मधुकर सामंत
महसूल खात्यातून अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झालेले मधुकर सामंत हे प्रेक्षकांसमोर विनोदी मराठी कार्यक्रम सादर करणारे एक कलावंत आहेत.
नाटकातून भूमीका
नाटकातून मध्यवर्ती भूमिका -- पु. ल. देशपांडे यांच्या अंमलदार मध्ये सर्जेराव, बाळ कोल्हटकर यांच्या " वेगळे व्हायचं मला ! " मध्ये काकाजी , वसंत सबनीस यांच्या "प्रेक्षकांनी क्षमा करावी " या नाटकामध्ये भीम , या भूमिकांसाठी प्रथम पारितोषिके
स्वलिखीत निर्मीत नाटके
नाटके : "असा मी काय गुन्हा केला ! ", " सोंगट्या ", " ही व्यथा मनीची सांगू कुणा ? " इत्यादी प्रकाशित नाटकांचे लेखक , दिग्दर्शक आणि सादरकर्ते
धो धो हसा, ध्यानस्थ बसा
निवृत्त झाल्यावर मधुकर सामंत यांना धो धो हसा, ध्यानस्थ बसा हा कार्यक्रम सुरू केला. माणसांमाणसांमधील ताणतणावाचे संबंध, घरातील बिघडलेले नातेसंबंध, समाजात बोकाळलेला चंगळवाद, व्यसनाधीनता, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर हा कार्यक्रम भाष्य करतो. या कार्यक्रमाचा २००वा प्रयोग, ३१ मार्च २०१२ला पुणे शहरात भोसलेनगरमध्ये झाला. [१] या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह परदेशांतही झाले.
संदर्भ
- ^ लोकसत्तामधील लेख[मृत दुवा]