Jump to content

मणक्याची झिज

रोगग्रस्त मणके


मणक्याची झिज हा वयोपरत्वे होणारा एक आजार आहे.यात पाठीचे मणके झिजतात व त्यामुळे पाठदुखी, इत्यादी विकार उद्भवतात. वृद्धत्वामुळे हा आजार बहुदा उद्भवतो. स्त्रीयांची मासिक पाळी बंद झाल्यावरदेखील हा होऊ शकतो.तसेच अतिप्रवास, पौष्टिक खाद्यपदार्थाचा अभाव, लोह व कॅल्शियमची शरीरातील कमतरता, काही जीवनसत्त्वांची कमतरता, योग्य व्यायामाचा अभाव, कमीतकमी शारीरिक हालचाली, बसण्या-उठण्याची चुकिची पद्धत, आमवात अशा अनेक गोष्टीदेखील यास कारणीभूत आहेत.[ संदर्भ हवा ]

पाठीचे मणक्यांची झिज ही नंतर खांदे, कंबर इत्यादींवर देखील प्रभाव टाकते व त्यांचेही दुखणे चालू होते.ही झिज बराच काळ दुर्लक्षित राहिल्यास, व केवळ वेदनाशामकाचा सतत वापर केल्यास नंतरच्या काळात, कोणतीही हालचाल करणे दुरापास्त होते. झोपण्याच्या स्थितीत मणक्यांवर दाब/वजन कमी येते त्यामुळे या स्थितीत अथवा टेकुन बसण्यामुळे थोडा आराम वाटू शकतो.पण हा काही कायमस्वरुपी उपचार नाही.[ संदर्भ हवा ]

उपचार

त्रास सुरू झाल्यावर लगेच उपचार घेतले असता, ही झिज लवकर भरून निघते व व्यक्ति लवकर स्वस्थ होते. त्यात चालढकल केली असता हा त्रास दूर होण्यास वेळ लागतो.[ संदर्भ हवा ]