मत्स्य पालन
मत्स्य पालन (इंग्रजी :Fishkeeping ) हा एक लोकप्रिय छंद आहे, ज्याचा उपयोग aquarists द्वारे केला जातो आणि तो घरातील मत्स्यालय किंवा बाग तलावामध्ये मासे ठेवण्याशी संबंधित असतो. येथे एक मासेमारी सांस्कृतिक मासेमारी उद्योग आहे, जसे की शेतीची एक शाखा.[१]
संदर्भ यादी
- ^ "Fishkeeping". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-18.
मत्स्यपालन हा तलावात किंवा इतर बंद पाण्यात मासे वाढवून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय आहे.
कार्पस्-मासे हा भारतातील शेती-संवर्धनाचा मुख्य आधार आहे व तीन प्रकारचे भारतीय कार्प (कटला, रोहू, मृगळ) तसेच तीन प्रकारचे परदेशी मासे चंदेरी, गवती आणि सामान्य असे मिळून देशातील मत्स्यशेती उत्पादनाचा ८५% पेक्षा ही अधिक वाटा उचलतात.
गेल्या तीन दशकांत झालेल्या तंत्रशास्त्रीय प्रगतीमुळे तळी आणि तलावांतील सरासरी राष्ट्रीय उत्पादनाची पातळी सुमारे ६०० कि.ग्रा./हेक्टरहून २००० कि.ग्रा./हेक्टरपेक्षाही अधिक उंचीवर पोहोचली आहे. आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब आणि हरियाणा यांसारख्या राज्यांतील अनेक शेतकरी आणि उद्योजकांनी तर ६-८ टन/हे/वर्ष इतकी उच्च उत्पादन पातळी गाठली आहे. माशांच्या प्रजाती, पाण्याचे स्रोत, खतांची उपलब्धता, चा-याचे स्रोत, इत्यादि आणि शेतकऱ्यांची गुंतवणूक करण्याची क्षमता यांना सोयीस्कर अशा नवनवीन पद्धतीही देशात विकसित झालेल्या आहेत. मत्स्यशेती ही शेतीच्या इतर पद्धतींशी खूपच सुसंगत आहे आणि त्यामध्ये जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्चक्रन करण्याचीही प्रचंड क्षमता आहे.
माशांचे बहुसंस्करण
भारतातील माशांच्या बहुसंस्करणामध्ये शेण किंवा पोल्ट्रीमधील विष्ठा यांसारख्या जैविक कचऱ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि जैविक आणि अजैविक अशा दोन्ही खतांच्या साहाय्याने त्यातून दरवर्षी दरहेक्टरी 1-3 टन उत्पादन मिळविता येते. चारा दिल्यामुळे माशांच्या पैदाशीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते आणि चारा व खते यांच्या संयोजनाच्या योग्य वापराद्वारे दरवर्षी दरहेक्टरी 4-8 टन उत्पादन मिळते. संशोधन संस्थेत तयार केलेल्या पद्धतींचा वापर देशाच्या विविध भागांतील 0.04-10.0 हेक्टर क्षेत्रफळाच्या आणि 1-4 मी. खोल तलावांत करण्यात आला, त्यामध्ये उत्पादनाच्या दरांत विविधता आढळली. लहान आणि उथळ स्थिर पाण्याच्या तलावात अशा अनेक समस्या आढळून आल्या ज्यामुळे माशांच्या वाढीवर परिणाम झाला तर आकाराने मोठे आणि खोल तलावाचे अनुपालन करणे कठीण ठरते. 0.4-1.0 हेक्टर आकाराचे आणि 2-3 मी. खोल पाण्याचे तलाव योग्य व्यवस्थापनासाठी सर्वोत्कृष्ट मानले जातात. माशांच्या बहुसंस्करणाच्या व्यवस्थापन पद्धतींमध्ये पर्यावरणीय आणि जीवशास्त्रीय पद्धतींचा समावेश होतो ज्यांचे विभाजन सर्वसाधारणतः साठवणीपूर्वीच्या, साठवणीच्या आणि साठवणीनंतरच्या अशा तीन प्रकारच्या क्रियांमध्ये करण्यात येते.
साठवणीपूर्वीची तलावाची तयारी
तलावाच्या तयारीमध्ये तलावास पाण्यातील तण आणि भक्षक यांच्यापासून मुक्त करणे आणि जगणाऱ्या माशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आणि त्यांच्या योग्य संवर्धनासाठी पुरेसा नैसर्गिक चारा उपलब्ध करणे ह्याचा समावेश होतो. पाण्यातील तणांचे नियंत्रण, अनावश्यक वनस्पतींचे उच्चाटन करणे आणि माती व पाण्याची गुणवत्ता वाढविणे ह्या व्यवस्थापनाच्या या टप्प्यातील काही महत्त्वाच्या बाबी आहेत. भक्षक मासे आणि तण यांचे नियंत्रण कसे करावे याची चर्चा नर्सरी व्यवस्थापनामध्ये तपशीलवार करण्यात आलेली आहे.
तलावांची साठवणी
माशांच्या योग्य आकाराच्या बियाण्यांना त्यांनी नवीन वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर तलावामध्ये साठविण्यात येते. त्यापूर्वी तलावामध्ये खत घालून तो तयार करण्यात येतो. उच्च उत्पादन मिळविण्यासाठी माशांचा आकार आणि घनता दोन्ही योग्य असणे गरजेचे आहे. 100 मि.मी.पेक्षा मोठ्या आकाराच्या बोट्या संवर्धन संस्करणासाठी तलावात साठवण्यायोग्य असतात. लहान आकाराचे मासे साठविल्यास त्यांच्यामध्ये सुरुवातीच्या काही महिन्यांत मृत्युदराचे प्रमाण जास्त आणि वाढीचा वेग कमी असू शकतो. सघन बहुसंस्करण तलावांमध्ये, माशांचा जगण्याचा दर 90% पेक्षा जास्त आणि उत्तम वाढ मिळविण्यासाठी 50-100 मि.मी. आकाराच्या फिंगरलिंग्स् (बोट्या) वापरणे फायदेशीर ठरते. साधारणतः, 5000 बोट्यांची घनता हा बहुसंस्करण पद्धतीमध्ये वार्षिक 3-5 टन/हेक्टर उत्पन्न मिळविण्यासाठी दरहेक्टरी मासे साठवणीचा प्रमाणित दर मानला जातो. 8000-10000 दरहेक्टर घनता असलेल्या फिंगरलिगचा वापर वार्षिक 5-7 टन/ हेक्टर उत्पन्न मिळविण्यासाठी केला जातो. वार्षिक 5-7 टन/हेक्टर उत्पन्न मिळविण्यासाठी 15000-25000 दरहेक्टर घनता असलेल्या फिंगरलिगचा वापर करतात. माशांच्या बहुसंस्करणामध्ये तलावातील विविध भागांमधील खाणे मिळविण्यासाठी होणारी स्वप्रजातीय आणि आंतरप्रजातीय स्पर्धा कमी करण्यासाठी प्रजातींचे एकमेकांशी गुणोत्तर ठरवून देण्यात आलेले आहे. तलावात विविध विभागांत असणाऱ्या खाद्याचा योग्य वापर व्हावा यासाठी विभिन्न कोपऱ्यांमध्ये वस्ती करून असणाऱ्या दोन किंवा अधिक प्रजातींचा वापर करता येईल. कटला, चंदेरी, रोहू, गवती मासा, मृगळ आणि सामान्य मासा या सहा माशांचा गट यासाठी आदर्श मानतात. भारतात माशांची निवड मुख्यत्वे बियाणांची उपलब्धता आणि बाजारपेठेतील मागणी यावर ठरते. यापैकी कटला आणि चंदेरी हे पाण्याच्या वरच्या भागात राहतात, रोहू मधल्या भागात, गवती मासा मोठ्या वनस्पती असलेल्या भागांत तर मृगळ आणि सामान्य मासे पाण्याच्या तळाशी राहतात. पाण्याच्या वरच्या भागात राहणारे मासे 30-40% (कटला आणि चंदेरी), मधल्या भागातील 30-35% (रोहू आणि गवती मासा) आणि 30-40% तळाशी राहणारे मासे (सामान्य आणि मृगळ) हे प्रमाण सर्वसामान्यपणे तलावाच्या उत्पादनक्षमतेच्या आधारे स्वीकारले जाते.
खते
मातीच्या थरामध्ये असणाऱ्या पोषणद्रव्यांच्या आधारे तलावांचे वर्गीकरण तीन गटांत करण्यात येते. मत्स्य उत्पादनासाठी खतांचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे. जैविक खतांच्या एकूण प्रमाणाच्या 20-25% खत साठवणीच्या 15 दिवस आधी पायाभूत मात्रा म्हणून दिले जाते तर उर्वरीत खत दोन-दोन महिन्यांच्या अंतराने समान हप्त्यांत देतात. सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या इतर जैविक खतांमध्ये पोल्ट्रीची विष्ठा, डुकरांची विष्ठा, बदकांची विष्ठा, घरगुती सांडपाणी इत्यादींचा समावेश उपलब्धतेवर अवलंबून होतो. पाण्यातील नायट्रोजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करणारी अझोला ही वनस्पतीदेखील जैविक खत म्हणून 40 टन/हेक्टर/वर्ष या दराने वापरतात. यामुळे सघन मत्स्यशेतीसाठी आवश्यक असणारी सर्व पोषणद्रव्ये मिळतात (100 किलो नायट्रोजन, 25 किलो फॉस्फरस, 90 mm पोटॅशियम आणि 1500 किलो जैविक घटक). तलावामध्ये वापरलेल्या पदार्थांचे विघटन होऊन मागे जो काही पदार्थ उरतो त्याचा वापर मासे आणि कोळंबीसाठी पौष्टिक खाद्य म्हणुन केला जाऊ शकतो. जैवप्रक्रिया केलेले जैविक खत, बायोगॅसमधील उरलेला अवक्षेप हे देखील मत्स्यशेतीसाठी उत्तम खत (30-45 टन/हे./वर्ष) मानले जाते. हे पदार्थ कमी ऑक्सीजन शोषतात आणि लवकर पोषण पुरवतात.
पुरवणी खाद्य
मत्स्य बहुसंस्करणामध्ये पुरवणी खाद्य हे शक्यतो शेंगदाणा/मोहरीच्या तेलाची मळी आणि तांदळाची पेंड यांच्या मिश्रणापुरतेच मर्यादित आहे. मात्र हळूहळू सघन मत्स्यशेतीकडे लोकांचा कल वाढत असल्याने वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रथिनांमधील घटकदेखील यात समाविष्ट करण्यात येत आहेत. या सर्व घटकांना खाद्यामध्ये एकत्र ठेवण्यासाठी पेलेटायझेशन केले जाते ज्यामुळे ते पाण्यात स्थिर राहते आणि वाया जाण्याचे प्रमाण घटते. गवती माशांना मुख्यत्वे तलावाच्या निवडक कोपऱ्यांत भांड्यांत ठेवलेल्या पाणवनस्पतींचेच खाद्य दिले जाते (हायड्रिला, नजास, सेराटोफायलम, इ). थोड्या-थोड्या अंतरावर लावलेल्या वनस्पती, जमिनीवरील गवत आणि इतर चारा, केळ्याची पाने आणि टाकून दिलेल्या भाज्यादेखील यासाठी वापरतात. चाऱ्याची विभागणी करताना चाऱ्याचे मिश्रण भिजविलेल्या कणकेच्या स्वरूपात ट्रेमध्ये किंवा गनी बॅग्जमध्ये घालून त्या तलावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोंबत ठेवाव्यात. दिवसातून दोनदा चारा घालणे उत्तम. चाऱ्याचे प्रमाणदेखील महत्त्वाचे आहे कारण खाद्य कमी मिळाल्यास माशांची वाढ खालावते तर जास्त प्रमाणात चारा घातल्यास तो वाया जातो. पहिल्या महिन्यात सर्व माशांच्या सुरुवातीच्या जैविक वजनाच्या 5% चारा द्यावा आणि नंतर पुढील महिन्यांत दर महिन्याच्या माशांच्या जैविक वजनाच्या 3-1% एवढे कमी-कमी करावे. वायूवीजन आणि पाणी बदलणे तलावातील पाण्यात विरघळलेल्या ऑक्सीजनचे प्रमाण वाढवण्यासाठी यांत्रिक वायूवीजन वापरले जाऊ शकते. ऑक्सीजनचे प्रमाण वाढविणे हे मोठ्या प्रमाणात मासे असणाऱ्या सघन मत्स्यशेतीसाठी खूप महत्त्वाचे असते. पॅडलची चाके असणारे वायूवीजक, ऍस्पिरेटर वायूवीजक आणि तलावात विरघळू शकणारे वायूवीजक यामध्ये सामान्यतः वापरले जातात. सघन पाण्याच्या शेतीमध्ये ऑक्सीजनची मागणी पूर्ण करण्यासाठी पाण्यात दरहेक्टरी 4-6 वायूवीजक वापरण्याची गरज असते.
पाणी बदलणे ही सघन मत्स्यशेतीमधील आणखी एक महत्त्वाची क्रिया आहे. पाचकक्रियेमध्ये तयार झालेले पदार्थ आणि न वापरलेला चारा तलावात साठल्यामुळे तलावातील पाण्याचा दर्जा खूपच खालावतो. त्यामुळे माशांच्या प्रजातींची वाढ खालावते आणि त्यांच्यात एखाद्या आजाराची साथ पसरण्याचा धोकाही वाढतो. म्हणूनच ठराविक आकारमानाचे पाणी नियमित अंतराने बदलणे आवश्यक आहे, विशेषतः सघन शेतीमध्ये नंतरच्या टप्प्यात.
आरोग्य व्यवस्थापन
साठवणीपूर्वी माशांच्या बियाण्यांना 3-5% पोटॅशिअम परमॅंग्नेटमध्ये 15 सेकंद आंघोळ घातली पाहिजे. जास्त घनतेने मासे साठवलेले असल्यास त्यांच्यात आजार पसरण्याचे प्रमाणही जास्त असते. व्यवस्थित व्यवस्थापन असणाऱ्या तलावांत अशा मृत्यूंचे प्रमाण क्वचितच आढळते तरीही परजीवींची लागण झाल्यास माशांच्या वाढीवर त्याचा फार प्रतिकूल परिणाम होतो.
उत्पादन गोळा करणे (सुगी)
माशांची सुगी साधारणतः 10 महिने ते एक वर्षाच्या संस्करण कालावधीनंतर करण्यात येते. मात्र बाजारात विकण्यायोग्य आकार झालेल्या माशांची वेळोवेळी सुगी करून तलावावर असणारा ताण कमी करता येतो आणि इतर माशांच्या वाढीसाठीही जागा उपलब्ध करून देता येते.