Jump to content

मढी


     "स्त्री अबला की सबला"


  महाराष्ट्राची सुजलाम सुफलाम भूमी अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध बनलेली आहे. ही भूमी डोंगर, नद्या, दऱ्या व सुपीक जमीन यांनी        बनलेली आहे. अनेक प्रकारचे धान्य या मातीतून जन्मास येते. तिचे 'स्त्रीरत्ने' व 'नररत्ने'यातून प्रसवते परंतु यात मात्र मानवाने फरक केला आणि स्त्रीचा दर्जा खाली ठेवला. 

स्त्री अबला तिच्या शरीर रचनेमुळे ठरते. तिच्यात प्रेमाचा सागर सामावलेला असतो म्हणून ती कठोर होऊन कोणाला शिक्षा देऊ शकत नाही. उलट प्रमाने त्याला क्षमा करते. तिचे हेच रूप अबला ठरते. 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' पूर्वी स्त्रियांना फारच बंधनात राहावे लागायचे. बालविवाह, सती पद्धत, विधवा पुनर्विवाहाला बंदी अशा अनेक काही रुढीमुळे स्त्री अबला होती किंवा ठरली. त्यामळे तिच्यात सतत कोणाचा तरी धाक असायचा. लग्नाआधी आई -वडील व लग्नानंतर पती -मुलगा अशाप्रकारे तिच्यावर पुरुषप्रधान समाजाचा पगडा असायचा आणि तिला स्वतःला काही विचार मांडण्याची बंदी आहे /होती. स्त्रीला मनच नाही चार भिंती, चूल आणि मुलं हेच तिचे विश्व् आणि हेच तिचे जीवन होते. पण स्त्रीरत्नांची खरी पारख ही आपल्या नेत्यांनी केली आणि तिला या रूढींनी जखडलेल्या समाजातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. महात्मा गांधी म्हणत, "जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी" अशा शब्दात त्यांनी स्त्रीला महत्त्व देऊन तिला सबला करण्याचा प्रयत्न केला आणि महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीचा स्त्रीत्वाचा दर्जा उंचावून स्त्री अबलातून सबला झाली ती सावित्रीबाई फुले या स्त्रिरत्नामुळे. शिक्षणामुळे स्त्रीला आपले हक्क, कर्तव्य समजले. तिच्यात क्रंतिकारक बदल घडून आला आणि अबला की सबला हाच प्रश्न निर्माण झाला. हा श्याम कोण? या श्यामला महान बनवण्याचे काम त्याच्या आईनेच केले. 'अरे श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप" असा कानमंत्र देणारी कोण? स्त्रीचं ना? शिवाजीचा छत्रपती शिवाजी करणारी कतृर्त्वान कोण? स्त्रीचना !यातून स्त्री स्वतःला ओळखून पुढे आली व आता तर तिच्या कर्तृत्वाने एवढी पुढे गेली की, तिच्या हाती संपूर्ण राष्ट्रच गेले आणि ती राष्ट्रपती झाली. ही क्रांती तिच्यातून अबालपण काढून सबला होण्यास कारणीभूत ठरली. महिलांनी नोकरी मिळणे हे त्याचे सबलीकरण नाही तर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा चतुस्त्र विकास त्यात अपेक्षित आहे. स्त्री स्वतंत्र म्हणजे स्त्रियांच्या उन्नतीचा मार्ग. हुंडा व वंशाला दिवा म्हणून होणारा छळ तसेच गरीब कुटूंबात असलेली मुलीच्या शिक्षणाविषयीची अनास्था पण. त्याचबरोबर समस्या असतांनाही 'में लिखुंगी, पढुगीं, मेहनत भी करुंगी, बेटी हूं बेटी में तारा बनुगी"असा दुर्दम्य आशावाद व्यक्त्त करण्यात येतो. स्त्री आज समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कुटूंबाच्या उन्नतीचा वाटा आहे पण तिला स्वतःची जागा मिळविण्यासाठी झगडावे लागते. स्त्रियांना भेसवणाऱ्या त्या पारंपरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज सर्वच ठिकाणी आपल्याला स्त्रीचा पगडा दिसून येतो. स्त्री एवढी कर्तृत्वान असूनसुद्धा तिची चाचणी करून हत्या केली जाते? हत्या करून घेणारे हे का विसरतात कीं, त्यांना जन्म देणारी एक स्त्रीच होती मग तिला या जगात पाऊल टाकायला बंदी? स्त्रीने या पुरुषाला वारंवार खांदा दिला यमाच्या तावडीतून तिने पतीची सुटका केली असे असूनही तिची मातेच्या उदरातच हत्या का? हा विषय मनात आला तर माझी पारं झोपच उडते आणि मनाला खेद वाटतो.