Jump to content

मत्स्यगंधा एक्सप्रेस

मत्स्यगंधा एक्सप्रेसचा फलक
मत्स्यगंधा एक्सप्रेसचा मार्ग

मत्स्यगंधा एक्सप्रेस (कन्नड: ಮತ್ಸ್ಯಗಂಧ ಎಕ್ಷ್ಪ್ರೆಸ್ಸ) ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कर्नाटकातील मंगळूर स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस मुंबई ते मंगळूर दरम्यानचे १,१८६ किमी अंतर १६ तासांत पूर्ण करते. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला येथील मासेमारी उद्योगाशी निगडीत मत्स्यगंधा हे नाव दिले गेले आहे.

१ मे १९९८ रोजी सुरू झालेली ही कोकण रेल्वेवरील सर्वात प्रथम गाड्यांपैकी एक होती.

तपशील

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
10111मुंबई लोटिट – मंगळूर सेंट्रल१५:२००७:३०रोज४६ किमी/तास१,१८६ किमी
10112मंगळूर सेंट्रल – मुंबई लोटिट१४:३५०६:३५रोज
स्थानक क्रम स्थानक संकेत स्थानक/शहर अंतर
CSTM लोकमान्य टिळक टर्मिनस
TNA ठाणे१८
PNVLपनवेल५३
MNI माणगाव१७३
KHED खेड २६८
CHI चिपळूण३०९
RN रत्‍नागिरी४१५
KUDL कुडाळ६१०
MAO मडगांव ७५०
१० CNO काणकोण ७९५
११ KAWR कारवार८३२
१२ ANK अंकोला८७१
१3 GOK गोकर्ण रोड ८८२
१४ KT कुमटा ९०९
१५ HNA होन्नावार ९२८
१६ MRDW मुरुडेश्वर ९६५
१७ BTJL भटकळ ९८५
१८ BYNR बैंदूर १००७
१९ KUDA कुंदापूर१०५४
२० BKJ बार्कुल १०७६
२१ UD उडुपी१०९९
२२ MULK मुल्की ११४५
२३ SL सुरत्कल ११५८
२४ MAQ मंगळूर सेंट्रल ११८६

बाह्य दुवे