Jump to content

मनोज आचार्य


मनोज आचार्य हे एक प्रसिद्ध मराठी लेखक चित्रकार, संपादक आणि इंडस प्रकाशन सोर्स बुक्स संस्थेचे मराठी विभागाचे मुख्य संपादक आहेत. गेली अडोतीस वर्षे ते मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. अडीच-तीन हजार पुस्तकांची मुखपृष्ठे केली आहेत. त्यांनी "कदंब" नावाचा अतिशय दर्जेदार दिवाळी अंक २००० ते २०१०पर्यंत विविध विषय घेऊन प्रकाशित केला. त्याला चांगला वाचकवर्ग लाभला. त्या शिवाय त्यांनी "वसा" हा दिवाळी अंकदेखील दहा वर्षे संपादित केला. गेली वर्षे त्यांनी अनेक दिवाळी अंकात कथा, लेख यांच्यावर चित्रे काढली आहेत.त्यांचा संगीताचा व्यासंग कमालीचा आहे. किशोरी अमोणकर, बडे गुलाम अली खान या शास्त्रीय गायकांवरील तसेच अरुण दाते, सुमन कल्याणपूर या सुगमसंगीतातील गायकांवरील लेख खूप अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहेत.

पुस्तके

  • देहबोली( अनुवादित), संस्कृती-आध्यात्मिक, प्राचीन, वाङ्‌यीन, सांगीतिक, सामाजिक