मणिपूर विधानसभा निवडणूक, २०१७
|
२०१२ ←
| ४ मार्च - ८ मार्च, २०१७ | → २०२२
|
|
| मणिपूर विधानसभेच्या सर्व ६० जागा बहुमतासाठी ३१ जागांवर विजय आवश्यक |
---|
| पहिला पक्ष | दुसरा पक्ष |
---|
| | | नेता | ओक्राम इबोबी सिंग | एन. बिरेन सिंह |
---|
पक्ष | काँग्रेस | भाजप |
---|
मागील निवडणूक | ४७ | - |
---|
जागांवर विजय | २८ | २१ |
---|
बदल | ▼ १९ | ▲ २१ |
---|
मतांची टक्केवारी | ३२.६% | ३६.६% |
---|
|
|
मणिपूर विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या मणिपूर राज्यातील एक विधानसभा निवडणुक आहे. ४ मार्च व ८ मार्च ह्या दिवशी २ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये मणिपूर विधानसभेमधील सर्व ६० जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. काँग्रेस पक्षाचे ओक्राम इबोबी सिंग गेली १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर होते.
११ मार्च २०१७ रोजी झालेल्या मतगणनेत काँग्रेसला सर्वाधिक २८ जागांवर तर भारतीय जनता पक्षाला २१ जागांवर विजय मिळाला. भाजपने स्थानिक पक्षांना हाताशी धरून सरकार स्थापन केले व एन. बिरेन सिंह राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले. गोव्याखालोखाल दुसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष असून देखील सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला अपयश आले. ईशान्य भारतामध्ये आसाम व अरुणाचल प्रदेश नंतर मणिपूरमध्ये आपली सरकारे स्थापन करून भाजपने ह्या भागात आपली मुळे घट्ट केली.
संपूर्ण निकाल
बाह्य दुवे