मदनलाल खुराणा
मदनलाल खुराणा | |
---|---|
जन्म | ऑक्टोबर १५, इ.स. १९३६ |
मृत्यू | ऑक्टोबर २७, इ.स. २०१८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
मदनलाल खुराणा (ऑक्टोबर १५, इ.स. १९३६ – ऑक्टोबर २७, २०१८) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.
कारकीर्द
ते इ.स. १९९३ ते इ.स. १९९६ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. तसेच ते इ.स. १९८९, इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकीत दिल्ली मधील दक्षिण दिल्ली तर इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत दिल्ली मधील दिल्ली सदर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये पर्यटनमंत्री आणि संसदिय कामकाजमंत्री होते. तसेच ते जानेवारी इ.स. २००४ ते नोव्हेंबर इ.स. २००४ या काळात राजस्थान राज्याचे राज्यपाल होते. भाजप नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यामुळे ते काही काळ पक्षाबाहेर होते.पण ते इ.स. २००८ मध्ये पक्षात परत आले.