Jump to content

मंजरथ

मंजरथ हे गाव, माजलगाव तालुक्यात मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आहे.

मंजरथ माहात्म्य (आख्यायिका)

केसरी नावाच्या गंधर्वाला अंजना आणि आद्रिका नावाच्या दोन भार्या होत्या. शापामुळे अंजना वानरी तर आद्रिका मार्जार (मांजर) झाली. काही काळानंतर आद्रिकेने अब्जक तीर्थात (गोदावरी-सिंदफणा संगम ) स्नान केले असता तिचे मूळ रूप तिला प्राप्त झाले, म्हणून हे क्षेत्र मार्जार क्षेत्र झाले. तेच पुढे मंजरथ म्हणून ओळखले जाऊ लागले.[ संदर्भ हवा ]

हनुमंतेश्वर मंदिर, मंजरथ

गोदावरी नदीचे सिंधुफेना(सिंदफणा) नदीशी संगम स्थान ते हनुमंतेश्वर मंदिर या मधल्या भागाला अब्जक तीर्थ म्हणतात. गोदावरी नदीला गौतम ऋषींनी आणली म्हणून तिला गौतमी हे पण एक नाव आहे. या नदीमध्ये महापातकाला नष्ट करणारी अनेक तीर्थे असल्याची समजूत आहे. त्यांमध्ये मुख्य ३ तीर्थे आहेत, पहिले त्रिंबके(गंगेचे उगमस्थान), दुसरे अब्जके (गंगेचे हृदयस्थान ) आणि तिसरे गोदासागर संगमे( गोदावरीचे सागर संगम स्थान), या तिन्ही तीर्थांत ’अब्जके’चे स्थान विशेष महत्त्वाचे आहे. हे अब्जक तीर्थ किंवा मार्जार क्षेत्र म्हणजेच श्रीक्षेत्र मंजरथ.

माजलगाव शहरापासून दहा किलोमीटरवर मंजरथ हे गाव आहे. धाकटी काशी म्हणून त्याची दुसरी ओळख आहे. या गावाला गोदावरीचा वसा लाभला आहे. अंत्यविधीनंतरचे विधी करण्यासाठी मराठवाड्यातील लोक मंजरथ येथे येतात व गोदावरीच्या नदीपात्रात अस्थी, रक्षा विसर्जन करतात. [ संदर्भ हवा ]

[]

वैभव संदर्भ

  1. ^ ""धाकटी काशी' मंजरथ होणार चकाचक".[permanent dead link]