Jump to content

मच्छिंद्रगड

मच्छिंद्रगड
नावमच्छिंद्रगड
उंची
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणसांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गावकराड,इस्लामपूर
डोंगररांगसांगली
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना{{{स्थापना}}}


मच्छिंद्रगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इ.स. १६७६च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. हा किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे.

कसे जाल?

मच्छिंद्रगडावर जाण्यासाठी जवळचे कराड किंवा इस्लामपूर येथून जाता येते. कराड ते रेठरे कारखाना बसने रेठरे कारखाना येथे उतरून तिथून खाजगी वाहनाने मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी उतरतून गडावर जावे. इस्लामपूरहून रेठरे कारखाना कडे बस किॅंवा खाजगी वाहनाने जाताना गडाच्या पायथ्याजवळ उतरता येते.

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली, पुढे इ.स. १६९३ मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता त्यावेळी या गडाचा किल्लेदार होता देवीसिंग. १२ नोव्हेंबर १६९३ रोजी औरंगजेब तख्त्तेखांवर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला,तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला, त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे इ.स.१८१८ मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

मच्छिंद्रगड गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट केलेली असून या वाटेने साधारण अर्धा तास चढाई केल्यानंतर आपण मच्छिंद्रगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो.येथून एक पायवाट आपल्याला गडाच्या दक्षिण भागात असलेल्या मच्छिंद्रनाथ मंदिराकडे घेऊन जाते. मंदिर प्रशस्त असून विविध शिल्पांनी सजविलेले आहे. येथे भाविकांचा नेहमी राबता असतो. येथून देवळाच्या पिछाडीस एक मोठी कोरडी विहीर आहे, नंतर तटाकडेने पुढे गेल्यावर जुन्या काळातील समाध्या दिसतात

मच्छिन्द्रगडाचा माथ्याचा आकार आटोपशीर असल्यामुळे गडफेरी साधारण तासाभरात पूर्ण होते, गडावर जुने अवशेष तसे फार कमी असून तटबंदीसुद्धा आता जुजबी स्वरूपत उरलेली आहे.

संदर्भ

बाहय दुवे