Jump to content

मंचुरियन (खाद्यपदार्थ)

Manchurian
Chicken Manchurian served in Hyderabad
प्रकार fritter
जेवणातील कोर्स Snack
उगम Mumbai, India
द्वारे निर्मित Nelson Wang
शोध लावला 1975
मुख्य घटक Cauliflower[]
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य Chopped onion, capsicum, garlic

चिकन, फ्लॉवर (भाजी), कोबी, कोळंबी, मासे, मटण आणि पनीर यांसारखे बारीक तुकडे करून आणि खोल तळून बनवल्या जाणाऱ्या भारतीय चायनीज पदार्थांचा मंचुरियन हा एक वर्ग आहे. नंतर चवीनुसार सोया सॉसमध्ये तळून तयार केला जातो.[][] मंचुरियन हे भारतीय चवीनुसार बनवलेल्ले चायनीज पाककला आहे. यात वापरले जाणारे मसाले देखील भारतीय असतात. हा भारतीय चायनीज खाद्यपदार्थांच्या यादीतील एक प्रमुख पदार्थ आहे.

इतिहास

"मंचुरियन" या शब्दाचा अर्थ मंचूरियाचा मूळ रहिवासी (ईशान्य चीनच्या आसपास) असा होतो. परंतु ही डिश मुळात भारतातील चायनीज रेस्टॉरंटची निर्मिती आहे. पारंपारिक मांचू पाककृती किंवा ईशान्य चिनी पाककृतीशी फारसे साम्य नाही.[] याचा शोध १९७५ मध्ये मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा स्वयंपाकी नेल्सन वांग याने लावला होता. जेव्हा एका ग्राहकाने त्याला मेनूमध्ये उपलब्ध असलेल्या पदार्थापेक्षा वेगळी डिश तयार करण्यास सांगितले.[] नेल्सन वांगने आपल्या शोध प्रक्रियेचे वर्णन भारतीय डिशच्या मुलभूत घटकांपासून, म्हणजे चिरलेला लसूण, आले आणि हिरव्या मिरच्यांपासून होते. परंतु नंतर, गरम मसाला टाकण्याऐवजी, त्याने सोया सॉसमध्ये टाकले, त्यानंतर कॉर्नस्टार्च आणि चिकन स्वतःच टाकले.[] याच्या शाकाहारी प्रकारात चिकनच्या ऐवजी कोबी किंवा फ्लॉवर वापरला जातो.[] त्याला सामान्यतः गोबी मंचुरियन Archived 2023-01-15 at the Wayback Machine. म्हणून ओळखले जाते. इतर शाकाहारी प्रकारांमध्ये मशरूम, बेबी कॉर्न आणि व्हेजी बॉल मंचूरियन यांचा समावेश होतो. Archived 2023-01-15 at the Wayback Machine. 

विविधता

मंचुरियनचे दोन भिन्न प्रकार असतात. सुखा किंवा लपथपीत आणि रस्श्यासहित. दोन्ही प्रकार कॉर्न फ्लोअर, मैदा, कांद्याची पात, बेल मिरची, सोया सॉस, चिली सॉस, किसलेले लसूण, मिरपूड, इत्यादी सारख्या सामान्य घटकांचा वापर करून तयार केले जातात. यात खासकरून कांद्याच्या पातीचा वापर गार्निशींगसाठी केला जातो. काही पाककृतींमध्ये चव वाढवण्यासाठी मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) वापरण्याची मागणी केली जाते. काही लोक आरोग्यावरील वाईट परिणामांमुळे त्याचा वापर टाळतात.[] त्याची चव कृती आणि वैयक्तिक पसंतींवर आधारित हलक्या मसालेदार ते गरम आणि तिखट अशा प्रकारात बदलू शकते.

कोरडे किंवा खुसखुशीत मंचुरियन

अर्ध-कोरडी गोबी (फुलकोबी) मंच्युरियन

फ्रिटर तुलनेने कोरडे सर्व्ह केले जातात, अनेकदा स्नॅक किंवा स्टार्टर म्हणून टोमॅटो केचप डिपिंग सॉस म्हणून. बार स्नॅक म्हणून अल्कोहोल पिणाऱ्यांमध्ये हे लोकप्रिय आहे आणि "कोल्ड बिअरचा उत्कृष्ट पिण्याचे साथीदार" म्हणून वर्णन केले गेले आहे.[]

रश्यासोबत मंचुरियन

चिकन मंचुरियन (रस्सा)

फ्रिटरवर कॉर्न फ्लोअरपासून बनवलेल्या मसालेदार ग्रेव्ही करीसारख्या जाड सॉसचा लेप केला जातो. हे सामान्यतः वाफवलेले तांदूळ, चायनीज तळलेले तांदूळ किंवा सिचुआन तळलेले तांदूळ यांसारख्या विविध प्रकारच्या तांदळाच्या पदार्थांसह मुख्य कोर्स म्हणून दिले जाते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Veg Manchurian Recipe". food.ndtv.com. 2022-08-20 रोजी पाहिले.
  2. ^ Laxmi Parida (2003). Purba: Feasts from the East: Oriya Cuisine from Eastern India. iUniverse. p. 191. ISBN 978-0-595-26749-1.
  3. ^ a b "Manchurian chicken". The Straits Times. 2007-06-03. p. 77 – NewspaperSG, National Library Board द्वारे."Manchurian chicken".
  4. ^ Mukherjee, Sipra; Gooptu, Sarvani (2009). "The Chinese community of Calcutta". In Banerjee, Himadri (ed.). Calcutta Mosaic: Essays and Interviews on the Minority Communities of Calcutta. Anthem Press. pp. 131–142. ISBN 978-81-905835-5-8.
  5. ^ Empty citation (सहाय्य)
  6. ^ Bhagat, Rasheeda (2007-05-04). "Taste and disdain … A tour of the country's interesting eating habits with a roving journalist". The Hindu Businessline. 2010-04-21 रोजी पाहिले.
  7. ^ "Science suggests MSG really isn't bad for your health after all".
  8. ^ "Indian Chinese Food: How Hakka Noodles and Manchurian Started a Cult Cuisine".

बाह्य दुवे