Jump to content

मनसर

मनसर हे नागपूर-जबलपूर-वाराणसी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -७ वर असलेले महाराष्ट्रातील एक गाव आहे. हे नागपूरपासून सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. या ठिकाणापासून जवळच मॅंगनीजच्या खाणी आहेत. नागपूरहून रामटेकला जाण्यास या गावावरून जावे लागते. येथून रामटेक सुमारे ७ किमी अंतरावर आहे. तसेच मनसर पासून महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प जवळ आहे.