्या अनुवादाचे कामही त्यांनी पूर्ण केले असून, अनुवादित कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे[ संदर्भ हवा ]. प्रकाशित साहित्यः कविता संग्रह ➡'कधी कधी,'नवीन उद्योग (1996) ➡प्रत्ययपर्व,ग्रंथाली (2010) ➡तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात,ग्रंथाली(2014)

समीक्षाग्रंथ: ➡साहित्य दृष्टी आणि दृष्टिकोन,नवीन उद्योग(1996) ➡प्रबोधन आणि परिवर्तन,नवीन उद्योग(1996) ➡दलित स्त्रियांची आत्मकथने:स्वरूप आणि चिकित्सा,सुविद्या प्रकाशन(2001) ➡ परिवर्तनाचे प्रवाह,पद्मगंधा प्रकाशन(2010)

संपादने: ➡साहित्य शोध आणि संवाद(डाॅ.गंगाधर पानतावणे यांची अध्यक्षीय भाषणे व मुलाखती) सुविद्या प्रकाशन(2000) ➡समीक्षेतील नव्या संकल्पना,स्वरूप प्रकाशन (2014) ➡साहित्य,समाज आणि संस्कृती(डाॅ.गंगाधर पानतावणे गौरवग्रंथ) सुविद्या प्रकाशन(2006) ➡मराठी वाड.मयाचा इतिहास:पुनर्लेखन दिशा,सुविद्या प्रकाशन(2010) ➡समकालीन साहित्य चर्चा(डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले गौरवग्रंथ) प्रतिमा प्रकाशन(2010) शोधनिबंध- पुस्तक परीक्षणे आणि ललित गद्यः 🖊 अस्मितादर्श,अनुबंध,सत्याग्रही विचारधारा,परिवर्तनाचा वाटसरू,सुगावा,समाज प्रबोधन पत्रिका,महाराष्ट्र टाईम्स(रविवार संवाद ),लोकसत्ता (रविवार लोकरंग),लोकमत(मंथन) ,सकाळ(सप्तरंग).....इ.नियतकालिकात/दैनिकांत लेखन प्रसिद्ध 🖊रविवार सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीत 'मंथन' या शीर्षकाचा ललित स्तंभ लेखन(2014) 🖊तस्लिमा नसरीन,निर्मला पुतुल,सर्वेश्वर द्याल सक्सेना,राजेश जोशी,अरुण कमल,कुमार अंबुज,एकांत श्रीवास्तव ,पवन करण इ...हिंदीतील अनेक प्रथितयश कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद... 🖊'उगवेल का अशी एखादी पहाट' ?स्वागत पुस्तकांचे,मंथन पुरवणी,लोकमत 22 मार्च 2015,पान 17

पुरस्कार

जाधव यांना बुलडाणा जिल्हा साहित्य संघातर्फे उत्कृष्ट साहित्य निमिर्तीचा पुरस्कार देण्यात आला[ संदर्भ हवा ].

1)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कविवर्य भा.रा.तांबे पारितोषिक 2)साहित्य दृष्टी आणि दृष्टिकोन या समीक्षा ग्रंथास 'अस्मितादर्श ' वाड.मय पुरस्कार 1997 3)'प्रत्ययपर्व' या कवितासंग्रहासाठी बुलढाणा जिल्हा साहित्य संघाचा कवी ना.घ.देशपांडे पुरस्कार 2012 4)दलित स्त्रियांची आत्मकथने:स्वरूप आणि चिकित्सा या ग्रंथास अस्मितादर्श'वाड.मय पुरस्कार ,2004 5)जालना येथील ऊर्मी नियतकालिकातर्फे काव्यविषयक योगदानाबद्दल दिला जाणारा 'कवी ना.धो.महानोर पुरस्कार',2015 6)'कैफी आझमी पुरस्कार',बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन , पुणे 2015 7)'बाबा भारती प्रबद्ध पुरस्कार' राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे 2015 8)साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान,पुणे यांच्या वतीने साहित्यक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिकास दिला जाणारा 'साहित्यभूषण' पुरस्कार 1 फेब्रुवारी 2016 9)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकासाठी दिला जाणारा 'प्राचार्य व्ही.के.जोग स्मृती पुरस्कार' विद्यापीठ वर्धापनदिनी प्रदान,10 फेब्रुवारी 2016 10)'तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात' या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा 'कवी केशवसुत पुरस्कार' दि.27 फेब्रुवारी 2016