मजापहित साम्राज्य
मजापहित साम्राज्य हे इंडोनेशियातील जावा बेटावर इ.स.च्या १३व्या शतकाच्या अंतापासून सोळाव्या शतकाच्या अंतापर्यंत असलेले हिंदू साम्राज्य होते.
राज्यकर्ते
मजापहित साम्राज्याचे राज्यकर्ते हे सिंगासरी सम्राटांचे वंशज होते. केन अरोक तथा श्रीरंग राजस हा या वंशाचा मूळ पुरुष समजला जातो.
- रादन विजया, तथा केर्तराजस जयवर्धन (१२९४-१३०९)
- कालागमत तथा जयनगर (१३०९-१३२८)
- श्री गीतराज तथा त्रिभुवन विजयतुंगदेवी (१३२८-१३५०)
- हयाम वुरुक तथा श्री राजसनगर (१३५०–१३८९), साम्राज्याचा सुवर्णकाळ
- विक्रमवर्धन तथा भ्रा ह्यांग विशेश अजी विक्रम (१३८९-१४२९), मजापहित यादवी
- रतु सुहिता (साम्राज्ञी) (१४२९-१४७७)
- केर्तविजय तथा ब्राविजय पहिला (१४४७-१४५१)
- राजसवर्धन तथा भ्रे पामोतन किंवा ब्राविजय दुसरा (१४५१-१४५३)
- अराजक (१४५३-१४५६)
- भ्रे वेंगकर तथा पुरविशेष, ब्राविजय तिसरा किंवा गिरीशवर्धन (१४५६-१४६६)
- सिंहविक्रमवर्धन, पंडनालास, ब्राविजय चौथा तथा सुरप्रभाव (१४६६-१४६८/१४७८)
- भ्रे केर्तभूमी तथा ब्राविजय पाचवा (१४६८-१४७८)
- गिरींद्रवर्धन तथा ब्राविजय सहावा (१४७८-१५२७)