Jump to content

मनस्विनी लता रवींद्र

मनस्विनी लता रवींद्र या मराठीतल्या नाटककार, अभिनेत्री, दिग्दर्शक आहेत. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नाट्यशिक्षण घेतल्यावर त्या मूबईला आल्या. दूरचित्रवाणीवरील ’एका लग्नाची दुसरी गोष्ट‘ या मालिकेचे संवादलेखन मनस्विनी लता रवींद्र यांचे होते. तसेच 'दिल दोस्ती दुनियादारी' ह्या मालिकेसाठी त्यांनी पटकथा-संवाद लेखन केले. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा-माधव' चित्रपट त्यांनीच लिहिला आहे. त्यांनी लिहिलेल्या 'ब्लॉगच्या आरश्यापल्याड' ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.

मनस्विनी लता रवींद्र यांनी लिहिलेली नाटके/ललित लेखसंग्रह

  • अमर फोटो स्टुडिओ
  • अलविदा
  • एकमेकांत
  • ब्लॉगच्या आरश्यापल्याड (ललित)
  • माझ्या वाटणीचं खरंखुरं
  • लखलख चंदेरी
  • सिगारेट्‌स
  • डावीकडून चौथी बिल्डींग

मनस्विनी लता रवींद्र यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

  • बेबी
  • मिटली पापणी

मनस्विनी लता रवींद्र यांचे दूरदर्शन मालिका-पटकथा/संवाद लेखन

  • एका लग्नाची दुसरी गोष्ट
  • दिल दोस्ती दुनियादारी
  • ती फुलराणी

मनस्विनी लता रवींद्र यांचे पटकथालेखन

  • रमा-माधव

सन्मान आणि पुरस्कार

  • लंडनच्या राॅयल कोर्ट थिएटरने नाटकांसंबंधीच्या एका कार्यशाळेसाठी सन्मानाने आमंत्रित
  • संगीत नाटक अकादमीचा युवा पुरस्कार (२००७)


पहा : नाटक; स्त्री नाटककार