Jump to content

मथु सावंत

डॉ. मथु सावंत (जन्म : कंधार, जि. नांदेड, १५ ऑगस्ट १९६६) या ग्रामीण साहित्यासाठी विशेष परिचित असलेल्या मराठी लेखिका आणि नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचे आजवर (सप्टेंबर २०१२) चार कथासंग्रह, दोन कादंबऱ्या, दोन नाटके व एक समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाला असून याशिवाय त्यांनी चरित्रात्मक लेखनही केले आहे. मराठवाड्यातील पहिल्या ग्रामीण कथाकार असल्याचा मान त्यांच्याकडे जातो. ’तिची वाट वेगळी' हा त्यांचा कथासंग्रह म्हणजे महिलांच्या ३३ टक्‍के आरक्षणाची स्पंदने आणि आंदोलने टिपणारा लेखाजोखा आहे.

बीड येथे झालेल्या चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

जीवन

डॉ. मथु सावंत यांचा जन्म राबत्या शेतकरी कुटुंबात झाला. १९८६ ते २००५ अशी २० वर्षं राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.

१९९२ ते १९९७ या कालखंडात त्यांनी गोरठा, (ता. उमरी) मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी नेहमी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या, शेतकऱ्यांच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नांना[माहितीज्ञान पोकळी] वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.[ संदर्भ हवा ] महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात[माहितीज्ञान पोकळी]सुद्धा त्यांचे भरीव योगदान आहे.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

कथासंग्रह

  • पाण्यातील पायवाट (१९९१)
  • तिची वाटच वेगळी (२०००)
  • पाणबळी (२००६)

बाल कथासंग्रह

  • निवडुंगाची फुलं (२००४)

कादंबरी

  • राहु केतु (१९९९)
  • जिनगानी (२०००)

नाटक

  • नवरसांची नवलाई (२००१)
  • लगीघाई ? मुळीच नाही ! (२००९)

चरित्र

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१९९९)
  • राजर्षी शाहू महाराज (१९९९)
  • समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले (१९९९)

समीक्षा

  • समाज, साहित्य आणि संस्कृती (२०१७)
  • सर्जनाचा शोध (२००९)
  • साहित्यसौरभ (२०१७)

संशोधन

  • कथाकार भास्कर चंदनशिव (२००४)

संपादन

  • सूर्यमुद्रा (गौरवग्रंथ संपादन)

पुरस्कार आणि सन्मान

१) ‘पाण्यातील पायवाट’ ह्या कथासंग्रहाला फुलंब्री (औरंगाबाद जिल्हा) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य पुरस्कार प्राप्त.(१९९४)

२) जिल्हा परिषदेच्या राजकारणावर आधारित ‘राहु-केतु’ ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा अण्णा भाऊ साठे पुरस्कार, म.सा.प. औरंगाबादचा कै. नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचा फुले-आंबेडकरवादी साहित्य पुरस्कार आणि बडोदा (गुजरात) येथील मराठी वाङ्‌मय परिषदेचा अभिरुची गौरव पुरस्कार असे चार पुरस्कार प्राप्त.

३) ग्रामीण भागातील विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांच्या प्रश्नांवरील ‘जिनगानी’ ह्या कादंबरीला कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील रोहमारे ट्रस्टचा भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त.

४) ‘समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले’ ह्या पुस्तकाला महानुभाव विश्वभारती अमरावती या संस्थेचा महानुभाव ग्रंथोत्तेजक पुरस्कार प्राप्त.

५) ‘तिची वाटच वेगळी’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा पुरस्कार, हिंगोलीचा संत नामदेव साहित्य पुरस्कार आणि लोहा येथील खोब्राजी चव्हाण साहित्य पुरस्कार असे एकूण सात पुरस्कार प्राप्त. सदर कथासंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात तसेच सोलापूर विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश झाला असून, या कथासंग्रहातील कथांचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरून क्रमशः अभिवाचन झाले आहे. तसेच आकाशवाणीच्या नांदेड व उस्मानाबाद केंद्रावरून पुस्तकांतील काही कथांचे नाट्यीकरण सादर करण्यात आले होते. या प्रसारणाला ग्रामीण श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.

६) ‘नवरसांची नवलाई’ या नाटकाला कोल्हापूरच्या मराठी बालकुमार साहित्य सभेचा मातोश्री उमाबाई निगवेकर साहित्य पुरस्कार प्राप्त.

७) ‘निवडुंगाची फुलं’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार, बुलढाणा येथील भारत विद्यालयाचा शशिकलाताई आगाशे वाङमय पुरस्कार आणि कोल्हापूरच्या मराठी बालकुमार साहित्य सभेचा शेवडे गुरुजी साहित्य पुरस्कार असे एकूण तीन पुरस्कार प्राप्त.

८) ‘कथाकार भास्कर चंदनशिव’ या ग्रंथाला औरंगाबादच्या कै. धोंडीराम माने विकास प्रबोधिनीचा गुणिजन साहित्य पुरस्कार प्राप्त.

९) सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल रोटरी क्लब, नांदेड या संस्थेतर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव.

१०) सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशिक्षण विद्यापीठातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव.

११) साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जनजागृती महिला प्रतिष्ठानचा सेवाभावी साहित्य पुरस्कार प्राप्त.

१२) महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरव.

१३) कुंटूर येथे १७-१-२०१० रोजी झालेल्या २ऱ्या लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन संमेलनाचे अध्यक्षपद.

१४) बीड येथे आयोजित (दि. २ व ३ फेब्रु. २०१३) चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन संमेलनाचे अध्यक्षपद.

१५) पुणे येथील साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेचा मालतीबाई दांडेकर पुरस्कार. (दि. २८ जाने. २०१३)

१६ ) सामाजिक कार्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार.

१७) सामाजिक कार्यासाठी परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिला मंडळाचा वीर महिला गीताबाई चारठाणकर पुरस्कार. (२०१४)

१८) ‘राहु - केतु’ या कादंबरीस महाराष्ट्र शासन, मुंबईचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार. (१९९९)

१९) मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादचा कै. नरहर कुरुंदकर वाड्.मय पुरस्कार, १९९९

संदर्भ

बाह्य दुवे

--> अधिकृत संकेतस्थळ

--> फेसबुक प्रोफाईल