मधुकर ठाकूर
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी व राजकीय घराण्याचा वारसा नसताना गरीब शेतकरी कुटुंबातील आयुष्याची सुरुवात हॉटेल मध्ये वेटरची नोकरी करणारे मधुकर ठाकूर २००४ मध्ये अलिबागचे आमदार म्हणून निवडून आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले . शरद पवार ठाकूर ह्यांच्या विजयावर चमत्कार झाला अशी प्रतिक्रिया दिली तर स्वर्गीय विलासराव देशमुख ह्यांनी मधुकर ठाकूर आम्हाला त्रास देणाऱ्यांसाठी जायंट किलर ठरले असे प्रश्स्त्रीपत्र दिले होते . अलिबाग विधानसभा मतदारसंघातून २००४ मध्ये काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षी पाटील यांच्याखेरीज आणखी सहा मीनाक्षी पाटील नावाच्या उमेदवार निवडणूक लढवीत होत्या. या निवडणुकीत काँग्रेसचे मधुकर ठाकूर विजयी होऊन सातही मीनाक्षी पाटील पराभूत झाल्या. सहा अपक्ष मीनाक्षी पाटलांपैकी पाच उमेदवारांच्या नावात मीनाक्षीनंतर विष्णू अजित, न. प्र. आर. अशी अक्षरे होती. मिळालेली मते मधुकर ठाकूर- 65828, मीनाक्षी प्र.पाटील 59961