मगधीरा
मगधीरा | |
---|---|
चित्र:Magadheera Poster.jpg प्रदर्शित् पोस्टर | |
दिग्दर्शन | एस.एस. राजामौली |
निर्मिती |
|
कथा | के. व्ही. विजयेंद्र प्रसाद |
पटकथा | एस.एस. राजामौली |
प्रमुख कलाकार |
|
संकलन | कोटागिरी वेंकटेश्वर राव |
छाया | के. के. सेंथिल कुमार |
संगीत | एम. एम. किरावनी |
देश | भारत |
भाषा | तेलुगु |
प्रदर्शित | अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "१"
|
वितरक | गीता आर्टस् |
अवधी | १६६ मिनिटे |
निर्मिती खर्च | 35 करोड[१][२] |
मगधीरा (अर्थ महान योद्धा) हा २००९ सालचा भारतीय तेलुगु भाषेतील रम्य काल्पनिक मारधारपट आहे. ह्याचे लेखन के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी केले आहे आणि याचे दिग्दर्शन एस.एस. राजामौली यांचे आहे. हा चित्रपट पुनर्जन्माच्या कथे्वर आधारि आहे. चित्रपटाची निर्मिती अल्लू अरविंद यांनी केलीआहेी या चित्रपटात राम चरण आणि काजल अगरवाल प्रमुख्य भूमिकेत आहेत तर देव गिल आणि श्रीहरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कथानक चार लोकांभोवती फिरते : राजकुमारीच्या सुरक्षिततेची जबाबदारी घे्तलेला एक योद्धा; त्याच्यावचर प्रेम करणारी राजकुमारी; सेनापती ज्याला राजकुमारी हवी असते; आणि एक सम्राट ज्याला राजकुमारीचे राज्य जिंकायचे असते. त्यांची इच्छा पूर्ण होण्यापूर्वी ते सर्व मरण पावतात आणि ४०० वर्षानंतर पुनर्जन्म घेतात. सध्याच्या काळात योद्धा सम्राटाच्या मदतीने कारस्थानी चुलतभावाची हत्या करतो आणि राजकन्या मिळवितो.
हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटवर बनविलेला आहे. [१][२] २ मार्च २००८ रोजी या चित्रपटाची निर्मीती सुरू झाली आणि १ मार्च २००८ रोजी छायाचित्रण सुरू झाले. के. के. सेन्थिल कुमार यांनी छाय चित्रण केले आणि कोटागिरी व्यंकटेश्वर राव यांनी संकलन केले. प्रोडक्शन डिझाइन आर. रविंदर यांनी केले होते, तर एक्शन सीक्वेन्स पीटर हेन आणि राम-लक्ष्मण या जोडीने कोरिओग्राफ केले होते. आदिल अदली आणि पीट ड्रॅपर यांच्या सहाय्याने व्हिज्युअल इफेक्ट आर सी. कमलाकनन यांनी डिझाइन केले होते. आपल्या क्रेडिट्समध्ये "व्हिज्युअल इफेक्ट निर्माता" दखविणारा हा पहिला तेलगू चित्रपट आहे. यात ध्वनीरचना एम. एम. केरावानी यांनी केली होती, ज्यांनी पार्श्वसंगीतासाठी कल्याणी मलिक यांचे सहाय्य घेतले.
मगधीरा चित्रपट ३१ जुलै २००९ रोजी जगभरातील १२५० स्क्रीनवर रिलीज करण्यात आला. समिक्षकांकडून टीका मिळूनही या चित्रपटाने तब्बल ७३.१ करोडचा धंदा वितरकांना मिळवून दिला. हा चित्रपट सलग १००० दिवस थिएटर मध्ये चालला आणि सर्वाधिक काळ चालणारा दाक्षिणात्य भारतीय चित्रपट असे नाव कमावले. या पूर्वी हा विक्रम चंद्रमुखी (२००५) या चित्रपटाचा होता. ब्ल्यू-रे मध्ये होम मीडिया रिलीज होणारा हा पहिला तेलगू चित्रपट आहे. या चित्रपटाने ५७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकासाठी आणि सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टचा पुरस्कार पटकावला. यासहीत सहा फिल्मफेर पुरस्कार, नऊ नंदी पुरस्कार आणि दहा सिनेमेअ पुरस्कार जिंकले. चित्रपटाच्या यशाने मुख्य कलाकारांना स्टारडममध्ये सामील केले.
हा चित्रपट तामिळमध्ये मावीरन आणि मल्याळम म्हणून धीरा: द वॉरियर नावाने भाषांतरित करण्यात आला. २७ मे २०११ रोजी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित् करण्यात आले आणि ते दोन्ही चित्रपटांनी छान व्यवसायिक यश मिळवले. राज चक्रवर्ती यांनी २०१४ मध्ये या चित्रपटाचा बंगाली भाषेत योद्द्धा: द वॉरियरचा नावाने अनुवाद केला.
बाह्यदुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील Magadheera चे पान (इंग्लिश मजकूर)
संदर्भ
- ^ a b "Rajamouli's 'Magadheera' rocking in Japan after 'Baahubali' and 'Muthu' - Times of India". The Times of India.
- ^ a b "संग्रहित प्रत". 2019-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-30 रोजी पाहिले.