Jump to content

मधुवंती दांडेकर

मधुवंती दांडेकर या मराठी संगीत नाट्यसृष्टीतल्या एक अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म २३ मार्च १९४८ रोजी झाला.

कारकीर्द

मराठी संगीत नाटकांमध्ये काम करीत असताना मधुवंती दांडेकर यांना एका उर्दू नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्या खास उर्दू शिकल्या. ती भूमिका त्यांनी इतकी छान वठवली की, अनेक उर्दू भाषिकांना त्यांची मातृभाषा उर्दूच वाटली. भूमिकेत स्वतःला झोकून देण्यासाठी वाटेल ते श्रम घेण्याची तयारी व त्यासाठीचा अट्टाहास येथे दिसतो. विद्याधर गोखले यांच्या 'गझलांचा गुलशन' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यासाठी तर त्या प्रसिद्ध गझल-गायक श्री. विजय चौहान यांच्याकडे गझलही शिकल्या.

मधुवंती दांडेकर यांना एकदा गुजराती नाटकात भूमिकेसाठी विनंती करण्यात आली होती. ते नाटक म्हणजे मराठी सुवर्णतुलाचे गुजराती रूपांतर होते. नाटकाच्या निर्मात्याला रुक्मिणीसाठी सुयोग्य गुजराती अभिनेत्री मिळत नव्हती. मधुवंती दांडेकरांनी सर्व संवाद मराठी देवनागरीत लिहून घेतले,भूमिका समजून घेऊन अभ्यास केला आणि रुक्मिणीची ती भूमिका उत्तम रीतीने वठवली.

बालगंधर्व हे मधुवंती दांडेकरांचे संगीतातले आदर्श. तसा त्यांना अध्यात्मातही रस आहे. त्यासाठी विमला ठकार यांना त्या गुरू मानतात. विमला ठकारांच्या एका पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे तसेच त्यांच्या काही हिंदी पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले आहे.

पुरस्कार

  • इ.स.२००४चा मधुकर महाजन पुरस्कार
  • इ.स.२००५चा अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार
  • इ.स.२००७चा बालगंधर्व पुरस्कार

मधुवंती दांडेकर यांनी गायलेली प्रसिद्ध गीते आणि त्यांच्या नाटकांतील भूमिका

  • अंगणी पारिजात फुलला (संगीत सुवर्णतुला)
  • अगा वैकुंठीच्या राया (संगीत कान्होपात्रा)
  • अवघाचि संसार सुखाचा करीन (संत कान्होपात्रा)
  • ऋतुराज आज वनी आला (संगीत मदनाची मंजिरी)
  • तारिणी नववसनधारिणी (संगीत पट-वर्धन)
  • पतित तू पावना (संगीत कान्होपात्रा)
  • प्रथम करा हा विचार पुरता(संगीत संशयकल्लोळ)
  • ये मौसम है रंगीन (संगीत मदनाची मंजिरी)

हे सुद्धा पहा : मधुवंती दांडेकर यांची आठवणीतील गाणी

नाटक भूमिका
एकच प्यालाशरद, सिंधू
कृष्णार्जुनयुद्धसुभद्रा
झाला महार पंढरीनाथसावित्री
देव दीनाघरी धावलारुक्मिणी, सत्यभामा
ध्रुवाचा तारासुरूची
पती गेले गं काठेवाडीमोहना
भाव तोचि देवएकनाथांची पत्‍नी
मदनाची मंजिरीमंजिरी, लीलावती
मंदारमालारत्नमाला
मानापमानआक्कासाहेब, भामिनी
मृच्छकटिकवसंतसेना
विद्याहरणदेवयानी
संशयकल्लोळरेवती
सुवर्णतुलाराधा, रुक्मिणी, सत्यभामा
सुवर्णतुला (गुजराती)रुक्मिणी
सौभद्ररुक्मिणी,सुभद्रा
स्वयंवररुक्मिणी