Jump to content

मणिलाल गांधी

मणिलाल मोहनदास गांधी (ऑक्टोबर २८, इ.स. १८९२ - इ.स. १९५६) हा महात्मा गांधीकस्तुरबा गांधींचाचा दुसरा मुलगा होता.

मणिलालने आपल्या वडिलांबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. यासाठी त्याने अनेकदा तुरुंगाची हवाही खाल्ली. मणिलालने दक्षिण आफ्रिकेतील दर्बान शहरात इंडियन ओपिनियन या गुजराती-इंग्लिश साप्ताहिकाचे संपादन केले.

इ.स. १९२७मध्ये मणिलालचे लग्न सुशीला मशरुवालाशी झाले. त्यांना दोन मुली सीता (इ.स. १९२८) व इला (इ.स. १९४०) तसेच एक मुलगा अरुण (इ.स. १९३४) झाली.