Jump to content

मकरंद टिल्लू

मकरंद टिल्लू परिचय

टिल्लू म्हणजे हास्य आणि विनोद असे समीकरणच झाले आहे.

मकरंद टिल्लू हे ‘ हसण्यासाठी जगा , जगण्यासाठी हसा ’ या नावाने एक अत्यंत प्रभावी व सध्याच्या ताणताणावाच्या जीवनात आवश्यक अशा विचारसरणीचा कार्यक्रम सादर करतात. निर्मळ विनोदाची आवड असणारी पिढी निर्माण करण्याचा प्रमुख हेतू या कार्यक्रमाचा आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच घडणारा तीन पिढ्यांचा ‘ हास्यपंचमी ते हास्यपासष्ठी’ असा कार्यक्रम ते सादर करीत. टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या 60 हुन अधिक वर्षे एकपात्री करतात हे मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच घडणारी गोष्ट आहे. याबाबत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर म्हणतात “ एक पिढी दुसरीचं ऐकत नाही, इथे तीन पिढ्या एकच वसा घेऊन ; कमाल आहे. अभिनंदन नव्हे अभिवादन! ” .

एकपात्री कलाकार म्हणून: महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर ३०००हून अधिक कार्यक्रम केले आहेत.एकपात्री कलाकार परिषदेचे ते अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते संयुक्त कार्यवाह होते.

व्याख्याता म्हणून:- विविध व्याख्यानमालात, कॉलेजमध्ये सुमारे १०००हून व्याख्याने दिली आहेत.

मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून:- ७००हून अधिक व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा घेतल्या आहेत.

माध्यम कलाकार म्हणून:- दूरदर्शन, ई टीव्ही, आकाशवाणी यावर कार्यक्रम सादर केले आहेत.

लेखक म्हणून:- वर्तमानपत्रात स्तंभ लेखन तसेच मासिकात लेखन केले आहे.

विविध सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत. एकपात्री कलाकार परिषद, लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, नवचैतन्य हास्ययोग परिवार,जलरक्षक प्रबोधिनी, हसायदान फौंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, वनराई, वसुंधरा स्वच्छता अभियान अशा विविध सामाजिक संस्थां सोबत कार्यरत आहेत.

पुरस्कार

पुरस्कार :- ‘ मिड डे ’ या वृत्तपत्रात ‘ बजाज ऑटो मॅन ऑफ कॅलीबर ’ या अंतर्गत तसेच पुणे महापालिकेतर्फे हास्य व विनोद क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. एकपात्री क्षेत्रात ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यबद्दल त्यांना ‘बालगंधर्व’ परिवार पुरस्कार देण्यात आला. कलाकार व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘प्रेरणा पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे ‘पुण्याचा अभिमान ’ हा सन्मान देण्यात आला आहे. तसेच पाणी बचतीच्या क्षेत्रातील कार्यबद्दल 'सेव्ह वॉटर हिरो अवॉर्ड' देऊन सन्मान करण्यात आला आहे. अन्य पुरस्कार :- वंचित विकास संस्थेतर्फे पुरस्कार, राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार, पर्वती भूषण पुरस्कार

हास्ययोग प्रसारक

हास्ययोग प्रसारक :- लाफ्टरयोगाचे शारीरिक व मानसिक फायदे याचे ते 25 हून अधिक वर्षे अभ्यासक व प्रचारक आहेत. महाराष्ट्रात १५००हून अधिक हास्यक्लब आहेत. या हास्यक्लब समन्वय साधणाऱ्या लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, महाराष्ट्र संस्थेचे ते प्रदेश अध्यक्ष होते. 217 हास्यक्लब व पंचवीस हजाराहून अधिक सदस्य असलेल्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मुख्विय समन्श्ववयक व विश्वस्त आहेत. जगातील सर्वात मोठा ५००० हून अधिक सदस्य असलेला 'हसायदान' हा ऑनलाईन हास्यक्लब त्यांनी स्थापन केला आहे. ‘झी’ २४तास या वाहिनीवरून ‘हास्ययोगातून तणावमुक्ती ’ या विषयावर त्यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. हास्ययोगतज्ञम्हणून श्री. टिल्लू यांना सॅरीटोगा स्प्रिंग, न्यू यॉर्क येथे हास्यविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी बोलावणे आले होते.

जलरक्षक प्रबोधिनी

ते रोटरी डीस्ट्रीक्ट ३१३१ चे सन २०१८-१९ चे ते डीस्ट्रीक्ट डायरेक्टर होते. ...जलरक्षक प्रबोधिनीचे ते संस्थापक आहेत. कृतीतून समाज बदलाचा नवा पायंडा निर्माण करणारे ‘एक कोटी लिटर पाणी वाचवा अभियान’ त्यांनी सुरू केले आहे... आणि लोकसहभागातून आतापर्यंत सुमारे १०० कोटी लिटर पाणी त्यांनी वाचवले आहे. लोकं अनाथ मुलांसाठी काम करतात , टिल्लू अनाथ नळांसाठी काम करतात. त्यांनी सुरू केलेले ‘ गळतीमुक्त नळ अभियान ’ ३८ गावात सुरू झाले असून, आता ध्येय आहे दर दिवसाला एक कोटी म्हणजे ३६५ कोटी लिटर पाणी वाचविण्याचे ..!

http://thinkmaharashtra.com/node/2704 Archived 2018-10-03 at the Wayback Machine.