Jump to content

मट्टानचेरी

भारताच्या केरळ राज्यातील कोचीन बंदराच्या जवळपास समुद्रात काही बेटे आहेत. गुंडू बेट, बोलघट्टी बेट मट्टानचेरी बेट, मुलावुकड बेट, वल्लारपदम बेट, वायपिन बेट, विलिंग्डन बेट वगैरे. त्यांचा समूह गोश्री बेटे या नावाने ओळखला जातो. त्यांपैकी एक असलेले मट्टानचेरी बेट हे पर्यटन क्षेत्र आहे. मट्टानचेरी बेटावरून विलिंग्डन बेटामार्गे[ कोचीन बंदरापर्यंत जाणारा एक पूलही आहे.