मणिकंठ
मणिकंठ (इंग्लिश:Rubythroat) हा मुसिकॅपिडे कुळातील एक पक्षी आहे. हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. तो सायबेरियामध्ये जंगलांतील झाडाझुडूपांमध्ये प्रजनन करतो आणि हिवाळ्यात दक्षिणेकडे थायलंड, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश या ठिकाणी स्थलांतर करतो.
मणिकंठ हा मध्यम आकाराच्या चिमणीएवढा असतो. नराचा कंठ तांबडा तर छाती राखी व भुवई पांढरी असते. मादीचा वरील भाग तपकिरी असतो. भुवई पांढरी असते आणि छातीवर पिवळी पट्टी असते. तिचे पोट पिवळट पांढरे असते.
वितरण
हे पक्षी मध्य नेपाळपासून उत्तर भारतात, बांगलादेश, बिहार, ओरिसा व ईशान्य आंध्र ते गोदावरीचा त्रिभुज प्रदेश, भुतान, ईशान्य भारत आणि बांगला देश ते ब्रहादेशत या भागात हिवाळी पाहुणे असतात. दिल्ली, सातपुड़ा, राजस्थान मध्येही ते आढळून येतात. देहराडून व सिमला येथे ते स्थलांतर करताना दिसून येतात.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली