Jump to content

मनशक्ती प्रयोगकेंद्र

साचा:विज्ञान आणि तत्त्वज्ञान मनशक्ती प्रयोगकेंद्राविषयी

मुख्य ट्रस्ट 'मनशांती न्यू वे आश्रम'(रजि.क्र.ई-४३७ पुणे),सह ट्रस्ट 'मनशक्ती रेस्ट न्यू वे'(रजि.क्र.ई -५२४ पुणे),'हेल्थ न्यू वे'(रजि.क्र.ई -७३३ पुणे),'न्यू वे उद्योगशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट'(रजि.क्र.ई-३६८२ पुणे) या चार ट्रस्टच्या माध्यमातून'मनशक्ती प्रयोगाकेंद्र' कार्य करते.
मनशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी 'न्यू वे' तत्त्वज्ञान मांडले.
'न्यू वे'चा मुख्य उद्देश दुःखमुक्ती साधणे व सुख टिकवणे हा आहे.यासाठी ज्ञान, कर्म, भक्ती यांचा सुरेख संगम 'न्यू वे'च्या उपक्रमात असतो. हे सर्व कार्य,'न्यू वे'च्या पन्नास स्थानिक शाखा व हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चालते.प्रत्येक व्यक्तीला ताणमुक्त आयुष्य काढण्याची इच्छा असते. हे ताण सुरू होतात त्यांच्या मुलाच्या भवितव्यापासून. यासाठीच 'न्यू वे'चे प्रयोग जन्मपूर्व अवस्थेपासून सुरू होतात. संस्कारशील पिढी निर्माण करण्यासाठी मुळापासूनच तयारी केली पाहिजे. त्यासाठी प्रयोग-अभ्यास व उपाययोजना 'न्यू वे'ने प्रत्येक टप्प्यावर दिली आहे.
'न्यू वे'च्या संशोधनामध्ये न्यूटोनियन मेकॅनिक्सपासून क्वांटम आणि इपीआर पॅराडॉक्सपर्यंत, जीवशास्त्र, मानसशास्त्र, सूक्ष्म मानसशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र, शिक्षणशास्त्र, तर्क, गणित इत्यादी एकूण २८ विज्ञान शाखांच्या आधारावर प्रयोग केले.जडवादी, अजडवादी तत्त्वज्ञानाचा मूलभूत अभ्यास केला. प्रथम श्रेणीचे इंजीनिअर्स,डॉक्टर्स, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत यांचे या प्रयोगांना साहाय्य झाले.टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस,डेक्कन कॉलेज,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, विद्यावर्धिनी इत्यादी त्या वेळच्या श्रेष्ठ संस्थेतील तज्ज्ञांशी व रशिया,अमेरिकेतील तज्ज्ञांशी अभ्यास संपर्क.
ज्ञान, कर्म, भक्ती यापैकी कोणत्याही एका मार्गाने माणूस आयुष्याच्या कल्याणाचा हा प्रकल्प समजावून घेऊ शकतो.
ज्ञानमार्ग :- ३-३ दिवसांचे २८ विषयांवर आधारित विनामूल्य अभ्यासवर्ग,निवास,भोजन,चहा - नाश्ता इत्यादी व्यवस्थांचा माफक खर्च.(पालक व मुला-मुलींसाठी सुट्टीत खास शिबिरे.)
विद्यार्थ्यांना ताणमुक्त परीक्षायश,कर्तबगारांना ताणमुक्त आयुष्य यांसाठी कॉम्प्युटराइज्ड ६० इलेक्ट्रॉनिक मशीन्सद्वारे घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांची सोय. स्वामीजींच्या अभ्यास संशोधनावर आधारित २५०हून अधिक ग्रंथसाहित्य.