मनीष बसीर
मनीष बसीर | |
---|---|
जन्म | ३ जुलै, १९८४ बिकानेर, राजस्थान |
शिक्षण | आयआयटी दिल्ली, आयआयएम बंगलोर |
पेशा | क्छायाचित्रकार |
मनीष बसीर (३ जुलै, १९८४:बिकानेर, राजस्थान - ) एक भारतीय चित्रपत्रकार आणि लँडस्केप छायाचित्रकार आहे. त्याने बाजीराव मस्तानी आणि फोटोग्राफ यासारख्या चित्रपटात छायाचित्रकार म्हणून काम केले. सन २०१९ मध्ये त्यांना लँडस्केप फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरविण्यात आले.[१]
शिक्षण
बसीरने २००६ साली आयआयटी दिल्लीमधून पदवी प्राप्त केली. सन २०१० मध्ये त्यानी आयआयएम बंगलोर येथून एमबीए केले[२].
कारकीर्द
मनीषने २००७ साली छायाचित्रीकरणाची सुरुवात केली.२००८-२०१० मध्ये त्यानी नवभारत टाईम्स वृत्तपत्रासाठी फोटो जर्नलिस्ट म्हणून काम केले. २०११ मध्ये त्यानी लँडस्केप फोटोग्राफी सुरू केली. २०१५ मध्ये त्याला "लेन्झ - सर्वात वेगवान फोटोशॉट पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले[३].नट जिओ इंडिया, फोर्ब्स ट्रॅव्हल गाईड आणि केरळ टुरिझममध्ये त्यांचे प्रवासी छायाचित्रे वैशिष्ट्यीकृत आहेत[४].
कामे
चित्रपट | वर्ष | काम |
---|---|---|
बाजीराव मस्तानी | २०१५ | छायाचित्रकार |
फोटोग्राफ | २०१९ | छायाचित्रकार |
पुरस्कार[ संदर्भ हवा ]
- बिकानेर स्ट्रीट जर्नलचा लँडस्केप फोटोग्राफर ऑफ द इयर अवॉर्ड (२०१९)
- लेन्झ - सर्वात वेगवान फोटोशॉट पुरस्कार (२०२०)
बाह्य दुवे
मनीष बसीर आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "One Man, Many Callings: India's Leading Travel Photographer Manish Baser". ding.in. 2021-02-27 रोजी पाहिले.
- ^ "Leading Travel Photographer Manish Baser portrays varied culture through his clicks". www.ibtimes.sg (इंग्रजी भाषेत). 2020-09-15. 2020-10-21 रोजी पाहिले.
- ^ "Manish Baser shares tips on how to grow on social media". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-21 रोजी पाहिले.
- ^ "Manish Baser explains key elements of travel photography". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2020-08-18. 2021-01-04 रोजी पाहिले.