मगरपट्टा
Magarpatta | ||||||
---|---|---|---|---|---|---|
Gated community | ||||||
गुणक: 18°30′57″N 73°55′38″E / 18.515729°N 73.927195°E | ||||||
Country | India | |||||
State | Maharashtra | |||||
City | Pune | |||||
संकेतस्थळ | magarpattacity |
मगरपट्टा (शब्दशः अर्थ : मगर कुटुंबाची जमीन ) ही पुणे येथील हडपसर भागातील ४५० एकर एवढा खाजगी मालकीचा बंदिस्त समुदाय आहे. यात व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, अनेक विशेषीकरणे असलेले रुग्णालय, शॉपिंग आणि मॉल्स, रेस्टॉरंट्स, एक जिम, अदिती गार्डन (२५ -एकरी उद्यान) आणि शाळा आहेत. ३० % क्षेत्र हरित जागेने बनलेले आहे. येथे "डेस्टिनेशन सेंटर" नावाचे व्यापारी संकुल आहे. बांधकाम २००० मध्ये सुरू झाले आणि नवीन गृहनिर्माण सोसायट्यांसह स्वतःचा विकास करणे सुरू आहे.