मकरंद देशपांडे
मकरंद देशपांडे | |
---|---|
मकरंद देशपांडे | |
जन्म | मकरंद देशपांडे ६ मार्च १९६६ डहाणू (महाराष्ट्र) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
मकरंद देशपांडे (जन्म : डहाणू, ६ मार्च १९६६) हा रंगभूमीवरचा तसेच रुपेरी पडद्यावरचा नावाजलेला कलाकार, लेखक, दिग्दर्शक आहे. त्याने आजवर सुमारे ५ मराठी, ३५ हिंदी, ७ मल्याळी, ३ तेलुगू आणि ५ कानडी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. याशिवाय ५ चित्रपट दिग्दर्शित केले असून ७ दूरचित्रवाणी मालिकांत प्रत्यक्ष काम केले आहे.
मकरंद देशपांडे याने नाट्यसृष्टीसाठी अभूतपूर्व योगदान केले आहे. सुमारे ५० नाटिका व ४० पूर्ण लांबीची नाटके त्याच्या नावावर आहेत. त्याच्या 'पत्नी' नावाच्या नाटकाचे भारतभर प्रयोग झाले.
१९९० साली मकरंदने मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये शशी कपूरच्या कन्या संजना कपूर यांच्या मदतीने प्रवेश केला आणि १९९३ साली 'अंश थिएटर' नावाचे नाट्य कलाकारमंडळ स्थापले.
मकरंद देशपांडे यांची नाटके
- इमली, पपीता, तरबूज (हिंदी/इंग्रजी)
- एपिक गडबड (मराठी) - लेखक, दिग्दर्शक आणि भूमिका)
- करोडों में एक (लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन)
- कृष्णा किडिंग
- जोक
- पत्नी (हिंदी)
- मा इन ट्रान्झिट (हिंदी)
- मेरी मॉं के हाथ (दिग्दर्शन)
- बर्फ (हिंदी)
- शेक्सपिअरचा म्हातारा (मराठी)
- स्पाॅट आॅन
- सर सर सरला (भाग १,२, ३) (हिंदी)
मकरंद देशपांडे यांची भूमिका असलेले चित्रपट
- अजिंठा
- ट्रकभर स्वप्न
- दगडी चाळ
- पन्हाळा
- रिटा
(अपूर्ण)