Jump to content

मंजुषा कुलकर्णी-पाटील

मंजुषा कुलकर्णी-पाटील

मंजुषा कुलकर्णी-पाटील
आयुष्य
जन्म नोव्हेंबर २, १९७१
जन्म स्थान सांगली,महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

मंजुषा कुलकर्णी-पाटील (२ नोव्हेंबर १९७१ सांगली, महाराष्ट्र, भारत) ह्या एक हिंदुस्तानी संगीतातील गायिका आहेत.[][] .त्या ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याच्या गायिका आहेत.

संगीत शिक्षण

त्यांच्या कुटुंबामध्ये संगीताची परंपरा होतीच,त्यामुळे त्यांचे संगीताचे शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे सांगली येथे सुरू झाले.[] त्यांनी अखिल भारतीय बालगंधर्व संगीत महाविद्यालयातून संगीत विषयात मास्टर ऑफ आर्ट्स केले. त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे इचलकरंजी येथील गायक पं.द. वि. काणेबुवा यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने १३ वर्षे [] शिक्षण घेतले.[][] त्यांच्या निधनानंतर पाटील यांनी काही काल पं.नरेंद्र कणेकर आणि शुभदा पराडकर यांच्याकडे काही काळ संगीत शिक्षण घेतले.लग्नानंतर पुण्यात आल्यावर त्यांनी डॉ.विकास कशाळकर यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली. सध्या त्या उल्हास कशाळकर यांच्याकडे संगीत शिक्षण घेत आहेत.

कारकीर्द

मंजुषा कुलकर्णी-पाटील त्यांच्या हिंदुस्तानी खयाल गायकीसाठी प्रसिद्ध आहेत.[] त्यांनी १९९८ तसेच २००३ मध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात, बालगंधर्व, भीमसेन महोत्सव, तानसेन समारोह, धारवाड येथील 'उस्ताद रहमत खॉंसाहेब महोत्सव' अशा व अनेक इतर संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. तसेच भारतातल्या आणि शिकागो, लंडन, सिंगापूर,मस्कत इ. परदेशातल्याही अनेक ठिकाणी आपले शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले आहेत.[]

संगीताचार्य द.वि.काणे बुवा प्रतिष्ठान

त्यांनी आपले गुरू काणे बुवा यांच्या नावाने संगीताचार्य द.वि.काणे बुवा प्रतिष्ठानची स्थापना केली. सर्वसामान्यांपर्यंत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पोहोचवणे, हा या संस्थेचा उद्देश आहे. प्रतिष्ठानतर्फे संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना युवा पुरस्कार तसेच शिष्यवृत्त्या देण्यात येतात. तसेच सांगली येथे गुरुकुल चालवले जाते.[]

पुरस्कार

  • पंडित जसराज गौरव पुरस्कार
  • माणिक वर्मा पुरस्कार
  • गुरुवर्य बी. एस. उपाध्ये स्मृती पुरस्कार - 2010
  • संगीत शिरोमणी पुरस्कार 2008 मध्ये.
  • संगीत नाटक अकादमी – उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार 2012.
  • कुमार गंधर्व पुरस्कार 2016–17

संदर्भ

  1. ^ "Swaramayee Gurukul's programme announced". Times of India. 2011-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 February 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Violin maestros". Express India. 2013-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 February 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "Satyajit's percussion". Times of India. 2013-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 February 2012 रोजी पाहिले.
  4. ^ पाटील, मंजुषा (४ मार्च २०१८). "कुठल्याही क्षणी गाता आलं पाहिजे". सकाळ सप्तरंग पुरवणी. १९ मार्च २०१८ रोजी पाहिले.
  5. ^ software, i22. "Artistesdetails". underscorerecords.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-14 रोजी पाहिले.
  6. ^ "Indian Female Vocalist-Manjusha Kulkarni Patil Indian Classical Singer". www.mysticamusic.com. 2018-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-14 रोजी पाहिले.
  7. ^ "Homage to centenarians". The Telegraph. 18 February 2012 रोजी पाहिले.
  8. ^ Manjusha Patil-Kulkarni Archived 2015-12-22 at the Wayback Machine.
  9. ^ "Sangitacharya D. V. Kanebua Pratishthan". www.kanebuapratishthan.com. 2018-03-14 रोजी पाहिले.